सौजन्य फोेटो - AI Gemini
सुरुवातीला मनोरंजनाच्या उद्देशाने सुरू झालेला हा प्रकार हळूहळू तीव्र व्यसनात बदलला आणि आजीबाई तासन्तास मोबाईलवर रील्स पाहण्यात वेळ घालवू लागल्या. हातामध्ये मोबाईल असेल तर जेवणाची वेळ झाली किंवा तहान लागली, याचे त्यांना अजिबात भान राहत नव्हते. कुटुंबीयांनी मोबाईलचा वापर कमी करण्याचा प्रयत्न केला असता, त्या प्रचंड अस्वस्थ होत आणि घरात आदळआपट करत असत.
या तीव्र व्यसनामुळे आजीबाईंना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे, रुग्णालयात उपचार सुरू असतानाच तिथल्या ५ वेगवेगळ्या रुग्णांचे मोबाईल अचानक गायब झाले. प्रशासनाने तातडीने सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, संबंधित आजीबाईंनीच ते पाचही जणांचे मोबाईल स्वतःच्या पिशवीत लपवून ठेवल्याचे उघडकीस आले. अखेर सलग १५ दिवसांच्या उपचारानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.
‘लहान मुले, तरुणच नव्हे तर ज्येष्ठ व्यक्तीही मोबाईलवर अधिक वेळ घालवू लागली तर कुटुंबीयांनी त्याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे’, असे मत मनोविकारतज्ज्ञ डॉ. मेराज कादरी यांनी व्यक्त केले आहे.
Ans: ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरात घडली आहे
Ans: आजीबाईंना इन्स्टाग्रामवर रील्स पाहण्याचे तीव्र व्यसन जडले होते
Ans: आजीबाईंनी रुग्णालयातील ५ वेगवेगळ्या रुग्णांचे मोबाईल स्वतःच्या पिशवीत लपवून ठेवल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले






