फोटो सौजन्य - सोशल मीडिया
या सुधारित जाहिरातीनुसार, यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील अटींमध्ये बदल करण्यात आला आहे. आता केवळ वर्ग-१ संवर्गातून (Class-1) सेवानिवृत्त झालेले पात्र अधिकारीच या कराराधिष्ठित पदासाठी अर्ज व मुलाखत देण्यासाठी पात्र ठरतील. तसेच, पदाच्या नावात बदल करून आता ‘प्रभारी अधिकारी नाट्यगृह व कलादालन व्यवस्थापन’ अशी सुधारणा करण्यात आली आहे.
इच्छुक आणि पात्र सेवानिवृत्त अधिकाऱ्यांसाठी ठाणे महानगरपालिकेने थेट मुलाखतीचे (Walk-In Interview) आयोजन केले आहे. येत्या १७ सप्टेंबर २०२६ रोजी दुपारी ०३:०० वाजता महापालिकेच्या प्रशासकीय भवनातील (तिसरा मजला, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे) कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह येथे ही मुलाखत पार पडेल.
यापूर्वी ५ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीमधील उर्वरित सर्व अटी व शर्ती कायम राहणार असल्याची माहिती ठाणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांनी दिली आहे. या निर्णयामुळे महापालिकेच्या अंतर्गत नाट्यगृह विभागाचे कामकाज अधिक वेगाने आणि अनुभवी मार्गदर्शनाखाली चालण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
History of 9-to-5 Job : ९ ते ५ ची नोकरी आणि शाळांचा इतिहास; हा पॅटर्न नेमका कसा तयार झाला?






