Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

BSc Nursing Jobs in USA: भारतीय नर्ससाठी अमेरिकेत नोकरीची मोठी संधी! जाणून घ्या पात्रता निकष आणि अटी नेमक्या काय आहेत?

BSc Nursing Jobs in USA: भारतीय नर्ससाठी अमेरिकेत (USA) करिअरच्या उत्तम संधी उपलब्ध आहेत. केवळ बीएससी नर्सिंग पदवी व्यतिरिक्त CGFNS मूल्यांकन, NCLEX-RN परीक्षा आणि व्हिसा स्क्रीन सर्टिफिकेट का गरजेचे आहे, ते सविस्तर जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 24, 2026 | 09:33 AM
nurse

nurse

Follow Us
Follow Us:

BSc Nursing Jobs in USA for Indians : भारतात बीएससी नर्सिंगची (BSc Nursing) पदवी आरोग्य क्षेत्रात (Health Care Sector) करिअर करण्यासाठी महत्त्वाची  मानली जाते. मात्र, आता मोठ्या संख्येने भारतीय नर्स परदेशातही आपले करिअर करण्याचे स्वप्न पाहतात. अमेरिका हा अशा देशांपैकी एक आहे, जिथे नर्सना सातत्याने मोठी मागणी असते. वाढती लोकसंख्या, आधुनिक आरोग्य सेवा आणि अनुभवी वैद्यकीय कर्मचाऱ्यांची गरज यामुळे अमेरिकेतील हॉस्पिटल्स परदेशी नर्सना उत्तम संधी देत आहेत.

केवळ बीएससी नर्सिंगच्या पदवीच्या जोरावर अमेरिकेत नोकरी मिळू शकते का? असा प्रश्न अनेक भारतीय विद्यार्थ्यांच्या मनात असतो. ‘इमिग्रेशन ॲडव्हायझर’ आणि ‘स्टडी अब्रॉड एक्स्पर्ट’ रितिका गुप्ता यांच्या मते, केवळ पदवी असणे पुरेसे नाही. उमेदवारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त परवाना (License), प्रमाणपत्रे (Certifications) आणि इतर आवश्यक प्रक्रिया पूर्ण कराव्या लागतील. जर उमेदवाराकडे अतिरिक्त प्रशिक्षण आणि प्रमाणपत्रे असतील तर नोकरी मिळण्याची शक्यता अधिक वाढते.

पदवीचे मूल्यांकन कसे होते?

अमेरिकेत नर्स म्हणून काम करण्यापूर्वी भारतीय पदवी आणि पात्रतेचे मूल्यांकन करणे आवश्यक असते. यासाठी CGFNS ही संस्था उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेची तपासणी करते. उमेदवारांना त्यांचे ट्रान्सक्रिप्ट्स, पदवी प्रमाणपत्र आणि भारतीय नर्सिंग लायसन्स जमा करावे लागते. यानंतर ‘CES प्रोफेशनल रिपोर्ट’ तयार केला जातो, जो अमेरिकन मानकांनुसार पात्रतेचे मूल्यांकन करतो.

स्टेट बोर्डाची भूमिका काय आहे?

अमेरिकेत प्रत्येक राज्याचे स्वतःचे स्वतंत्र नर्सिंग बोर्ड असते. ज्या राज्यात नोकरी करायची आहे, तिथल्या नर्सिंग बोर्डाच्या अटी व शर्ती पूर्ण करणे गरजेचे असते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित राज्याच्या वेबसाइटला भेट देऊन नियम समजून घेणे आवश्यक आहे.

NEET UG 2026: ‘पेपर फुटला तेव्हा नियम कुठे होते?’ नीट परीक्षेला उशीरा पोहचलेल्या मुलीच्या वडिलांचा प्रशासनाला थेट प्रश्न!

‘Visa Screen Certificate’ का महत्त्वाचे आहे?

भारतीय नर्ससाठी ‘व्हिसा स्क्रीन सर्टिफिकेट’ हा अत्यंत महत्त्वाचे कागदपत्र मानले जाते. हे प्रमाणपत्र सिद्ध करते की उमेदवाराचे शिक्षण, लायसन्स आणि इंग्रजी भाषेचे कौशल्य अमेरिकन मानकांनुसार योग्य आहे. या प्रक्रियेत नर्सिंग शिक्षण, लायसन्सची पडताळणी आणि भाषा नैपुण्याची तपासणी केली जाते. या प्रमाणपत्राशिवाय अमेरिकेत वर्क व्हिसा (Work Visa) प्रक्रिया पुढे नेणे कठीण असते.

इंग्रजी टेस्ट आणि NCLEX-RN परीक्षा काय आहे?

अमेरिकेत रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांशी प्रभावी संवाद साधण्यासाठी इंग्रजी भाषेवर चांगली पकड असणे आवश्यक आहे. याशिवाय, NCLEX-RN परीक्षा हा सर्वात महत्त्वाचा टप्पा आहे. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच उमेदवार अमेरिकन नर्सिंग लायसन्स मिळवण्याच्या दिशेने पुढे जाऊ शकतो.

NEET UG 2026: ‘फसवणूक करणारा एकही जण वाचणार नाही!’ नीट फेरपरीक्षेतील गडबडीवर NTA महासंचालकांचा कडक इशारा; वाचा काय घडले

कामाचा अनुभव (Work Experience) किती महत्त्वाचा आहे?

तज्ज्ञांच्या मते, अमेरिकेतील हॉस्पिटल्स अशा उमेदवारांना प्राधान्य देतात, ज्यांच्याकडे चांगला क्लिनिकल अनुभव आहे. जर एखाद्या उमेदवाराकडे अनुभव कमी असेल, तर त्याने एखाद्या मान्यताप्राप्त हॉस्पिटलमध्ये १ ते २ वर्षांचा अनुभव घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ICU, क्रिटिकल केअर, इमर्जन्सी विभाग आणि मेडिकल-सर्जिकल युनिट यांसारख्या क्षेत्रांतील अनुभव नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात वाढवतो.

 

Web Title: Bsc nursing jobs usa indian nurses eligibility visa process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 09:33 AM

Topics:  

  • High salary Job
  • Job
  • USA

संबंधित बातम्या

Employment Fair 2026: महिलांसाठी सुवर्णसंधी! SNDT विद्यापीठात ‘या’ तारखेला भव्य ‘रोजगार मेळावा’; जपानमध्ये नोकरीचीही संधी
1

Employment Fair 2026: महिलांसाठी सुवर्णसंधी! SNDT विद्यापीठात ‘या’ तारखेला भव्य ‘रोजगार मेळावा’; जपानमध्ये नोकरीचीही संधी

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?
2

Major Rishab Singh Sambyal: सोशल मीडियावर धुमाकूळ घालणारे माजी ADC मेजर ऋषभ सिंह एका महिन्यात किती कमावतात?

MPSC JOB : पोरांनो अभ्यासाला लागा ! आतापर्यंतची विक्रम मोडणारी भरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती
3

MPSC JOB : पोरांनो अभ्यासाला लागा ! आतापर्यंतची विक्रम मोडणारी भरती होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

Dubai Crane Operator Salary: दुबईत क्रेन ऑपरेटर बनून कसा कमावतोय लाखो रुपये? जाणून घ्या एका क्लिकवर..
4

Dubai Crane Operator Salary: दुबईत क्रेन ऑपरेटर बनून कसा कमावतोय लाखो रुपये? जाणून घ्या एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.