Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी स्वीकारला कौशल्य विकास विभागाचा कार्यभार!

कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ येथे पुन्हा एकदा कौशल्य विकास विभागाचा कार्यभार स्वीकारला. त्यावेळी पत्रकारपरिषदेमध्ये त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.

  • By नारायण परब
Updated On: Dec 23, 2024 | 07:39 PM
फोटो सौजन्य- X

फोटो सौजन्य- X

Follow Us
Close
Follow Us:

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ येथे आज कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी पुन्हा एकदा कौशल्य विकास विभागाचा कार्यभार स्वीकारला. प्रसंगी येत्या काळातील कौशल्य विकास विभागाची रूपरेषा आणि ध्येय सांगण्यासाठी मंत्री लोढा यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा विश्वासाने कौशल्य विकास विभागाची जबाबदारी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो”, असे लोढा यांनी यावेळी सांगितले.

RTE Act : शालेय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! ५ वी आणि ८ वीतील विद्यार्थ्यांना सरकरट उत्तीर्ण करण्याचं धोरण रद्द

१०० दिवसांसाठी विभागाची रूपरेषा आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्द करू

मंत्री लोढा म्हणाले, “कौशल्य विकास हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौशल्य विकासाची महाराष्ट्राला असलेली गरज ओळखून, त्याला नेहमीच महत्त्व दिले आहे. अगदी थोड्या कालावधीत पुढील १०० दिवसांसाठी विभागाची रूपरेषा आम्ही मुख्यमंत्री महोदयांकडे सुपूर्द करू. पुढील ५ वर्षांत ५ लाख युवकांना रोजगार देण्याचे आमचे लक्ष्य आहे, त्यासाठी आजपासूनच आम्ही कार्याला सुरुवात करणार आहोत. मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच पुढील ५ वर्षांचे ध्येय सुद्धा आपल्या समोर मांडू!”

वर्ल्ड बँकेच्या प्रतिनिधींसह विभागाची प्रथम बैठक

आज कार्यभार स्वीकारल्यानंतर लोढा यांनी लगेचच वर्ल्ड बँकेच्या प्रतिनिधींसह विभागाची प्रथम बैठक घेतली. वर्ल्ड बँकेने कौशल्य विकास, शासकीय औद्योगिक संस्थांचे उन्नतीकरण, रोजगार प्रशिक्षण या सर्व उपक्रमांसाठी ₹२२०० कोटींचे कर्ज कौशल्य विकास विभागाला दिले आहे. सर्व तरतुदी पूर्ण करून कर्जाची रक्कम लवकरात लवकर विभागाला कशी मिळेल, यासाठी आजच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. केंद्र सरकारद्वारे भारतातील १००० शासकीय औद्योगिक संस्थांना सहभागी केले आहे. महाराष्ट्रातील जास्तीत जास्त ITI चा यामध्ये समावेश असावा, यासाठी लवकरच केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांची भेट घेणार असल्याचे देखील मंत्री लोढा यांनी आज सांगितले.

शनिवारी रात्री जाहीर झालेल्या मंत्रिमंडळ खातेवाटपामध्ये मलबार हिल मतदारसंघाचे आमदार, माजी मंत्री मंगलप्रभात लोढा यांना कौशल्य विकास विभागाचे खाते देण्यात आले. मागील कार्यकाळातही लोढा हे कौशल्य विकास विभागाचे मंत्री होते. होती. त्यांच्या काळात महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास विद्यापीठाची स्थापना झाली. त्यांनी घेतलेल्या प्रमुख  निर्णयांमध्ये  मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, आयटीआयचे नामांतरण,’हर घर दुर्गा अभियान’ असे असंख्य निर्णय होते.

मागील सरकारच्या काळात लोढा हे मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री होते. उच्चभ्रु लोकांचा मतदार संघ असलेल्या  मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून  मंगलप्रभात लोढा हे 1995 पासून आमदार आहेत. 2024 च्या विधानसभा निवडणुकीतही ते  विक्रमी मताधिक्क्याने ते निवडून आले आहेत.

मोठी बातमी! केंद्राचे राज्याला ‘हे’ मोठे गिफ्ट; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, “लाडक्या बहिणी आणि…”

Web Title: Cabinet minister mangal prabhat lodha accepts charge of skill development department

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 23, 2024 | 07:39 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mangal Prabhat Lodha

संबंधित बातम्या

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश
1

Mhada Lottery : कोकण मंडळाच्या लॉटरीत १ घरासाठी १८ अर्ज; या भागात घरांचा समावेश

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश
2

Mumbai Rain Update : मुंबई पालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्क रहावे, मंगलप्रभात लोढा यांचे निर्देश

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण
3

विद्यापीठ चौकातील वाहतूक कोंडी सुटणार; उद्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुमजली उड्डाणपुलाचे लोकार्पण

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती
4

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांचे 10 मोठे करार! महाराष्ट्रात 42,892 कोटींची गुंतवणूक, 25 हजार 892 रोजगाराची निर्मिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.