Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Decline of Mughal Empire: ३०० वर्षे राज्य करणारे मुघल साम्राज्य अचानक कसे पत्त्यासारखे कोसळले?जाणून घ्या एका क्लिकवर..

Decline of Mughal Empire: ३०० वर्षे भारतावर राज्य करणारे मुघल साम्राज्य कसे संपले? औरंगजेबाची धोरणे, मराठ्यांचा उदय, नादिर शाहचे आक्रमण आणि इंग्रजांची धूर्तता याबद्दल सविस्तर इतिहास.

  • By श्रेया देशमुख
Updated On: May 16, 2026 | 01:22 PM
Decline of Mughal Empire

Decline of Mughal Empire

Follow Us
Close
Follow Us:

Decline of Mughal Empire: कधीकाळी ‘सोन्याची चिमणी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतावर परकीय आक्रमकांनी जवळपास ३०० वर्षे राज्य केले. बाबरपासून सुरू झालेली सल्तनत हुमायून, अकबर, जहांगीर आणि शाहजहान यांसारख्या बादशहांच्या काळात वैभवाच्या शिखरावर पोहोचली. परंतु, एक काळ असा आला की, हे मुघलांचे बलाढ्य साम्राज्य कुमकुवत होऊ लागले. पण इतके काळ वर्चस्व गाजवणारी मुघल सत्ता संपुष्टात कशी आली? जाणून घेऊया यामागचा इतिहास..

मुघल साम्राज्याची सुरुवात कशी झाली?

भारतात मुघल सत्तेचा पाया वर्ष १५२६ मध्ये पानिपतच्या पहिल्या लढाईनंतर रचला गेला. बाबरने दिल्लीचा सुलतान इब्राहिम लोदी यांचा पराभव करून येथे मुघल वंशाची स्थापना केली. यानंतर हुमायून, अकबर, जहांगीर, शाहजहान यांसारख्या शासकांनी हे साम्राज्य अधिक मजबूत केले. विशेषत: अकबरच्या काळात मुघल सत्ता सर्वोच्च शिखरावर होती. यावेळी प्रशासन सैन्य आणि अर्थव्यवस्था मजबूत झाली होती. परंतु नंतरच्या दशकात सत्ता संघर्षामुळे साम्राज्याचा पाया कुमकुवत होऊ लागला.

SBI Recruitment 2026: स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती! दरमहा ८० हजारांपर्यंत मानधन; ‘या’ तारखेपूर्वी करा ऑनलाइन अर्ज

औंरंगजेबाच्या काळात काय बदलले?

औरंगजेबच्या काळात (१६५८ ते १७०७) मुघल साम्राज्याचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला. परंतु, खऱ्या पतनाची सुरुवात येथूनच झाली. औरंगजेबच्या कडक धोरणे आणि धार्मिक मोहिमांमुळे मराठा, शीख आणि राजपूत यांसारखे शक्तीशाली गट त्याचे कट्टर शत्रू बनले. तसेच यांच्यातील सातत्यपूर्ण सत्तासंघर्षामुळे मुघलांचा खजिना रिकामा होऊ लागला. १७०७ मध्ये औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघलांची सत्ता दरबारी आणि सरदारांच्या हातात जाऊ लागली.

मराठे आणि परकीय आक्रमणांनी मुघलांना कसे संपवले?

याच काळात मराठ्यांनी मुघलांचे प्रदेश जिंकून घेत दिल्लीपर्यंत आपली ताकद दाखवून दिली. यामुळे मुघलांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली. त्यानंतर १७३९ मध्ये पर्शियाचा शासक नादिर शाह याने कर्नालच्या लढाईत मुघलांचा पराभव केला आणि दिल्लीत प्रचंड लूटमार केली. त्यांनी कोहिनूरच्या हिऱ्यासह अफाट संपत्ती लूटली होती. यानंतर अहमद शाह अब्दालीने १७४८ ते १७६७ दरम्यान भारतावर अनेकदा आक्रमणे केली. या आक्रमणांमुळे मुघल सत्ता पूर्णपणे जेरीस आली.

Aircraft : विमानाचे वजन टनांमध्ये, पंख एकदम पातळ; मग हवेत उडताना हे पंख तुटत का नाहीत? जाणून घ्या यामागचे कारण..

शेवटचा घाव कोणी घातला?

मुघल पूर्णपणे कुमकुवत झाली असताना ईस्ट इंडिया कंपनीने भारतात आपली पकड मजबूत करण्यास सुरुवात केली. १७५७ ची प्लीसीची लढाई आणि १७६४ ची बक्सारची लढाई जिंकल्यावर इंग्रजांनी मुघल बादशहा शाह आलम दुसरा याला नियंत्रणाखाली घेतले. इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्या मते, यानंतर मुघल बादशहा नावापुरते शासक राहिले. पुढे १८५७ च्या लढ्यात बहादूर शाह जफरला बंडखोरांचा मुख्य नेता बनवण्यात आले. परंतु इंग्रजांनी हा उठाव मोडून काढून त्याला कैदेत ठेवले आणि १८६२ मध्ये त्याचा मृत्यू झाल्यानंतर मुघल राजवटीचा अधिकृतपणे शेवट झाला.

Web Title: Downfall of mughal empire history reasons maratha pressure british rule

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 01:22 PM

Topics:  

  • british government
  • History
  • India History

संबंधित बातम्या

British Era Institutions: शाळा, पोस्ट ऑफिस आणि तुरुंग; भारतात ‘या’ ब्रिटीशकालीन संस्थांची सुरुवात कधी झाली?
1

British Era Institutions: शाळा, पोस्ट ऑफिस आणि तुरुंग; भारतात ‘या’ ब्रिटीशकालीन संस्थांची सुरुवात कधी झाली?

Mundeshwari Devi Temple: भारतातील सर्वात प्राचीन मंदिर कोणत्या शहरात आहे? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..
2

Mundeshwari Devi Temple: भारतातील सर्वात प्राचीन मंदिर कोणत्या शहरात आहे? जाणून घेण्यासाठी एकदा वाचाच..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.