Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

CM Fadnavis Honors sachin: पुण्यातील उद्योजक सचिन वडघुलेंचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव; एकदा वाचाच त्यांच्या संघर्षाची यशोगाथा!

CM Fadnavis Honors sachin wadghule: भारतीय जैन संघटनेच्या लाखो विद्यार्थ्यांमधून निवड झालेल्या सचिन वडघुले यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्यांचा खडतर प्रवास आणि 'भारत ई-सेवा' साम्राज्याची यशोगाथा येथे वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 25, 2026 | 11:07 AM
SACHIN

SACHIN

Follow Us
Follow Us:

CM Fadnavis Honors sachin wadghule: पुणे जिल्ह्यातील श्रीक्षेत्र टाकळी भीमा येथील रहिवासी सचिन रंजना बाळासाहेब वडघुले यांची ‘भारतीय जैन संघटने’तर्फे आयोजित प्रतिष्ठित गुणगौरव सोहळ्यासाठी निवड करण्यात आली. नुकत्याच पार पडलेल्या मुंबई येथील विशेष सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते त्यांना अधिकृतपणे सन्मानित देखील करण्यात आले आहे. संपूर्ण जैन संघटनेच्या लाखो विद्यार्थ्यांमधून निवडण्यात आलेल्या अवघ्या ३९ गुणवंतांमध्ये सचिन वडघुले यांनी आपले स्थान पटकावून आपल्या गावाचे नाव राज्यपातळीवर उज्ज्वल केले आहे.

सचिन वडघुले यांचे सुरुवातीचे जीवन

एका पडक्या छप्पराच्या घरातून सुरू झालेला सचिन वडघुले यांचा जीवनप्रवास आजच्या तरुणांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. सन २००१ मध्ये अवघ्या वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांचे छत्र हरपल्यानंतर, त्यांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शेतमजुरी करून सचिन यांचे प्राथमिक शिक्षण पूर्ण केले. मात्र, नियतीला काही वेगळेच मंजूर होते. इयत्ता ७ वीत असताना अचानक आईचेही अकाली निधन झाले. आई वडीलांचे छत्र हरपलेल्या अनाथ सचिनला त्यावेळी ‘भारतीय जैन संघटना’ (BJS), वाघोली येथे आश्रय मिळाला.

सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक कार्याची दखल

ते म्हणतात, संस्थेत शिकलेली शिस्त, वेळचे नियोजन आणि संयम याच्या बळावर मी २०१२ मध्ये पुणे महानगरपालिकेसमोर पहिले ‘महा ई-सेवा केंद्र’ सुरू करण्याचे धाडस केले. विशेष म्हणजे त्यांच्या याच धाडसाचे रूपांतर आज ‘SWAB Technologies Private Limited’ या स्वतःच्या कंपनीत झाले असून, संपूर्ण पुणे जिल्ह्यात त्यांच्या ‘भारत ई-सेवा’ केंद्रांच्या तब्बल २५ फ्रेंचाईझी यशस्वीपणे कार्यरत आहेत.

CA Inter Topper Marksheet: सीए इंटरमीडिएट टॉपर शार्दुल विचारेची मार्कशीट पाहिलीत का? नसेल तर लगेच पहा..

व्यवसायात उत्तुंग झेप घेण्याच्या प्रवासासोबत सचिन यांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मृतीप्रत्यर्थ ‘बाळ-रंजन फाउंडेशन’ची स्थापना केली. या संस्थेतून होणाऱ्या सेवाभावी कार्याचा आढावा पुणे मनपाने घेऊन संयुक्त विद्यमाने ‘शहरी बेघर निवारा’ केंद्र सुरू केले. या केंद्राच्या माध्यमातून आजवर ३,००० पेक्षा जास्त निराधार महिलांना त्यांनी सुरक्षित आसरा मिळाला आहे. त्यांच्या याच सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हा अत्यंत मानाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला.

सचिन वडघुले त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल बोलताना म्हणातात की, हा सन्मान केवळ माझ्या एकट्यासाठी नसून, माझ्या गावांसाठी, माझ्या सर्व सहकाऱ्यांसाठी आणि समाजासाठी आहे. या पुरस्कारामुळे मला समाजासाठी अधिक जोमाने आणि प्रामाणिकपणे काहीतरी करण्याची प्रेरणा सतत मिळत राहील.

NCERT Curriculum Change: एनसीईआरटीचा मोठा बदल! ९ वीच्या विद्यार्थ्यांना आता शिकवली जाणार ‘१९७५ ची आणीबाणी!

टाकळी भीमा गावात आनंदाचे वातावरण

सचिन वडघुले यांना मिळालेल्या या बहुमानामुळे त्यांच्या टाकळी भीमा परिसरात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा गौरव केवळ वडघुले कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण टाकळी भीमा गावासाठी ऐतिहासिक आणि कौतुकास्पद मानला जात आहे. या यशाबद्दल विविध स्तरांतून आणि सामाजिक संस्थांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Web Title: Bjs award cm fadnavis honors sachin vadghule success story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 11:07 AM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • cm of maharashtra
  • devendra fadamvis
  • inspiration
  • pune breaking

संबंधित बातम्या

आनंदाची बातमी! पुणे जिल्ह्यातील 38 हजार 970 शेतकरी कर्जमुक्त; तब्बल 345 कोटी…
1

आनंदाची बातमी! पुणे जिल्ह्यातील 38 हजार 970 शेतकरी कर्जमुक्त; तब्बल 345 कोटी…

Murder News : पारनेर तालुक्यातील कडूसमध्ये खळबळ, महिलेचा दगडाने ठेचून खून; कारण…
2

Murder News : पारनेर तालुक्यातील कडूसमध्ये खळबळ, महिलेचा दगडाने ठेचून खून; कारण…

तरुणीसोबत भयानक कृत्य, आक्षेपार्ह फोटो आणि VIDEO ची धमकी दिली अन्…; फुलंब्रीतील संतापजनक घटना
3

तरुणीसोबत भयानक कृत्य, आक्षेपार्ह फोटो आणि VIDEO ची धमकी दिली अन्…; फुलंब्रीतील संतापजनक घटना

लोणावळ्यात बार्टीची पार्टी की कार्यशाळा? तब्बल 39 लाखांच्या खर्चाबाबत प्रश्नचिन्ह
4

लोणावळ्यात बार्टीची पार्टी की कार्यशाळा? तब्बल 39 लाखांच्या खर्चाबाबत प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.