फोटो सौजन्य- सोशल मीडिया
DIKSHA Portal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया मोबाईल काँग्रेसच्या समारंभात बोलताना सांगितले की, मोबाईल आणि इंटरनेटमुळे देशातील दूरदूरच्या भागांत राहणाऱ्या मुलांसाठी आणि गरीब कुटुंबांसाठी शिक्षणाचे नवीन मार्ग खुले झाले आहेत. कोविडच्या काळातही ऑनलाइन शिक्षणाद्वारे मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचले आणि २०२२ पर्यंत दीक्षा प्लॅटफॉर्मवर ५०० कोटींहून अधिक लर्निंग सेशन्स नोंदवले गेले. शिक्षणाची सर्वात जास्त गरज असलेल्या समाजातील घटकांपर्यंत ऑनलाइन शिक्षणाचे सर्व माध्यम उपलब्ध करून देणे, हा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.
शाळेच्या पुस्तकांमध्ये क्यूआर कोड ऑनलाइन कोड, ऑनलाइन अभ्यास किंवा शिक्षक प्रशिक्षण यासंदर्भात दिक्षा हे डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. यामध्ये पाठ्यपुस्तकांतून ते व्हिडिओ परस्परसंवादी सामग्री कोर्सेस आणि इतर डिजिटल शैक्षणिक साहित्य उपलब्ध असते. हे शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत एनसीईआरटीच्या (NCERT) पुढाकाराने सीआयईटीच्या (CIET) सहकार्याने विकसित करण्यात आले असून याची सुरुवात २०१७ मध्ये झाली होती.
सोप्या भाषेत सांगायचे तर, DIKSHA हा एक असा डिजिटल प्लॅटफॉर्म आहे जिथे विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि संबंधित इतर लोक शिक्षणाशी संबंधित डिजिटल साहित्य मिळवू शकतात. हा ‘पीएम ई-विद्या’ (PM e-VIDYA) चा एक प्रमुख भाग आहे आणि शालेय शिक्षणासाठी ‘वन नेशन, वन डिजिटल प्लॅटफॉर्म’ म्हणून याचा वापर केला जातो. याचा विस्तार केवळ एका इयत्तेपुरता किंवा बोर्डापुरता मर्यादित नाही. अधिकृत माहितीनुसार, DIKSHA वर के-१२ (K-12) म्हणजेच प्राथमिक शालेय शिक्षणापासून ते उच्च माध्यमिक स्तरापर्यंतचे डिजिटल लर्निंग मटेरियल उपलब्ध आहे. यामध्ये NCERT, CBSE, NIOS आणि राज्य/केंद्रशासित प्रदेशांच्या बोर्डांशी संबंधित साहित्याचाही समावेश आहे.
येथे एक गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे की वर कोर्सेसची कोणतीही निश्चित संस्था किंवा केवळ काही विशिष्ट कोर्स कॅटेगरीज नाहीत. दीक्षा कोर्सेस वेगवेगळ्या प्रकारे शोधाता येऊ शकतात आणि पाहिले जाऊ शकतात. हे कोर्सेस विद्यार्थ्यांच्या रिव्हिजन प्रोग्राम शिक्षकांची क्षमता वाढवण्यासाठी आणि व्यवसायिक विकासाशी संबांधित आहेत. हे कोर्सेस वेगवेगळ्या विषयांचे आहेत. त्यामुळे एखादा विद्यार्थी केवळ कोर्सेच नाही तर स्वत: च्या वर्ग आणि विषयानुसार डिजिटल अभ्यासाचे इतर साहित्य देखील शोधू शकतो.
DIKSHA च्या सर्वात उपयुक्त सुविधांपैकी एक म्हणजे क्यूआर कोड असलेली एनर्जाइज्ड टेक्स्टबुक्स (पाठ्यपुस्तके). अनेक पाठ्यपुस्तकांमध्ये दिलेला क्यूआर कोड DIKSHA ॲप किंवा पोर्टलद्वारे स्कॅन केल्यावर त्या धड्याशी संबंधित डिजिटल सामग्रीपर्यंत पोहोचता येते. यामध्ये व्हिडिओ, इन्टरएक्टिव्ह सामग्री आणि इतर शैक्षणिक साहित्य मिळू शकते. याचा फायदा असा होतो की, विद्यार्थी पुस्तकात वाचत असलेल्या अध्यायाशी संबंधित डिजिटल साहित्यापर्यंत थेट पोहोचू शकतो, त्याला इंटरनेटवर ते वेगळ्याने शोधण्याची गरज भासत नाही.
Elon Musk School: इलॉन मस्कने मुलांसाठी सुरू केली ‘सीक्रेट’ शाळा; फी आणि पॅटर्न वाचून व्हाल चकित
DIKSHA चा वापर विद्यार्थी, शिक्षक, पालक, शाळा प्रमुख, शाळा अधिकारी आणि इतर वापरकर्ते करू शकतात. तथापि, प्रत्येक कोर्ससाठी पात्रता आणि त्यात सहभागी होण्याचे नियम सारखेच नसतात. एखाद्या विशेष कोर्सचा क्रिएटर किंवा मेंटर हे ठरवू शकतो की त्यात कोण सहभागी होऊ शकते. पाहुणे (गेस्ट) म्हणजेच लॉगिन न केलेले वापरकर्ते देखील DIKSHA वर बरीच सामग्री पाहू शकतात. परंतु, कोर्समध्ये औपचारिकपणे सहभागी होण्यासारख्या सुविधांसाठी सामान्यतः नोंदणी (रजिस्टेशन) आणि लॉगिन करणे आवश्यक असते.






