लाडक्या बहीणींना केंद्राचे गिफ्ट (फोटो- सोशल मिडिया)
Ladki Bahin: विधानसभा निवडणूक झाल्यानंतर राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाले आहे. दरम्यान नुकतेच नागपूरमध्ये सरकारचे हिवाळी अधिवेशन पार पडले. यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने तब्बल 35 हजार कोटी रुपयांच्या पुरवण्या मंजूर केल्या. यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी देखील निधीची तरतूद करण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे आता लाडक्या बहिणीला पुढील हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यातच आता केंद्र सरकारकडून राज्याला मोठे गिफ्ट मिळाले आहे.
महायुती सरकारच्या मागच्या कार्यकाळात तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली. या योजनेमुळे राज्यात महायुती सरकारला विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले असे म्हटले जात आहे. सध्या नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
राज्यात महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर केंद्र सरकारने देखील राज्याला मोठे गिफ्ट दिले आहे. पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत एकाच वर्षासाठी महाराष्ट्राला मोठी भेट मिळाली आहे. केंद्र सरकारने आवास योजेनच्या अंतर्गत तब्बल 20 लाख घरांना मंजूरी दिली आहे. केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराजसिंग चौहान यांनी याबद्दलची घोषणा केल्याचे मुख्यमंत्री फडणवीस सांगितले.
“एकाच वर्षात 20 लाख घरांना मंजूरी देण्यात आली आहे. या घरांचा लाभ ने नागरिक बेघर आहेत. याकहा फायदा त्या लोकांना होणार आहे. लाडक्या बहिणी आणि लाडका शेतकरी यांना या घरांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न असेल”, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीला पैशयांसोबत हककचे घर देखील मिळण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Ladki Bahin Yojana Update: ‘लाडकी बहीण योजने’संदर्भात सरकारचा मोठा निर्णय; २१०० रुपये कधी जमा होणार?
2100 रुपये कधी जमा होणार?
लाडकी बहीण योनेच्या माध्यमातून राज्यातील महिलांना महिन्यास 1,500 रुपये दिले जातात. जवळपास अडीच कोटी महिलांच्या खात्यात हे पैसे जमा केले जातात. आतापर्यंत पाच महिन्यांचे पैसे सरकारने दिले आहेत. त्यानंतर निवडणुकीच्या प्रचारात लाडक्या बहिणीना 2100 रुपये देण्याबद्दल महायुतीने भाष्य केले होते. त्यामुळे आता लाडक्या बहीणींच्या खात्यात 2100 रुपये कोणत्या महिन्यापासून जमा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
प्रधानमंत्री आवास योजनेत 20 लाख नवीन घरे महाराष्ट्रासाठी मंजूर केल्याबद्दल मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहानजी यांचे अतिशय मनापासून आभार !@narendramodi @ChouhanShivraj#Maharashtra #PMAwasYojana pic.twitter.com/plIV72xQWg
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 23, 2024
लाडकी बहीण योजनेतील पुण्यातील 10 हजार महिलांचे अर्ज बाद
विधानसभा निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना रद्द होणार, अशा चर्चा निवडणुकीपूर्वी सुरू होत्या. त्यामुळे राज्यभरातील महिलावर्गात एकच खळबळ माजली होती. पण योजना बंद होणार नाही. असे त्यावेळचे उपमुख्यमंत्री आणि विद्यमान देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: सांगितलं होते. पण निवडणुकीनंतर राज्यात आता वेगळीच चर्चा सुरू झाली आहे. लाडकी बहीण योजनेतील प्रलंबित अर्जांची छाननी सुरू झाली असून त्यात आतापर्यंत 1 हजार महिलांचे अर्ज अपात्र ठरले आहेत. निकषात न बसणारे अर्ज बाद करण्यात आले आल्याची माहिती आहे.