Today's Maharashtra Breaking News Updates in marathi 15.10.2026
Maharashtra to World Breaking News :
दिल्लीतील जंतर-मंतर आंदोलनानंतर दिल्ली विमानतळाबाहेर CJP नेते अभिजीत दीपके यांना घेरण्याचा प्रयत्न; १६ ऑक्टोबरला ‘कनॉट प्लेस’ येथे नव्या आंदोलनाची घोषणा देण्यात आला आहे. भारतीय टी-२० संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरने दमदार कामगिरीच्या जोरावर आयसीसी टी-२० फलंदाजी क्रमवारीत चौथ्या स्थानावर झेप घेतली.
हुथी विद्रोही गटाच्या हल्ल्यानंतर सौदी अरेबियातील धहरान येथील ‘अरामको’ (Aramco) कंपनीच्या मुख्यालयात भीषण आग, सुदैवाने जीवितहानी टळली.
15 Oct 2026 09:40 AM (IST)
Supreme Court Hearing Gyanesh Kumar: मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात 'इंडिया' (INDIA) आघाडीने रान उठवले आहे. मतदार याद्यांमधील कथित अनियमितता, मोठ्या प्रमाणावर नावे वगळणे आणि विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेत मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांतील ११ प्रमुख नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केली आहे. या महत्त्वपूर्ण याचिकेवर आज सुनावणी होणार असून संपूर्ण देशाचे लक्ष याकडे लागले आहे. विरोधी पक्षांच्या तीव्र निदर्शनांनंतर राहुल गांधी आणि इतर नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
15 Oct 2026 09:30 AM (IST)
राज्य सरकारने छोट्या, निरुपयोगी आणि अडकलेल्या (Land-locked) सरकारी जमिनींच्या विल्हेवाट लावण्याच्या धोरणात मोठे बदल करत यासंदर्भातील मर्यादा वाढवण्यास मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे आता लगतच्या भूखंडधारकांना मिळणाऱ्या सरकारी जमिनींचे क्षेत्रफळ वाढणार आहे.
ऑगस्ट २०२५ च्या धोरणानुसार, अशा प्रकारच्या जमिनी लगतच्या (शेजारील) भूखंडधारकाला देताना त्याचे क्षेत्रफळ लगतच्या जमिनीच्या एकूण क्षेत्राच्या १० टक्क्यांपेक्षा जास्त नसावी, अशी अट होती. मात्र, लोकप्रतिनिधींच्या सततच्या मागणीनंतर सरकारने ही मर्यादा थेट २५ टक्क्यांपर्यंत वाढवली आहे.
15 Oct 2026 09:21 AM (IST)
कॉकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरव दास यांना जंतरमंतरवर तिरंगा फडकावल्या प्रकरणी आणि घोषणाबाजी केल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी अटक केली. त्यानंतर त्यांना पाच दिवसांच्या न्यायालयीन कोठडीतही पाठण्यात आले आहे. या अटकेच्या विरोधाप्रकरणी उद्या १६ ऑक्टोबरला सीजेपी प्रमुख अभिजीत दिपके यांनी देशाला "लेहरा दो तिरंगा " या मोहिमेसाठी साद घातली आहे.
Lehra do Tiranga 🇮🇳
16 Oct | Central Park, CP | 5 PM https://t.co/eFO1RfUBos
— Abhijeet Dipke (@abhijeet_dipke) October 14, 2026
15 Oct 2026 09:15 AM (IST)
Maharashtra Weather Update: राज्यात सध्या हवामानात कमालीची उलथापालथ पाहायला मिळत असून, एकीकडे ऑक्टोबर हीटचा (October Heat) चटका वाढला आहे, तर दुसरीकडे काही भागांत पावसाचे सावट दाटले आहे. राज्यात एकाच वेळी ऊन आणि पाऊस अशी संमिश्र स्थिती निर्माण झाली आहे.
कोकण आणि किनारपट्टी भागात दमट आणि उष्ण वातावरण राहण्याची शक्यता आहे. ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, रायगड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये उष्णतेचा पारा चांगलाच वाढणार असून नागरिकांना घामाच्या धारा सहन कराव्या लागत आहेत. पुढील चार ते पाच दिवस राज्याच्या विविध भागांत पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे.
15 Oct 2026 09:05 AM (IST)
भारतीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. रेल्वे प्रवासाच्या तिकीट दरांबाबत एक मोठा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात असून, आता विमान प्रवासाच्या धर्तीवर रेल्वे तिकिटांचे दरही रोजच्या रोज बदलण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे समजते.
या नव्या सुत्रानुसार प्रवाशांची वाढती मागणी आणि जागांची उपलब्धता (Demand and Supply) विचारात घेऊन तिकिटांचे दर निश्चित केले जातील. या प्रणालीमुळे आज तुम्ही ज्या दराने तिकीट बुक केले आहे, उद्या त्याच तिकिटाची किंमत मागणीनुसार वाढू शकते किंवा स्वस्तही होऊ शकते. एअरलाइन्स कंपन्यांप्रमाणेच गर्दीच्या हंगामात किंवा तातडीच्या प्रवासादरम्यान तिकीट दर वाढण्याची शक्यता यात आहे.
15 Oct 2026 09:01 AM (IST)
सर्वोच्च न्यायालयाने रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसंदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला आहे. त्यानुसार, रेल्वे प्रवासादरम्यान मिळणाऱ्या विम्याच्या नियमांमध्ये आणि उपलब्धतेमध्ये सुधारणा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या ऑनलाइन रेल्वे तिकीट बुक करताना प्रवाशांना विम्याचा पर्याय मिळतो. हा प्रवास विमा घेणे अजिबात बंधनकारक नाही, तर तो पूर्णपणे ऐच्छिक आहे. प्रवाशाला गरज वाटल्यास तो त्यावर टिक करून हा पर्याय निवडू शकतो.
या विम्यासाठी प्रति प्रवासी केवळ ४५ पैसे इतका खर्च येतो. हे विम्याचे पैसे तिकीट शुल्कासोबतच ऑनलाइन भरावे लागतात.हा प्रवास विमा रेल्वे प्रवासादरम्यान होणाऱ्या अपघातांसाठी संरक्षण देतो. प्रवासात एखादी दुर्घटना घडल्यास, पीडित प्रवाशाला १० लाख रुपयांपर्यंतची भरपाई मिळू शकते. म्हणजेच, केवळ ४५ पैशांच्या प्रीमियममध्ये १० लाख रुपयांचे संरक्षण मिळणे प्रवाशांच्या फायद्याचे ठरते.






