Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

DRDO Recruitment 2026: सीएबीएसमध्ये 10 ज्युनियर रिसर्च फेलो पदांसाठी भरती! भरतीला सुरुवात

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत सेंटर फॉर एअरबॉर्न सिस्टीम्स (CABS), बेंगळुरू येथे ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) ची 10 पदे भरण्यात येणार आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 14, 2026 | 03:00 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) अंतर्गत कार्यरत असलेल्या सेंटर फॉर एअरबॉर्न सिस्टीम्स (CABS), बेंगळुरू येथे तरुण आणि पात्र संशोधकांसाठी भरती प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या अंतर्गत ज्युनियर रिसर्च फेलोशिप (JRF) साठी एकूण 10 पदे भरली जाणार असून, यासाठी भारतीय नागरिकांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवारांना 25 व 26 फेब्रुवारी 2026 रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या वॉक-इन इंटरव्ह्यूमध्ये सहभागी होता येणार आहे.

विदेशी व्यापारातील BBA अभ्यासक्रम! नक्की काय आहेत पात्रता निकष? वाचा

या भरतीसाठी उमेदवाराकडे संबंधित अभियांत्रिकी शाखेत प्रथम श्रेणीत BE/BTech पदवी असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर उमेदवाराकडे वैध GATE स्कोअर असणे बंधनकारक आहे. विशेष बाब म्हणजे या भरतीसाठी फक्त GATE 2024 आणि GATE 2025 या वर्षांतील स्कोअरच ग्राह्य धरले जाणार आहेत. याशिवाय, ज्या उमेदवारांनी पदवी व पदव्युत्तर शिक्षण दोन्ही स्तरांवर संबंधित शाखेत प्रथम श्रेणीत ME/MTech पदवी पूर्ण केली आहे, असे उमेदवारही या भरतीसाठी पात्र ठरणार आहेत.

वयोमर्यादेच्या दृष्टीने पाहता, 31 डिसेंबर 2025 रोजी उमेदवाराचे वय 28 वर्षांपेक्षा अधिक नसावे. मात्र, शासनाच्या नियमांनुसार आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सवलत देण्यात येणार आहे. त्यानुसार अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (SC/ST) उमेदवारांना 5 वर्षांची, तर इतर मागासवर्गीय (OBC – नॉन-क्रीमी लेयर) उमेदवारांना 3 वर्षांची वयोमर्यादा सवलत लागू राहील. सर्व उमेदवार भारतीय नागरिक असणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी निवड प्रक्रिया पूर्णपणे वॉक-इन इंटरव्ह्यूच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. इंटरव्ह्यूच्या दिवशी प्रथम उमेदवारांच्या अर्जांची आणि आवश्यक कागदपत्रांची तपासणी (Verification) केली जाईल. त्यानंतर पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैयक्तिक मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. मुलाखतीनंतर उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार एक पॅनल तयार करण्यात येणार असून, हे पॅनल एक वर्षासाठी वैध राहील. सदर पॅनलचा उपयोग सध्याच्या तसेच भविष्यात निर्माण होणाऱ्या रिक्त पदांसाठीही करण्यात येणार आहे.

IAS देवयानी यादवने कशी स्पर्धा परीक्षा केली पार? दृढनिश्चयाने मिळविले यश

वॉक-इन इंटरव्ह्यूचे आयोजन सेंटर फॉर एअरबॉर्न सिस्टीम्स (CABS), संरक्षण मंत्रालय, बेलूर, येमलूर पोस्ट ऑफिस, बेंगळुरू – 560037 येथे करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सर्व आवश्यक मूळ कागदपत्रे व त्यांच्या प्रतींसह वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Web Title: Drdo recruitment 2026 marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 14, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Career
  • Recruitment News

संबंधित बातम्या

अकरावी प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १.५३ लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित
1

अकरावी प्रवेश प्रक्रियेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; १.५३ लाख विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित

Career Guidance: खेळात रस आहे? १० वी-१२ वीनंतर स्पोर्ट्स आणि फिटनेस इंडस्ट्रीत करिअर करुन बक्कळ पैसा कमावण्याचे मार्ग!
2

Career Guidance: खेळात रस आहे? १० वी-१२ वीनंतर स्पोर्ट्स आणि फिटनेस इंडस्ट्रीत करिअर करुन बक्कळ पैसा कमावण्याचे मार्ग!

अकरावी प्रवेशाचा ‘श्रीगणेशा’! पहिली गुणवत्ता यादी जाहीर; तब्बल 5 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना…
3

अकरावी प्रवेशाचा ‘श्रीगणेशा’! पहिली गुणवत्ता यादी जाहीर; तब्बल 5 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.