Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Portal Security Flaw: दुबईतील १२ वीच्या विद्यार्थ्याने उघड केली ‘NTA’ची गंभीर चूक; विद्यार्थ्यांचा डेटा होता धोक्यात!

NTA Portal Security Flaw: दुबईतील १६ वर्षीय सीबीएसई विद्यार्थी रायलन अनिलने नीट आणि जेईई परीक्षा पोर्टल मधील बॅकएंड आर्किटेक्चरची मोठी सुरक्षा त्रुटी उघडकीस आणली.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 14, 2026 | 10:52 AM
ethical hacking

ethical hacking

Follow Us
Follow Us:

NTA Portal Security Flaw: देशामध्ये सध्या सीबीएसई (CBSE) आणि नीट (NEET) परीक्षा हा मोठ्या चर्चेचा विषय बनला आहे. यापूर्वी सार्थक आणि निसर्ग यांनी एथिकल हॅकिंगच्या (Ethical Hacking) माध्यमातून सीबीएसईला आरसा दाखवला होता; तर आता दुबईत राहणाऱ्या एका सीबीएसईच्या विद्यार्थ्याने एनटीएची (NTA)  बाबत खुलासा केला आहे. १६ वर्षांच्या रायलन अनिल याने नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या (NTA) पोर्टलवरील एक गंभीर तांत्रिक सुरक्षा चूक (Security Flaw) उघडकीस आणली आहे. फक्त ५ दिवसांमध्ये त्याने नीट परीक्षेसह जेईई ॲडव्हान्स्डच्या (JEE Advanced) परीक्षा पोर्टल मधील त्रुटी शोधून काढल्या आणि त्याबाबत एनटीएला रिपोर्ट केला.

Digvijaya Singh letter to PM Modi: सीबीएसई त्रि-भाषा धोरणावर दिग्विजय सिंग यांचे पंतप्रधान मोदींना पत्र; केली ‘ही’ मोठी मागणी

कोण आहे रायलन अनिल?

१६ वर्षांचा रायलन अनिल हा मूळचा दुबईचा रहिवासी आहे. सध्या तो सीबीएसई बोर्डाच्या एका शाळेतून इयत्ता १२ वीचे शिक्षण घेत आहे. रायलनला एथिकल हॅकिंगमध्ये प्रचंड रस आहे. इयत्ता ८ वीपासूनच त्याला कॉम्प्युटर कोडिंग आणि ‘लिनक्स ऑपरेटिंग सिस्टम’मध्ये (Linux Operating System) विशेष आवड होती. विशेष म्हणजे, रायलनने हे कौशल्य कोणत्याही संस्थेतून शिकलेले नाही, तर ऑनलाईन सिक्युरिटी गेम्स आणि ‘बग बाउंटी’ (Bug Bounty) प्रोग्राम्समध्ये भाग घेऊन त्याने स्वतः हे स्किल्स आत्मसात केले आहेत. भविष्यात त्याला ‘चीफ इन्फॉर्मेशन सिक्युरिटी ऑफिसर’ (CISO) म्हणून काम करायचे आहे.

NTA च्या ‘या’ गंभीर त्रुटी केल्या उघड

रायलन अनिलने दिलेल्या माहितीनुसार, त्याने ३१ मेच्या रात्री एनटीएच्या ‘री-नीट एक्झाम पोर्टल’च्या (Re-NEET Exam Portal) तांत्रिक सुरक्षेची तपासणी केली. नीट एक्झाम पोर्टलची सुरक्षा तपासण्यासाठी त्याला साधारण तीन तासांचा वेळ लागला. या तपासणी दरम्यान त्याला पोर्टलच्या ‘बॅकएंड आर्किटेक्चर’ मधील (Backend Architecture) एक मोठी त्रुटी आढळून आली. रायलनच्या मते, या तांत्रिक बिघाडामुळे पोर्टलचे मुख्य पेज सहज ‘बायपास’ (Bypass) करता येत होते, ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक डेटापर्यंत (Personal Data) सहज पोहोचणे शक्य होते. यानंतर त्याने तात्काळ भारताची सायबर एजन्सी ‘CERT-In’ कडे या संदर्भात रिपोर्ट दाखल केला आणि १० मिनिटांनंतर ‘एक्स’ (X) अकाउंटवर याबद्दल पोस्ट शेअर केली.

NEET UG 2026: नीट परीक्षार्थींना मोठा दिलासा! पाहा NTA चे ‘हे’ ३ मोठे बदल एका क्लिकवर..

यावर NTA ने काय म्हटले?

एनटीएकडून आभार व्यक्त: नीट आणि जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेच्या पोर्टलवरील या गंभीर त्रुटीची माहिती मिळताच, एनटीएच्या अधिकाऱ्यांनी रायलनला एका अधिकृत ईमेलद्वारे धन्यवाद दिले. यानंतर अधिकाऱ्यांनी रायलनशी संपर्क साधला, तेव्हा त्याने हे पोर्टल तात्काळ बंद करण्याचा सल्ला दिला. सायबर सुरक्षेला प्राधान्य देत एनटीएने ते पोर्टल तातडीने बंद केले. एनटीएने घेतलेल्या या जलद निर्णयामुळे रायलन अत्यंत आनंदी आहे. आपल्या सरकारी यंत्रणेत अशा अनेक तांत्रिक त्रुटी आहेत आणि त्या वेळेतच दुरुस्त केल्या पाहिजेत, असे मत रायलनने व्यक्त केले आहे.

Web Title: Dubai cbse student raylan exposes nta neet jee portal security flaw marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 14, 2026 | 10:52 AM

Topics:  

  • Cyber security
  • JEE
  • NEET Exam

संबंधित बातम्या

NEET UG 2026: नीट परीक्षार्थींना मोठा दिलासा! पाहा NTA चे ‘हे’ ३ मोठे बदल एका क्लिकवर..
1

NEET UG 2026: नीट परीक्षार्थींना मोठा दिलासा! पाहा NTA चे ‘हे’ ३ मोठे बदल एका क्लिकवर..

NEET Re-Exam UG 2026: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! NTA ने वाढवली परीक्षांची वेळ, सुरक्षेचा होणार कडेकोट बंदोबस्त
2

NEET Re-Exam UG 2026: विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! NTA ने वाढवली परीक्षांची वेळ, सुरक्षेचा होणार कडेकोट बंदोबस्त

NEET रद्द होणार का? मुख्यमंत्री Thalapathy Vijay ने वैद्यकीय प्रवेशासाठी सुचवला नवा फॉर्म्युला
3

NEET रद्द होणार का? मुख्यमंत्री Thalapathy Vijay ने वैद्यकीय प्रवेशासाठी सुचवला नवा फॉर्म्युला

NEET 2026 Exam : ‘नीट’ फेरपरीक्षा ‘या’ तारखेला होणार; पेपर लीकच्या अफवांवर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचे मोठे विधान पहा एका क्लिकवर..
4

NEET 2026 Exam : ‘नीट’ फेरपरीक्षा ‘या’ तारखेला होणार; पेपर लीकच्या अफवांवर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचे मोठे विधान पहा एका क्लिकवर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.