
book publication
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात यासंदर्भात बैठक झाली. उपलब्ध दुर्मिळ साहित्याचा शोध, संकलन, वर्गीकरण आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने जतन करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. संपादन, संकलन, मुद्रण आणि प्रकाशनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
UGC NET 2026 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून उत्तरतालिका रिलीज, अशी तपासा रेकॉर्डेड रिस्पॉन्स शीट!
धम्मदीक्षा हा केवळ धार्मिक परिवर्तनाचा प्रसंग नसून समता, स्वाभिमान, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांना नवे अधिष्ठान देणारा ऐतिहासिक टप्पा मानला जातो. त्यामुळे या घटनेशी संबंधित मूळ दस्तऐवज, पत्रव्यवहार आणि अन्य पुरावे भावी संशोधनासाठी महत्त्वाचे ठरणार आहेत. नागपूरमधील धम्मदीक्षा सोहळ्याची पार्श्वभूमी, तत्कालीन सामाजिक वातावरण, नियोजन, पत्रव्यवहार आणि विचारप्रवाह या खंडातून अभ्यासकांसमोर येणार आहे. दस्तऐवजांची सत्यता, संदर्भमूल्य आणि ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवून दर्जेदार संपादन करण्याचे निर्देशही देण्यात आले.
यावेळी बैठकीस उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे अपर मुख्य सचिव बी. वेणुगोपाल रेड्डी, उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, उच्च शिक्षण विभागाचे उपसचिव अशोक मांडे, उपसचिव प्रताप लुबाळ, सहसंचालक डॉ. अर्चना बोन्हाडे तसेच समितीचे सदस्य सचिव व सदस्य उपस्थित होते.