फोटो सौजन्य- सोशल मीडिया
NEET UG 2026: डॉक्टर बनण्याचे स्वप्न घेऊन विद्यार्थी नीट परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्राजवळ पोहचतात. परंतु काही वेळा अवघ्या काही मिनटाच्या उशीराने त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश मिळत नाही. त्यावेळी त्यांना स्वप्न भंगल्यासारखे वाटते. अगदी अशीच परिस्थिती जेव्हा री-नीट परीक्षेच्या दिवशी एक मुलगी अवघ्या काही मिनिटांच्या विलंबाने परीक्षा केंद्रावर पोहोचली, तेव्हा तिच्यासोबत आलेल्या वडिलांचे जग जणू तिथेच थांबले. केंद्राबाहेर ते कधी हात जोडून अधिकाऱ्यांकडे गयावया करत होते की ‘माझ्या मुलीला परीक्षा देऊ द्या.’ नीट फेरपरीक्षेसाठी उशिरा पोहोचल्यामुळे या विद्यार्थिनीला आत प्रवेश मिळू शकला नाही.
सोशल मीडियावर हा भावुक करणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे, ज्यामध्ये एक वडील आपल्या मुलीला नीट परीक्षा देण्यासाठी परीक्षा केंद्रावर पोहोचतात, परंतु त्यांना काही मिनिटांचा उशीर होतो. याच कारणामुळे त्यांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जात नाही. व्हिडिओमध्ये दिसत आहे की, विद्यार्थिनीचे वडील आधी परीक्षा केंद्राच्या लोखंडी गेटवर आपले डोके जोरात आपटतात, ज्यानंतर त्यांची मुलगी आणि इतर लोक त्यांना पकडतात. यावेळी त्या विद्यार्थिनीचीही रडून-रडून वाईट अवस्था झालेली पाहायला मिळत आहे. अवघ्या काही मिनिटांच्या उशिरामुळे विद्यार्थिनीला परीक्षा केंद्रात प्रवेश न दिल्यामुळे आजूबाजूचे लोकही प्रशासनावर प्रचंड संतप्त झालेले दिसले.
इसीलिए कहा जाता है कि परीक्षा के दिन समय का एक-एक मिनट बहुत कीमती होता है।
यह वीडियो RE-NEET परीक्षा का बताया जा रहा है, जिसमें एक लड़की अपने पिता के साथ परीक्षा केंद्र पर पहुंचती है, लेकिन कुछ देर हो जाने की वजह से नियमों के अनुसार उसे अंदर प्रवेश नहीं दिया जाता। पिता, जिसने… pic.twitter.com/JrUNkayz3x — ʀᴜᴅʜʀᴀ ʏᴀᴅᴀᴠ🇮🇳 (@Rudhrayadav001) June 22, 2026
वडिलांनी सांगितले की, त्यांच्या मुलीने ३ मे रोजी झालेली नीट परीक्षा दिली होती. संतापलेल्या वडिलांनी म्हटले की, मागच्या वेळी परीक्षा दिली तेव्हा पेपर लीक (फूट) झाला; आता जर फक्त काही मिनिटांचा उशीर झाला तर परीक्षा केंद्रात जाऊ दिले जात नाहीये. जेव्हा पेपर लीक झाला तेव्हा सरकार कुठे होते, नियम कुठे होते? त्यामध्ये आमची काय चूक होती? हे बोलता बोलता वडील आणि मुलगी दोघेही ढसाढसा रडू लागले.
सोशल मीडियावरील दाव्यानुसार, मध्य प्रदेशातील विदिशा येथे राहणाऱ्या या वडिलांनी आपल्या मुलीला नीटचे कोचिंग लावण्यासाठी आपले सर्व काही विकले होते. जमीन-जुमला विकून ते आपल्या मुलीला डॉक्टर बनवण्यासाठी तरेतर्हेचे काम करत होते. त्यांची मुलगी देखील नीट परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी दिवस-रात्र अभ्यास करायची आणि घरापासून दूर असलेल्या कोचिंग क्लासला जायची. ३ मे रोजी आयोजित केलेल्या नीट परीक्षेत ती बसली होती, परंतु पेपर लीक झाल्यानंतर पुन्हा आयोजित करण्यात आलेल्या नीट फेरपरीक्षेत मात्र तिला भाग घेता आला नाही.






