Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 2 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Ashadhi Ekadashi |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिपळूणमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या पहिल्याच दिवशी स्वागताऐवजी कष्ट; विद्यार्थिनींना उचलावी लागली लोखंडी कपाटे

Ratnagiri School News :  चिपळूणमधील बापट आळीतील कन्याशाळेत शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींना स्वागताऐवजी अवजड लोखंडी कपाटे उचलण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वर्गखोल्यांच्या दुरुस्तीतील ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थिनींना कष्टप्रद काम करावे लागल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला....

  • By श्वेता झगडे
Updated On: Jun 16, 2026 | 11:29 AM
चिपळूणमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या पहिल्याच दिवशी स्वागताऐवजी कष्ट; विद्यार्थिनींना उचलावी लागली लोखंडी कपाटे

चिपळूणमध्ये धक्कादायक प्रकार! शाळेच्या पहिल्याच दिवशी स्वागताऐवजी कष्ट; विद्यार्थिनींना उचलावी लागली लोखंडी कपाटे

Follow Us
Follow Us:
  • चिपळूण कन्याशाळेत विद्यार्थिनींकडून अवजड कामे
  • पहिल्याच दिवशी स्वागताऐवजी कष्ट
  • ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा फटका विद्यार्थिनींना
Chiplun Girls School News Marathi : शाळेचा पहिला दिवस म्हणजे विद्यार्थ्यांसाठी आनंद, उत्साह आणि स्वागताचा क्षण असतो. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांचे वाजतगाजत स्वागत केले जाते, पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले जाते, तर काही शाळांमध्ये औक्षण करून नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात केली जाते. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण शहरात याच पहिल्या दिवशी एका शाळेत विद्यार्थिनींना स्वागताऐवजी अवजड कामे करावी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

चिपळूण शहरातील बापट आळी परिसरातील कन्याशाळेत हा प्रकार घडला. शाळेच्या वर्गखोल्यांच्या दुरुस्ती आणि डागडुजीचे काम एका ठेकेदाराकडे देण्यात आले होते. संबंधित काम पूर्ण झाल्यानंतरही वर्गखोल्यांमध्ये बांधकाम साहित्य, अडगळ आणि अस्वच्छता तशीच पडून होती. यामुळे शाळा सुरू होण्यापूर्वीच शिक्षकांनी संबंधित ठेकेदाराला वारंवार साफसफाई आणि साहित्य हटवण्याची विनंती केली होती. मात्र, शिक्षकांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करत ठेकेदाराने कोणतीही कार्यवाही केली नाही. अखेर शाळा सुरू होण्याचा दिवस उजाडला आणि वर्गखोल्या वापरण्यायोग्य नसल्याचे चित्र दिसून आले. विद्यार्थिनींच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून शिक्षकांनी स्वतः पुढाकार घेत वर्गांमधील कौले आणि इतर साहित्य हटवण्याचे काम सुरू केले.

चिपळूण बसस्थानकाचे काम पुढील वर्षी पूर्ण होणार, अतिरिक्त निधीचीही तयारी; प्रताप सरनाईक यांची ग्वाही

याचदरम्यान, वर्गखोल्यांमध्ये असलेली अवजड लोखंडी कपाटे हलवण्याची वेळ आली. धक्कादायक बाब म्हणजे ही कपाटे हलवण्यासाठी विद्यार्थिनींची मदत घेण्यात आली. पहिल्याच दिवशी विद्यार्थिनींना अंगमेहनतीची आणि संभाव्य धोकादायक कामे करावी लागल्याने अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पालक, नागरिक आणि शिक्षणप्रेमींमधून तीव्र प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. येथील शिक्षकांनी शेवटी स्वतः अंगमेहनत करून त्या वर्गखोल्यांमधील ठेवलेली कौले व अन्य साहित्य अन्यत्र हलविले. यानंतर याठिकाणी असणारी अवजड लोखंडी कपाटे चक्क विद्यार्थिनींना उचलावी लागली. पहिल्या दिवशी त्यांचे उत्स्फूर्तपणे स्वागत होण्याऐवजी त्यांना अंगमेहनतीचे काम करावे लागले. ठेकेदाराच्या अनागोंदीचा फटका या विद्यार्थिनींना बसला.

पालकांकडून शाळा प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराविरोधात नाराजी व्यक्त केली जात असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड केल्याचा आरोप केला जात आहे. शाळेत सुरू असलेल्या डागडुजीच्या कामांमध्ये योग्य नियोजनाचा अभाव आणि ठेकेदाराच्या अनागोंदीमुळे निष्पाप विद्यार्थिनींना याचा फटका बसल्याची भावना व्यक्त होत आहे. या प्रकरणी शिक्षण विभागाने चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, तसेच विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

Ratnagiri News: अलोरे गावच्या इर्शाद मुल्लाजींना शिवसेनेत मोठी जबाबदारी; अल्पसंख्याक तालुकाप्रमुखपदी नियुक्ती

Web Title: Chiplun girls school students heavy work first day video viral june 2026

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 11:29 AM

Topics:  

  • Chiplun
  • Ratnagiri

संबंधित बातम्या

Amba Ghat Alert: मुसळधार पावसाचा फटका! आंबा घाटातील रस्त्याला भेगा, अवजड वाहनांवर तातडीची बंदी
1

Amba Ghat Alert: मुसळधार पावसाचा फटका! आंबा घाटातील रस्त्याला भेगा, अवजड वाहनांवर तातडीची बंदी

RATNAGIRI : तिवरे गावावर दरडीचे भीषण संकट; १५० घरांवर धोक्याची टांगती तलवार
2

RATNAGIRI : तिवरे गावावर दरडीचे भीषण संकट; १५० घरांवर धोक्याची टांगती तलवार

Ratnagiri Accident News : शेवटचा पेपर देऊन आनंदात निघाली; दुचाकी घसरली अन् होत्याचं नव्हतं झालं, 22 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा
3

Ratnagiri Accident News : शेवटचा पेपर देऊन आनंदात निघाली; दुचाकी घसरली अन् होत्याचं नव्हतं झालं, 22 वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.