Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बदलत्या जगात सक्षम नेतृत्व घडवण्यासाठी वीस्कूल सज्ज! नव्या विद्यार्थ्यांसाठी ‘नवारंभ २०२६’चे दिमाखात आयोजन

मुंबईतील प्रसिद्ध वेलिंगकर इन्स्टिट्यूट (WeSchool) मध्ये PGDM (2026-28) बॅचसाठी 'नवारंभ २०२६' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रा. डॉ. उदय साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना सक्षम नेतृत्व आणि 'मिट्टी टू मॅनेजमेंट' उपक्रमाची दीक्षा देण्यात आली.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Jul 17, 2026 | 05:06 PM
बदलत्या जगात सक्षम नेतृत्व घडवण्यासाठी वीस्कूल सज्ज! (Photo Credit- X)

बदलत्या जगात सक्षम नेतृत्व घडवण्यासाठी वीस्कूल सज्ज! (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • बदलत्या जगात सक्षम नेतृत्व घडवण्यासाठी वीस्कूल सज्ज!
  • नव्या विद्यार्थ्यांसाठी ‘नवारंभ २०२६’चे दिमाखात आयोजन
बदलत्या जागतिक परिस्थिती, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), पर्यावरण संवर्धन आणि सर्वसमावेशक विकासामुळे आज व्यवसाय आणि व्यवस्थापन क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. या बदलांचा विचार करून प्रिन्सिपल एल. एन. वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्च (वीस्कूल), मुंबईने PGDM (२०२६–२८) अभ्यासक्रमाच्या नव्या विद्यार्थ्यांसाठी ‘नवारंभ २०२६’ या विद्यार्थी परिचय कार्यक्रमाचे आयोजन केले.

यंदाच्या कार्यक्रमाची संकल्पना “विश्वदृष्टी • मेधा संगम • सह-उत्थान – मानवी, शाश्वत आणि परस्परांशी जोडलेल्या जगाचे नेतृत्व” अशी होती. बदलत्या व्यावसायिक जगात संवेदनशीलता, नावीन्यपूर्ण विचार आणि जबाबदारीची जाणीव ठेवून नेतृत्व करता यावे, यासाठी विद्यार्थ्यांमध्ये आवश्यक दृष्टिकोन आणि कौशल्ये विकसित करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता.

यावेळी वीस्कूलचे गट संचालक प्रा. डॉ. उदय साळुंखे म्हणाले, “आमचा विश्वास आहे की, व्यवस्थापन शिक्षण हे फक्त नोकरी मिळवण्यासाठी नसून विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम बनवणारे असावे. आज कृत्रिम बुद्धिमत्ता, बदलते व्यावसायिक वातावरण आणि जागतिक घडामोडींमुळे जग वेगाने बदलत आहे. अशा काळात तांत्रिक ज्ञानासोबतच मानवी मूल्ये, योग्य विचारसरणी आणि बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता खूप महत्त्वाची आहे. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना जगाकडे व्यापक दृष्टीने पाहता येते, विविध संस्कृतीतील लोकांसोबत काम करण्याचा अनुभव मिळतो आणि बदलत्या आर्थिक परिस्थितीची अधिक चांगली समज विकसित होते.”

Latur NEET Success : पेपरफुटीनंतर लातूरची दमदार एन्ट्री; NEETमध्ये ‘शाहू’चे 450, जिल्ह्यातील 1200 हून अधिक विद्यार्थ्यांना

या कार्यक्रमात डीव्हीआयजे कन्सल्टिंगचे संस्थापक तसेच वीस्कूलचे माजी विद्यार्थी डॉ. प्रणव कुलकर्णी (पीजीडीएम-रिटेल, २००६–०८) यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण मेहनत, आव्हानांचा धैर्याने सामना, चांगले नातेसंबंध निर्माण करणे आणि सातत्याने नवीन गोष्टी शिकत राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, “एमबीए हा केवळ पुस्तके आणि वर्गखोल्यांपुरता मर्यादित नसून योग्य दृष्टिकोन, संयम आणि अर्थपूर्ण नातेसंबंध घडवण्याचा प्रवास आहे. आज तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता निर्णय प्रक्रियेत मदत करू शकतात; मात्र जिज्ञासा, योग्य प्रश्न विचारण्याची सवय, समज, विवेक आणि चिकित्सक विचार करण्याची क्षमता याच तुम्हाला प्रभावी नेतृत्व घडवतील.”

या कार्यक्रमादरम्यान ‘मिट्टी टू मॅनेजमेंट’ या नव्या उपक्रमालाही प्रारंभ करण्यात आला. पर्यावरण संवर्धन आणि जबाबदार नेतृत्वाची जाणीव विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. प्रा. डॉ. उदय साळुंखे आणि वीस्कूलच्या विश्वस्तांच्या हस्ते फुलझाडांची लागवड करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. हे वृक्षारोपण संस्थेच्या हरित आणि शाश्वत भविष्यासाठीच्या बांधिलकीचे प्रतीक आहे. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी एकत्रितपणे कार्य करणे, संघभावना विकसित करणे आणि जबाबदार नागरिक बनण्यासाठी प्रेरित केले जाणार आहे.

‘नवारंभ २०२६’ या उपक्रमाच्या माध्यमातून वीस्कूल विद्यार्थ्यांना जागतिक तज्ज्ञ आणि यशस्वी माजी विद्यार्थ्यांकडून शिकण्याची संधी देत राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थी भविष्यात जबाबदार, सक्षम आणि बदलत्या जगाच्या गरजांनुसार नेतृत्व करणारे व्यवस्थापक म्हणून घडतील.

NEET 2026 Result : सर्व प्रवर्गांसाठी नवीन Cut-Off गुण जाहीर; UG Counselling अपडेट जाणून घ्या…

Web Title: Weschool is ready to groom capable leadership for a changing world navarambh 2026 organized with great grandeur for new students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 17, 2026 | 05:06 PM

Topics:  

  • Career News
  • Department of Education
  • Mumbai

संबंधित बातम्या

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना
1

दुर्वांचा बाप्पा अन् ‘गुरू ते गुगल गुरू’चा प्रवास, विक्रोळीचा मोरया यंदा हटके रूपात; बाल मित्र कला मंडळाची पर्यावरणपूरक संकल्पना

Kabutarkhana Controversy: कबुतरखान्यांवरून पुन्हा ‘फडफड’; निलेशचंद्र विरुद्ध मराठी एकीकरण समिती आमनेसामने
2

Kabutarkhana Controversy: कबुतरखान्यांवरून पुन्हा ‘फडफड’; निलेशचंद्र विरुद्ध मराठी एकीकरण समिती आमनेसामने

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनानंतर विद्यार्थ्यांनी उचलला स्वच्छतेचा विडा; गिरगाव चौपाटीवर राबवली मोहीम
3

Ganeshotsav 2026: बाप्पाच्या विसर्जनानंतर विद्यार्थ्यांनी उचलला स्वच्छतेचा विडा; गिरगाव चौपाटीवर राबवली मोहीम

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित
4

IIT Bombay Student Death: IIT बॉम्बेच्या आंदोलक विद्यार्थ्यांच्या 18 मागण्या मान्य; 3 तासांच्या बैठकीनंतर आरोपी प्राध्यापक निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.