शिरगाव पंचायत समिती गणातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार स्नेहा साळवी यांनी विरोधकांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. आम्ही आजपर्यंत सातत्याने जनसेवा केली असून त्यामुळे घराणेशाहीचा मुद्दाच उद्भवत नाही, असे स्पष्ट करत त्यांनी नाव न घेता भाजप नेते प्रशांत यादव यांच्यावर निशाणा साधला. आमदारकीच्या निवडणुकीपासून धनशक्तीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याचा आरोप करत, आमच्याकडे धनशक्तीपेक्षा जनशक्ती आहे आणि त्यामुळे विजय निश्चित आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विरोधकांच्या टीकेपेक्षा शिरगाव पंचायत समितीचा विकास कसा साधता येईल यालाच प्राधान्य देणार असल्याचेही त्यांनी सांगितले.