
Online Education 2026
ऑनलाईन कोर्सेसचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थी आपल्या वेळेनुसार अभ्यास करू शकतात. याच कारणामुळे मोठ्या संख्येने वर्किंग प्रोफेशनल्स ऑनलाईन कोर्सेसकडे वळत आहेत.
आजच्या काळात ऑनलाईन एमबीए (MBA), बीबीए (BBA), बी.कॉम (B.Com), एम.कॉम (M.Com) आणि एमए (MA) यांसारख्या कोर्सेसना सर्वाधिक पसंती दिली जात आहे. विशेषतः मॅनजमेंट क्षेत्रामध्ये एमबीए तर फायनान्स क्षेत्रामध्ये बी.कॉम आणि एम.कॉमची मागणी वेगाने वाढत आहे.
ऑनलाईन शिक्षणाचा एक मोठा फायदा म्हणजे यामध्ये येणारा खर्च खूपच कमी असतो. तसेच या कोर्सेला सहभाग नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यांना येण्या-जाण्याचा आणि राहण्याचा अतिरिक्त खर्चही करावा लागत नाही.तसेच विद्यार्थी आपल्या वेळेनुसार कोर्स पूर्ण करून पदवी मिळवू शकतात.
नोकरी सोबत शिक्षण सुरू ठेवू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आणि नोकरदारवर्गांमध्ये विविध पोर्टल वेगाने लोकप्रिय होत आहेत. या कोर्सेसमध्ये विद्यार्थ्यांना व्हिडिओ लेक्चर्स, ई-बुक्स, लाईव्ह क्लासेस आणि रेकॉर्डेड सेशन्स यांसारख्या सुविधाही मिळतात. यामुळे विद्यार्थ्यांना आपल्या सोयीनुसार अभ्यास करता येतो. अनेक संस्था करिअर गाईडन्स आणि प्लेसमंट सपोर्ट देखील उपलब्ध करुन देतात. जेणएकरून विद्यार्थ्यांना चांगल्या नोकरीची संधी मिळू शकते.
ऑनलाईन कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्याना युनिव्हर्सिटीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज करावा लागतो. तिथे अर्ज करून विद्यार्थी आपल्या आवडीच्या कोर्सला प्रवेश घेऊ शकतात.