परदेशी जाऊन करा ‘हे’ कोर्स! नोकरी शोधण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही
२०२६ मध्ये अमेरिकेत शिकायचे ठरवत असाल, तर हे कोर्स करिअरसाठी फायदेशीर ठरणार. विंड, सोलर, नर्सिंग, डेटा सायन्स आणि सायबर सिक्युरिटी क्षेत्रात मोठी मागणी!
२०२६ मध्ये अमेरिकेत शिकायचे ठरवत असाल, तर खालील कोर्स तुमच्यासाठी करिअर घडवणारे
नोकरी शोधण्यासाठी वणवण भटकावे लागणार नाही
जॉब ग्रोथ २९ टक्के
उच्च शिक्षणासाठी अमेरिका हा भारतीय विद्यार्थ्यांचा कायमच पहिला पसंतीचा देश राहिला आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने भारतीय विद्यार्थी शिक्षणासाठी अमेरिकेत जातात आणि २०२६ मध्येही ही संख्या वाढण्याचीच शक्यता आहे. मात्र, अमेरिकेतील शिक्षणाचा खर्च मोठा असल्याने केवळ पदवी मिळवणे पुरेसे नसून, नोकरीच्या संधी देणारा कोर्स निवडणे अत्यंत महत्त्वाचे ठरत आहे. सध्या जागतिक जॉब मार्केटमध्ये स्पर्धा वाढली असून, योग्य कौशल्य असलेल्या उमेदवारांनाच संधी मिळत आहे. त्यामुळे २०२६ मध्ये अमेरिकेत शिकायचे ठरवत असाल, तर खालील कोर्स तुमच्यासाठी करिअर घडवणारे ठरू शकतात.
अमेरिकेत विंड एनर्जी टेक्नॉलॉजीमध्ये Associate of Applied Science (AAS) किंवा डिप्लोमा केल्यास नोकरीच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतात. यूएस ब्यूरो ऑफ लेबर स्टॅटिस्टिक्सनुसार, विंड टर्बाइन सर्व्हिस टेक्निशियन या पदासाठी सुमारे ५० टक्के जॉब ग्रोथ अपेक्षित आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्यांना वार्षिक सरासरी सुमारे ५६ लाख रुपये पगार मिळतो. अक्षय ऊर्जेवर वाढता भर असल्याने या कोर्सनंतर नोकरीसाठी संघर्ष करावा लागणार नाही.
सोलर फोटोव्होल्टिक (PV) इंस्टॉलेशन
सोलर फोटोव्होल्टिक (PV) इंस्टॉलेशन सर्टिफिकेशन किंवा रिन्यूएबल एनर्जीमध्ये Associate डिग्री घेतल्यास सोलर फोटोव्होल्टिक इंस्टॉलर म्हणून नोकरी मिळू शकते. पुढील १० वर्षांत या क्षेत्रात ४२ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे. या नोकरीसाठी वार्षिक पगार सुमारे ४६.५० लाख रुपये आहे. कोर्सदरम्यान विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिकल ग्रिड, पीव्ही सिस्टिम आणि प्रॅक्टिकल ट्रेनिंग दिले जाते.
नर्सिंग (MSN / DNP)
मास्टर ऑफ नर्सिंग (MSN) किंवा डॉक्टर ऑफ नर्सिंग प्रॅक्टिस (DNP) हा २०२६ साठी अत्यंत उपयुक्त कोर्स मानला जात आहे. या पदव्यांनंतर नर्स प्रॅक्टिशनर म्हणून काम करता येते. अमेरिकेत वृद्ध लोकसंख्या वाढत असल्याने नर्सेसची मोठी गरज आहे. या क्षेत्रात ४० टक्के जॉब ग्रोथ असून, वार्षिक पगार सुमारे १.१६ कोटी रुपये आहे.
डेटा सायन्स / कॉम्प्युटर सायन्स
भारतीय विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय असलेले डेटा सायन्स, स्टॅटिस्टिक्स किंवा कॉम्प्युटर सायन्स हे कोर्सेस आजही डिमांडमध्ये आहेत. या क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर डेटा सायंटिस्ट म्हणून नोकरी मिळते. मोठ्या डेटामधून बिझनेस स्ट्रॅटेजी तयार करू शकणाऱ्या प्रोफेशनल्सना मोठी मागणी असून, वार्षिक पगार सुमारे १ कोटी रुपये आहे. जॉब ग्रोथ सुमारे ३४ टक्के आहे.
सतत वाढणाऱ्या सायबर हल्ल्यांमुळे सायबर सिक्युरिटी, आयटी किंवा कॉम्प्युटर सायन्स कोर्सचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. या कोर्सनंतर इन्फॉर्मेशन सिक्युरिटी अॅनालिस्ट म्हणून काम करता येते. या पदासाठी वार्षिक पॅकेज सुमारे १.१२ कोटी रुपये असून, जॉब ग्रोथ २९ टक्के आहे. योग्य कोर्सची निवड केल्यास अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरीसाठी भटकंती करण्याची वेळ येणार नाही. त्यामुळे २०२६ मध्ये परदेशात शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांनी करिअरच्या दृष्टीने विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे आहे.
Web Title: Do these courses in america to earn in high impact