Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आदेश रद्द न केल्यास शिक्षण महामंडळ कोर्टात! अपात्र शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप

छत्रपती संभाजीनगरमध्ये शासनाच्या १ व २ एप्रिलच्या आदेशाविरोधात शिक्षण संस्था महामंडळ आक्रमक झाले आहे. अपात्र शाळांची मान्यता रद्द करण्याचा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 15, 2026 | 04:33 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

छत्रपती संभाजीनगर : राज्य शासनाच्या १ व २ एप्रिल रोजी जारी करण्यात आलेल्या आदेशांविरोधात महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून, हे आदेश रद्द न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. अपात्र ठरवण्यात आलेल्या शाळांबाबत घेतलेला निर्णय अन्यायकारक असल्याचे सांगत महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांची भेट घेतली. या बैठकीत विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

Roinet Solution Pvt Ltd ने केला Bank Sakhi चा विस्तार! दरमहा 50 हजार उत्पन्नाची संधी उपलब्ध

महामंडळाच्या शिष्टमंडळाने शिक्षणमंत्र्यांसमोर मांडलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले की, शासनाच्या आदेशानुसार अपात्र शाळांची मान्यता रद्द करून त्यांना स्वयंअर्थसहाय्यीत करण्याचा निर्णय हा अन्यायकारक आहे. गेल्या १० ते १५ वर्षांपासून कार्यरत असलेल्या शिक्षकांवर या निर्णयाचा थेट परिणाम होणार असून, त्यांच्या सेवाभावाचा विचार करण्यात आलेला नाही. शाळा अपात्र ठरण्यामागे केवळ संस्थाच जबाबदार नसून शासन आणि प्रशासनाचीही तितकीच जबाबदारी आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

संस्थांनी वेळोवेळी शासनाने निर्देशित केलेल्या त्रुटींची पूर्तता केली असूनही त्यांना अपात्र घोषित करण्यात आले, ही बाब गंभीर असल्याचे महामंडळाने सांगितले. याशिवाय, चालू शैक्षणिक वर्षात दोन वेळा पटपडताळणी झाल्यानंतरही पुन्हा पडताळणी करण्यात येत असल्याबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली. सदर पटपडताळणीचा परिणाम संच मान्यतेवर होऊ नये, तसेच पुढील शैक्षणिक वर्षासाठीच ती लागू करावी, अशी मागणी करण्यात आली.

SSC Sarkari Job Alert: बंपर सरकारी भरती! तब्बल 3003 रिक्त पदांसाठी अधिसूचना जारी; पाहा कोण करु शकतं अर्ज?

या पार्श्वभूमीवर शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी २८ एप्रिलपर्यंत संबंधित सर्व पक्षांसोबत बैठक घेऊन अंतिम निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले आहे. या बैठकीत आमदार रोहित पवार, माजी आमदार विजय गच्काणे, प्रा. नरेंद्र काळे, प्रा. मनोज पाटील, वाल्मिक सुरासे, भास्कर म्हस्के, गजानन दिग्रस्कर आणि जागृती धर्माधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

महामंडळाने स्पष्ट इशारा दिला आहे की, जर शासनाने हा आदेश मागे घेतला नाही, तर न्यायालयीन लढाईचा मार्ग स्वीकारला जाईल. त्यामुळे राज्यातील शैक्षणिक क्षेत्रात पुढील काही दिवसांत मोठी घडामोड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Web Title: Education corporation threatens legal action if order is not revoked

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 04:33 PM

Topics:  

  • Career
  • Chhatrapati Sambhaji Nagar

संबंधित बातम्या

Bombay High Court लिपिक टायपिंग परीक्षेत गोंधळ; संभाजीनगरात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, अभिजीत दीपके म्हणाले ‘आता हेच जंतर-मंतर
1

Bombay High Court लिपिक टायपिंग परीक्षेत गोंधळ; संभाजीनगरात विद्यार्थ्यांचे ठिय्या आंदोलन, अभिजीत दीपके म्हणाले ‘आता हेच जंतर-मंतर

देवळाई रस्त्यावरील 15 मालमत्तांवर हातोडा; तीन मजली दोन इमारतींचा समावेश
2

देवळाई रस्त्यावरील 15 मालमत्तांवर हातोडा; तीन मजली दोन इमारतींचा समावेश

German language: इंग्रजीसोबतच जर्मन भाषा ठरत आहे रोजगाराची नवी चावी! जाणून घ्या शिकल्यानंतर कोणकोणत्या क्षेत्रात मिळू शकते नोकरी
3

German language: इंग्रजीसोबतच जर्मन भाषा ठरत आहे रोजगाराची नवी चावी! जाणून घ्या शिकल्यानंतर कोणकोणत्या क्षेत्रात मिळू शकते नोकरी

EdTech career: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रात नवपदवीधरांना बक्कळ संधी
4

EdTech career: नोकरी शोधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ‘या’ क्षेत्रात नवपदवीधरांना बक्कळ संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.