Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शालेय शिक्षणाच्या सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रात व्यापक सुधारणा! शालेय शिक्षण विभागाचे नावीन्यपूर्ण उपक्रम

महाराष्ट्रात शालेय शिक्षणाच्या सक्षमीकरणासाठी गेल्या वर्षभरात अनेक महत्त्वपूर्ण आणि नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Dec 26, 2025 | 03:53 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • परसबागांमधील ताजा भाजीपाला आहारात समाविष्ट करण्याचा उपक्रमही राबवला जात आहे
  • ३६ हजारांहून अधिक पदे भरली गेली आहेत
  • सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभाग सातत्याने प्रयत्नशील
 नीता परब: महाराष्ट्राने शालेय शिक्षणाच्या क्षेत्रात गेल्या एका वर्षात महत्त्वपूर्ण पावले उचलत विद्यार्थी, शिक्षक आणि शाळा या त्रिसूत्रीभोवती केंद्रित सुधारणा राबविल्या आहेत. दर्जेदार, समावेशक आणि आधुनिक शिक्षण प्रत्येक बालकापर्यंत पोहोचावे या उद्देशाने शालेय शिक्षण विभागाने विविध नावीन्यपूर्ण उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी या कालावधीतील शैक्षणिक प्रवास हा विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांचा सामूहिक प्रवास असल्याचे नमूद करत शालेय शिक्षणाच्या सक्षमीकरणावर विशेष भर दिला जात असल्याचे स्पष्ट केले आहे.

नीट, जेईई परीक्षांसाठी फेस रिकग्निशन! इतर परीक्षांमध्येही ‘ही’ व्यवस्था जाणार राबवली

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या अनुषंगाने अभ्यासक्रम अधिक विद्यार्थीकेंद्रित, अनुभवाधारित आणि विचारप्रवर्तक करण्यात आला आहे. शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य करण्यात आली असून सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर ‘गर्जा महाराष्ट्र माझा’ हे राज्यगीत गायन बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये महाराष्ट्राचा अभिमान, संस्कृती आणि राष्ट्रीयत्वाची भावना वृद्धिंगत होत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अभ्यासक्रमात समावेश करण्यासाठीही सातत्याने प्रयत्न करण्यात आले आहेत.

विद्यार्थ्यांचा शाळेत प्रवेश उत्साहवर्धक व्हावा यासाठी ‘प्रवेशोत्सव’ साजरा करण्यात येतो. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचे स्वागत करून शिक्षणाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण केले जाते. विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत विशेष हेल्थ ॲप व हेल्थ कार्डची अंमलबजावणी सुरू असून, आधार संलग्न बायोमेट्रिक अद्ययावतीकरण पूर्णत्वास येत आहे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतून पौष्टिक आहार देण्यात येत असून, परसबागांमधील ताजा भाजीपाला आहारात समाविष्ट करण्याचा उपक्रमही राबवला जात आहे.

विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त व्हावे यासाठी ‘निपुण महाराष्ट्र’ अभियान राबवण्यात येत आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने विकसित केलेल्या निपुण महाराष्ट्र ॲपद्वारे एआय आधारित मूल्यमापन केले जाणार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन वाढावा यासाठी विज्ञान प्रदर्शनांच्या बक्षीस रकमेत वाढ करण्यात आली असून ‘मुख्यमंत्री विद्यार्थी विज्ञान वारी’ अंतर्गत विद्यार्थ्यांना नासा, इस्रो आणि विज्ञान केंद्रांना भेटीची संधी मिळणार आहे. शिष्यवृत्ती परीक्षांबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला असून, चौथी आणि सातवीसाठी पुन्हा शिष्यवृत्ती परीक्षा लागू करण्यात आली आहे. शिक्षक भरतीसाठी ‘पवित्र पोर्टल’द्वारे पारदर्शक प्रक्रिया राबवून ३६ हजारांहून अधिक पदे भरली गेली आहेत. शालेय स्तरावर समित्यांचे एकत्रीकरण करून शिक्षकांवरील प्रशासकीय भार कमी करण्यात आला आहे.

MPSC News: कृषी सेवा मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर; 827 उमेदवार मुलाखातीस पात्र, तर…

पीएमश्री आणि प्रस्तावित सीएमश्री शाळांच्या माध्यमातून आदर्श शाळा विकसित करण्यावर भर देण्यात येत असून स्मार्ट क्लासरूम, ग्रंथालय, क्रीडासुविधा आणि डिजिटल साधनांचा विस्तार केला जात आहे. विद्यार्थिनींसाठी ‘पिंक रूम’ची संकल्पना, सैनिकी शिक्षण आणि मूल्यशिक्षणाचे उपक्रमही सुरू करण्यात आले आहेत. एकूणच, शालेय शिक्षणाचा दर्जा उंचावून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्रातील शालेय शिक्षण विभाग सातत्याने प्रयत्नशील असून, या निर्णयांमुळे शिक्षण व्यवस्थेत सकारात्मक बदल घडतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Web Title: Extensive reforms in maharashtra for the empowerment of school education

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2025 | 03:52 PM

Topics:  

  • education

संबंधित बातम्या

एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंटमध्ये करियर कसे करावे? ‘या’ प्रक्रिया फॉलो करून मिळवता येईल ट्रॅव्हल मॅनेजमेंट कोर्स
1

एअर ट्रॅव्हल मॅनेजमेंटमध्ये करियर कसे करावे? ‘या’ प्रक्रिया फॉलो करून मिळवता येईल ट्रॅव्हल मॅनेजमेंट कोर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.