१२१ 'शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि हमी आराखड्या' (SQAAF) अंतर्गत स्वयं-मूल्यांकन प्रक्रियेसाठी मुदतवाढ देण्यात आली (फोटो - सोशल मीडिया)
Self-evaluation deadline Extension : पुणे : राज्यातील सर्व शाळांच्या गुणवत्तेचे मूल्यमापन करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि हमी आराखडा (एसक्यूएएएफ) अंतर्गत स्व-मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे (Pune News) यांनी शाळांना मुदतवाढ दिली आहे.
सहसंचालक डॉ. कमलादेवी आवटे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांसाठी एसक्यूएएएफ अंतर्गत स्व-मूल्यमापन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासाठी संबंधित लिंक १६ मार्च २०२६ पासून १५ एप्रिल २०२६ पर्यंत उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र, अनेक शाळांकडून मुदतीत माहिती भरणे शक्य न झाल्याने शिक्षणाधिकाऱ्यांनी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती.
हे देखील वाचा : TCS कडून कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट! आता कोणाचाही Job जाणार नाही; नोकरकपात थांबवली, पगारातही होणार मोठी वाढ?
त्या पार्श्वभूमीवर आता ही मुदत वाढवून १ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. या कालावधीत सर्व शाळांनी एसक्यूएएएफ अॅप/पोर्टलवर स्व-मूल्यमापन पूर्ण करणे अपेक्षित आहे.
राज्यातील शाळांची गुणवत्ता सुधारण्यासाठी एसक्यूएएएफ आराखडा तयार करण्यात आला असून, त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्राचार्य, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, तसेच शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांच्यावर सोपविण्यात आली आहे. शाळांनी केलेल्या स्व-मूल्यमापनाच्या आधारे पुढील विकास आराखडा तयार केला जाणार आहे.
तसेच, सर्व शाळांनी दिलेल्या मुदतीत माहिती भरण्यासाठी जिल्हास्तरावर ऑनलाइन व ऑफलाइन बैठकींचे आयोजन करून मार्गदर्शन करण्याच्या सूचना संबंधित प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
हे देखील वाचा : भारतीय वायू दलात अभियंत्यांसाठी मोठ्या संधी; डी. वाय. पाटील अभियांत्रिकीमध्ये वायू दल अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन
स्वयं-मूल्यांकनासाठीची लिंक
सन २०२५-२६ मध्ये शाळांचे स्वयं-मूल्यांकन पूर्ण करण्यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांच्या maa.ac.in या वेबसाईटवरील एसक्यूएएएफ टॅबमध्ये स्वयं-मूल्यांकनासाठीची लिंक मुदतवाढीसह दि.१ मे २०२६ रोजी सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत उपलब्ध करून देण्यात येत आहे.






