(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
केंद्रीय विद्यालय संघटन आणि नवोदय विद्यालय समिती यांसारख्या केंद्र सरकारच्या शाळांमध्ये आणि इतर सरकारी शाळांमध्ये शिक्षक होण्यासाठी प्रामुख्याने CTET उत्तीर्ण होणं आवश्यक आहे. याचा अर्थ असा की, जर तुमचे ध्येय या शाळांमध्ये नोकरी मिळवणे असेल, तर CTET अनिवार्य आहे. पण देशात शिकवण्याचे इतरही अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
जर तुम्ही CTET उत्तीर्ण नसाल, तरीही तुम्ही खाजगी शाळांमध्ये सहजपणे शिकवू शकता. येथे CTET परीक्षा उत्तीर्ण असणं अनिवार्य नाही. अनेक चांगल्या खाजगी शाळा पदवी आणि बी.एड.च्या आधारावरही शिक्षकांची भरती करतात. सुरुवातीचा पगार कमी असू शकतो, पण तुमच्या अनुभवाने तुम्ही लक्षणीय वाढीची अपेक्षा करू शकता.
प्रत्येक राज्य स्वतःची TET परीक्षा आयोजित करतं, जसे की UPTET, REET, HTET अशा परीक्षा आहेत त्याची तयारी तुम्ही करु शकता. तुम्ही CTET मध्ये यशस्वी झाला नसाल, पण राज्यस्तरीय TET तुमच्यासाठी एक चांगली संधी असू शकते. तिचा अभ्यासक्रम थोडा वेगळा असतो आणि स्पर्धाही अनेकदा कमी असते.
आजकाल कोचिंग आणि घरी शिकवणी देणे हे एक उत्तम करिअरचे पर्याय बनले आहेत. जर तुमच्या विषयावर तुमची चांगली पकड असेल, तर तुम्ही घरून शिकवायला सुरुवात करू शकता. हळूहळू तुम्हाला ओळख मिळेल आणि तुमचे उत्पन्न वाढेल. विशेषतः सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये शिकवणीला खूप मागणी आहे.
डिजिटल युगात ऑनलाइन शिक्षण झपाट्याने वाढत आहे. तुम्ही यूट्यूब चॅनेल, ॲप्स किंवा ऑनलाइन प्लॅटफॉर्मद्वारे शिकवू शकता. यामुळे तुम्हाला अधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग खुले होतात. त्यामुळे तुमचं स्वप्न साकार होण्यास मदत होते.
जर तुम्हाला शिकवण्यासोबतच लिहिण्याची आवड असेल, तर तुम्ही शैक्षणिक सामग्री लेखनात करिअर करू शकता. आज अनेक एडटेक कंपन्या, नोट्स काढणे, प्रश्नपत्रिका तयार करणे आणि व्हिडिओ स्क्रिप्ट लिहिणे यांसारख्या कामांसाठी शिक्षकांना कामावर घेतात.
सीटीईटी (CTET) उत्तीर्ण न होण्याचा अर्थ असा नाही की तुम्ही ही परीक्षा कधीच उत्तीर्ण होऊ शकत नाही. तुमच्या कमकुवत बाजू ओळखा, एक नवीन रणनीती तयार करा आणि पुन्हा तयारी करा. योग्य मार्गदर्शन आणि सरावाने, तुम्ही पुढच्या वेळी नक्कीच यशस्वी होऊ शकता.






