संग्रहित फोटो
वानखेडे यांच्या तक्रारीनुसार हरीश प्रकाश वर्मा याने बंदूक काढून जीवे मारण्याची धमकी दिली असून भरत प्रकाश वर्मा याने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. ही घटना वानखेडे यांच्या दुकानासमोर घडला असून, दत्त मंदिरासमोरील वाहन पार्किंग करण्यावरून हे वाद झाले आहेत. घटनेच्या दिवशी दत्त मंदिरासमोरील पार्किंगच्या कारणावरून मंदिराच्या पुजारी यांच्यासोबतही हरीश वर्मा यांचा वाद झाला होता, असे तक्रारीत नमूद केले आहे.
दरम्यान, रात्री जितेंद्र वानखेडे हे आपल्या दुकानात असताना हरीश वर्मा व भरत वर्मा यांनी दुकानासमोर वाहन पार्किंग करण्याच्या कारणावरून त्यांना शिवीगाळ केली. यावेळी हरीश वर्मा याने त्यांना दुकानाच्या चॅनल गेटवर ढकलल्याने त्यांच्या डोक्याला दुखापत झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर जितेंद्र वानखेडे यांचे भाऊ राहुल वानखेडे घटनास्थळी आले असता भरत वर्मा याने त्यांची गचांडी पकडून चापट बुक्क्यांनी नाकावर मारहाण केल्याचा आरोप आहे. यावेळी शिवम वानखेडे, अक्षय पाडळकर व मंगेश राठोड यांनी मध्यस्थी करून भांडण सोडवले. तसेच हरीश वर्मा याने बंदूक काढून जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.
या घटनेनंतर राहुल वानखेडे यांनी फुलंब्री येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेतले. जितेंद्र वानखेडे यांच्या तक्रारीवरून हरीश व भरत यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास फुलंब्री पोलिस करीत असून, तपासानंतर घटनेचे नेमके सत्य स्पष्ट होणार आहे.
हे सुद्धा वाचा : घराशेजारी झुडपात लपवले पिस्तूल; पुणे पोलिसांनी सापळा रचून आरोपीला पकडले
Ans: दुकानासमोर वाहन पार्किंग करण्याच्या कारणावरून जितेंद्र वानखेडे आणि हरीश वर्मा व भरत वर्मा यांच्यात वाद झाला.
Ans: तक्रारीनुसार भरत प्रकाश वर्मा याने मारहाण केली, तर हरीश प्रकाश वर्मा याने बंदूक रोखून जीवे मारण्याची धमकी दिली.
Ans: जितेंद्र वानखेडे यांच्या तक्रारीवरून फुलंब्री पोलिसांनी प्रकरणाची नोंद केली असून, पुढील तपास फुलंब्री पोलिस करीत आहेत.






