IBPS Clerk Exam: जिल्हा बँकेत सरळ सेवा पद्धतीने भरती प्रक्रिया; वाचा सविस्तर
Cooperative Bank Recruitment: सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड सिंधुदुर्ग या आस्थापनेवरील व अधिपत्याखालील असलेल्या लिपिक या श्रेणीतील ७३ रिक्त पदे सरळ सेवा पद्धतीने भरावयाचे आहेत. त्यासाठीची परीक्षा आयबीपीएस (इन्सि्टट्यूट बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन) या संस्थेमार्फत राबविली जात आहे.
भरती प्रक्रिया जाहीर करताना सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पणजी, मडगाव व म्हापसा अशी पाच ठिकाणी जाहीर केली होती. परंतु लिपिक पदाच्या या भरतीसाठी जिल्हाभरातून ५०७७ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे बँकेने सुचविलेल्या केंद्रांवर परीक्षेचे नियोजन करणे शक्य नाही. त्यामुळे परीक्षा केंद्रांची व्यवस्था मुंबई, पुणे, सातारा, सांगली व कोल्हापूर या ठिकाणी घेण्याचे आयबीपीएसने निश्चित केले. याबाबत काही उमेदवारांमध्ये गैरसमज निर्माण झाल्याचे दिसून आले आहे.
RTE साठी ९० हजारांवर अर्ज! राज्यातील ८६५१ शाळेतील १.१२ लाख जागांसाठी ऑनलाइन नोंदणी
तसेच वर्तमानपत्रात देखील याबाबत बातम्या प्रसिद्ध करून गैरसमज पसरविला जात आहे. त्यामुळे बँकेमार्फत याबाबत खुलासा करण्यात येतो की ही परीक्षा ही इन्सि्टट्यूट बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (आयबीपीएस )या अधिकृत संस्थेमार्फत ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे. परीक्षा मूळ जाहीर झालेल्या केंद्रांवर घेतली जावी, यासाठी बँकेने आयबीपीएसकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. परंतु बँकेने सुचविलेल्या केंद्रांची मर्यादा व तांत्रिक सुविधा लक्षात घेऊन अंतिम केंद्र निश्चिती आयबीपीएस मार्फत केली आहे.
कोल्हापूर : आयएन डिजिटल झोन आयडी झेड कसबा बावडा, कोल्हापूर येथे – ४७० परीक्षार्थी
छत्रपती शाहू इन्सि्टट्यूट ऑफ बिझनेस एज्युकेशन अँड रिसर्च कोल्हापूर येथे – १६० परीक्षार्थी, सांगली : वसंत दादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्च सांगली २५० परीक्षार्थी , नानासाहेब महाडिक पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट सांगली १०० परीक्षार्थी, सातारा : कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय सातारा १४० परीक्षार्थी, सातारा : आयटी पार्क ऑनलाईन परीक्षा केंद्र सातारा ८० परीक्षार्थी, महिला महाविद्यालय कराड ९५ परीक्षार्थी, मुंबई : आयडीझेड पवई मुंबई – ७५८ परीक्षार्थी, पुणे : आयन डिजिटल झोन आयडीझेड हडपसर गेट नंबर ३ – ७०० परीक्षार्थी, आयन डिजिटल झोन गेट नंबर वन – ७०० परीक्षार्थी, आयएन डिजिटल झोन गेट नंबर टू – ७०० परीक्षार्थी, इंडियन इन्स्टिट्यूट फॉर एरोनॉटिकल इंजीनियरिंग अँड आयटी पुणे – २४० प्रशिक्षार्थी, डीजी एंटरप्राइजेस कळंबे न्यू कॉम्प्लेक्स पुणे – ६० परीक्षार्थी, जेपी ऑनलाईन परीक्षा केंद्र पुणे – २०० परीक्षार्थी.
सिंधुदुर्ग : मेट्रोप्लेटिंग इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सुकळवाड – ५० परीक्षार्थी, रत्नागिरी : पीएसपीएसएस राजेंद्र माने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय देवरुख – ९० परीक्षार्थी, पणजी : आयन डिजिटल झोन आयडीझेड पाठोप्लाझा पणजी (गोवा) – १५० परीक्षार्थी, म्हापसा : फर्स्ट इन्फोटेक ऑफिस मापसा गोवा – १३० परीक्षार्थी. उमेदवारांना योग्य पारदर्शक व तांत्रिक दृष्ट्या सुरक्षित पद्धतीने परीक्षा देता यावी हा बँकेचा प्रमुख उद्देश असून सर्व उमेदवारांनी गैरसमज दूर करून नियोजित केंद्रावर वेळीच उपस्थित रहावे व बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांचा पालन करावे असे आवाहन बँकेने केले आहे






