Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Delhi University: दिल्ली विद्यापीठात १ वर्षाच्या पीजी कोर्सेसच्या जागा वाढल्या! पण प्राध्यापक का आहेत चिंतेत?

Delhi University PG Admissions 2026: दिल्ली विद्यापीठाने १-वर्षीय पीजी कोर्सेसच्या जागा दुप्पट केल्या आहेत. एमए, एमएससी आणि एमकॉमच्या किती जागा वाढल्या? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 01, 2026 | 04:35 PM
du

du

Follow Us
Follow Us:

Delhi University PG Admissions 2026: दिल्ली विद्यापीठातून पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विद्यापीठाने नुकत्याच सुरू केलेल्या आपल्या १-वर्षीय पदव्युत्तर कार्यक्रमांमधील जागांची संख्या वाढवण्याची घोषणा केली आहे. विद्यार्थी आणि शिक्षक अनेक दिवसांपासून याची मागणी करत होते. दिल्ली विद्यापीठाने स्थापन केलेल्या विशेष समितीच्या शिफारशींनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. या निर्णयामुळे ज्या विद्यार्थ्यांनी ४ वर्षांचा अंडरग्रॅज्युएट प्रोग्राम पूर्ण केला आहे आणि आता १ वर्षाचा मास्टर्स कोर्स करू इच्छितात, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

दिल्ली विद्यापीठाने एमए, एमएससी आणि एमकॉम यांसारख्या लोकप्रिय विषयांमध्ये जागांचा आकडा लक्षणीयरीत्या वाढवला आहे. एकीकडे डीयूचे विद्यार्थी या निर्णयामुळे अत्यंत आनंदी दिसत असताना, दुसरीकडे विद्यापीठाच्या प्राध्यापकांनी यावर चिंता व्यक्त केली आहे. पायाभूत सुविधा न वाढवता आणि पुरेशी तयारी न करता अचानक जागा वाढवल्यामुळे शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, असे शिक्षकांचे मत आहे. यासोबतच लॅब्स आणि क्लासरूम्समध्ये जागेची टंचाई देखील निर्माण होऊ शकते.

दिल्ली विद्यापीठात कोणत्या विषयात किती जागा वाढल्या?

विद्यापीठ प्रशासनाने अनेक मोठ्या विभागांमध्ये जागांची संख्या दुप्पट किंवा त्याहून अधिक केली आहे. एमए इंग्लिश, हिस्ट्री, फिलॉसॉफी, पॉलिटिकल सायन्स, एमएससी गणित आणि एमकॉम या विषयांमध्ये आधी फक्त ४५ जागा होत्या, ज्या आता वाढवून १२६ करण्यात आल्या आहेत. म्हणजेच थेट ८१ जागांची वाढ झाली आहे. तर एमए इकॉनॉमिक्सच्या जागा ४० वरून वाढवून १२६ करण्यात आल्या आहेत.तसेच सायकॉलॉजी आणि केमिस्ट्रीच्या जागा ४५ वरून ६३ झाल्या आहेत.एमएससी स्टॅटिस्टिक्सच्या आता २९ ऐवजी ५४ जागांवर प्रवेश मिळेल.

विद्यार्थी निर्णयाचे स्वागत करत आहेत, पण…

चार वर्षांचे ग्रॅज्युएशन पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. एमए हिस्ट्रीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, जागा वाढल्यामुळे प्रवेश मिळण्याची शक्यता वाढली आहे आणि स्पर्धेचा ताण थोडा कमी झाला आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांचे असेही मत आहे की, DU मधील कॉलेजेसची संख्या पाहता जागांचा आकडा २०० च्या आसपास असायला हवा होता, कारण FYUP पास करणाऱ्या उमेदवारांची संख्या खूप जास्त आहे.

Parliament Jobs: संसदेत नोकरी करायची आहे? जाणून घ्या येथील विविध पदांची पात्रता अन् पगार!

शिक्षकांचा विरोध: पायाभूत सुविधांअभावी गुणवत्तेवर परिणाम?

दिल्ली विद्यापीठाच्या शिक्षकांनी हे पाऊल ‘विनाविचार’ घेतलेला निर्णय असल्याचे म्हटले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, विद्यापीठाशी संलग्न असलेल्या अनेक कॉलेजेसच्या प्राध्यापकांचे म्हणणे आहे की, दिल्ली विद्यापीठात विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या सांभाळण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध नाही. अचानक जागा वाढवल्यामुळे विद्यार्थी-शिक्षक प्रमाण बिघडेल.

क्लासरूमची कमतरता आणि लॅब्सवर पडणार ताण

शिक्षकांचे मत आहे की, या घाईघाईने घेतलेल्या निर्णयामुळे सायन्सच्या विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकलसाठी लॅब्स मिळणार नाहीत आणि आर्ट्स फॅकल्टीमध्ये क्लासरूम्स लहान पडतील. यामुळे विद्यार्थ्यांचा शिकण्याचा अनुभव खराब होईल. विद्यापीठाने प्रत्यक्षात किती मुले १-वर्षीय पीजी निवडत आहेत याचा अंदाज घ्यायला हवा होता, कारण प्रत्येक FYUP विद्यार्थी यात प्रवेश घेत नाही.

KVS Report: गेल्या ८ वर्षांत प्राचार्यांची पदे रिक्त राहण्याचे प्रमाण वाढले; केंद्रीय विद्यालयांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह?

NEP अंतर्गत सुरुवात

२०२५-२६ सत्रापर्यंत DU फक्त २-वर्षीय मास्टर्स प्रोग्रामच चालवत होते. नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणा (NEP) अंतर्गत १-वर्षीय PG प्रोग्रामची सुरुवात याच शैक्षणिक सत्रापासून केली जात आहे.

Web Title: Delhi university du increases seats for 1 year pg courses professors raise concern

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • Delhi University
  • education

संबंधित बातम्या

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’
1

Rahul Gandhi On MP Education: शिक्षणावरून राजकीय रणसंग्राम! योगी सरकारचा स्मार्ट शाळांवर भर, तर राहुल गांधींचा ‘डेटा वॉर’

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!
2

Medical College in India: देशातील सर्वात स्वस्त मेडिकल कॉलेज; जिथे ५ वर्षांची MBBS फी समोसा-चहापेक्षा कमी!

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार
3

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!
4

High Salary Trap: महिन्याला २ लाखांपेक्षा जास्त पगार म्हणजे ‘ट्रॅप’? MBA ग्रॅज्युएटच्या सल्ल्याने सोशल मीडियावर चर्चा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.