Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Government Jobs 2026: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! बिहार पोलीस SI भरती 2026 साठी ‘इतक्या’ जागांसाठी अर्ज सुरू

Government Jobs 2026 : बिहार पोलीस विभागाने विशेष शाखेतील १५० उपनिरीक्षक (SI) पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. इच्छुक पदवीधर उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध असून, अंतिम मुदतीपूर्वी अर्ज करणे आवश्यक आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 07, 2026 | 12:40 PM
Government Jobs 2026: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Government Jobs 2026: सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • बिहार पोलीस विशेष शाखेत SI पदाच्या 150 रिक्त जागांसाठी भरती सुरू.
  • इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध.
  • अंतिम तारखेपूर्वी अचूक माहिती देऊन अर्ज करणे आवश्यक.
Bihar Police SI Recruitment 2026: सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी बिहारमधून आनंदाची बातमी आली आहे. राज्यातील पोलीस विभागात उपनिरीक्षक (SI) पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विशेष शाखेमधील १५० रिक्त जागा भरण्यात येणार असून, इच्छुक उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करण्याची संधी उपलब्ध आहे. पोलीस सेवेत करिअर घडवण्याची इच्छा असलेल्या पदवीधरांसाठी ही भरती महत्त्वाची मानली जात आहे.

अर्ज करण्याची संधी मर्यादित काळासाठी

भरतीसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज करणे आवश्यक आहे. अंतिम तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही. त्यामुळे आवश्यक कागदपत्रे आधीच तयार ठेवून अर्ज पूर्ण करणे फायद्याचे ठरेल. अर्ज भरताना सर्व माहिती अचूक देणे गरजेचे आहे, कारण चुकीची माहिती पुढे अडचणीचे कारण ठरू शकते. (Government Jobs 2026:)

कोण करू शकतो अर्ज?

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी पूर्ण केलेली असावी. कला, विज्ञान, वाणिज्य किंवा इतर कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र आहेत. त्यामुळे विविध शैक्षणिक पार्श्वभूमी असलेल्या तरुणांना या भरतीमध्ये सहभागी होता येणार आहे.

वयोमर्यादेबाबत महत्त्वाची माहिती

या भरतीसाठी अर्जदाराचे किमान वय २० वर्षे असणे आवश्यक आहे. कमाल वयोमर्यादा मात्र प्रवर्गानुसार वेगवेगळी ठेवण्यात आली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातील पुरुषांसाठी कमाल वय ३७ वर्षे, महिलांसाठी ४० वर्षे आहे. मागासवर्गीय आणि अत्यंत मागासवर्गीय उमेदवारांना ४० वर्षांपर्यंत संधी देण्यात आली आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील महिला व पुरुष उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४२ वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

पद  पोलीस उपनिरीक्षक
एकूण रिक्त जागा
   १५० जागा
वेतनश्रेणी
       वेतन स्तर-६
अर्जाची सुरुवात    
९ जुलै, २०२६
अर्ज करण्याची अंतिम तारीख   ऑगस्ट ०९, २०२६
अर्ज शुल्क   
   १०० (सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी)

निवड प्रक्रियेचे टप्पे

  • वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित प्राथमिक लेखी परीक्षा.
  • प्राथमिक परीक्षा उत्तीर्ण झालेल्यांसाठी मुख्य लेखी परीक्षा.
  • मुख्य परीक्षेतील गुणवत्तेनुसार पुढील निवड.
  • शारीरिक पात्रता चाचणी (PET).
  • उंची आणि छातीचे मोजमाप.
  • सर्व पात्रता पूर्ण झाल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी.

शारीरिक चाचणीत काय असणार?

पोलीस सेवेसाठी शारीरिक क्षमता अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे लेखी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांची शारीरिक तंदुरुस्ती तपासली जाईल. धावण्याबरोबरच उंच उडी, लांब उडी आणि गोळाफेक यांसारख्या स्पर्धांचा समावेश असणार आहे. याशिवाय उंची आणि छातीचे मापही तपासले जाईल. त्यामुळे उमेदवारांनी अभ्यासासोबतच नियमित शारीरिक सरावावरही भर देणे आवश्यक आहे.

JPSC-JSSC वादाचा भडका! विद्यार्थी संतप्त का झाले? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

तयारी करताना ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा

स्पर्धा मोठी असल्यामुळे केवळ अभ्यास पुरेसा ठरणार नाही. वेळेचे योग्य नियोजन, मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचा सराव आणि शारीरिक फिटनेस यावरही तितकेच लक्ष देणे गरजेचे आहे. अर्ज भरल्यानंतर परीक्षेची तयारी अधिक जोमाने सुरू केल्यास यशाची शक्यता वाढू शकते.

Data Science vs Business Analytics यापैकी करिअरसाठी कोणता पर्याय आहे सर्वोत्तम? जाणून घेण्यासाठी लगेच वाचा…

इच्छुक उमेदवारांसाठी सुवर्णसंधी

पोलीस दलात नोकरी करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी ही भरती महत्त्वाची संधी ठरू शकते. स्थिर सरकारी नोकरी, जबाबदारीचे पद आणि समाजसेवेची संधी या तिन्ही गोष्टी या भरतीतून मिळू शकतात. पात्र उमेदवारांनी अंतिम तारखेची वाट न पाहता लवकरात लवकर अर्ज करून तयारीला सुरुवात करावी. योग्य नियोजन आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर उपनिरीक्षक पदापर्यंतचा प्रवास निश्चितच शक्य आहे.

Web Title: Bihar police si vacancy 2026 apply online for 150 special branch sub inspector posts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 07, 2026 | 12:40 PM

Topics:  

  • goverment news
  • Jobs Recruitment
  • Police News

संबंधित बातम्या

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!
1

UPSC Recruitment 2026: मोठी बातमी! UPSC तर्फे १३ रिक्त पदांवर थेट भरतीची; लगेच करा अर्ज!

KVIC Recruitment 2026: खादी व ग्रामोद्योग आयोगात ५० जागांवर भरती; लगेच करा ऑनलाईन अर्ज!
2

KVIC Recruitment 2026: खादी व ग्रामोद्योग आयोगात ५० जागांवर भरती; लगेच करा ऑनलाईन अर्ज!

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरतीतील उमेदवारांची प्रतीक्षा संपणार का? निवड प्रक्रिया पूर्ण होऊनही नियुक्ती रखडल्याने संताप!
3

Teacher Recruitment 2025: शिक्षक भरतीतील उमेदवारांची प्रतीक्षा संपणार का? निवड प्रक्रिया पूर्ण होऊनही नियुक्ती रखडल्याने संताप!

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह
4

पोलिस कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून आत्महत्या; निगडीतील बस डेपोमध्ये आढळला मृतदेह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.