फोटो सौजन्य - Social Media
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) रुडकीने GATE 2025 परीक्षेची Answer Key अधिकृतपणे जाहीर केली आहे. ही Answer Key ऑनलाईन पाहता येणार आहे. Answer Key पाहण्यासाठी GATE 2025 परीक्षेस उपस्थित राहिलेल्या उमेदवारांनी gate.iitr.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. उमेदवारांना त्यांचे उत्तरे तपासण्यासाठी ही उत्तरतालिका पाहण्याची आणि डाउनलोड करण्याची संधी मिळणार आहे.
जर उमेदवारांना Answer Key मधील कोणत्याही उत्तरावर आक्षेप असेल, तर ते १ मार्च २०२५ पर्यंत अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आक्षेप नोंदवू शकतात. यासाठी ठरावीक शुल्क आकारले जाणार असून, संस्थेकडून सर्व आक्षेपांची तपासणी करून अंतिम उत्तरतालिका जाहीर केली जाईल.
GATE 2025 Answer Key कशी डाउनलोड कराल?
GATE 2025 परीक्षेसाठी उपस्थित उमेदवार खालील पद्धतीने Answer Key डाउनलोड करू शकतात:
GATE 2025 अंतिम उत्तरतालिका आणि निकाल
सर्व आक्षेपांची तपासणी केल्यानंतर IIT रुडकी अंतिम उत्तरतालिका जाहीर करेल. अंतिम उत्तरतालिका मार्च महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे. तसेच या परीक्षेचा निकालही मार्च महिन्यात जाहीर करण्यात येणार आहे. उमेदवारांनी दिलेल्या वेळेत Answer Key तपासून योग्य ती कारवाई करावी. निकाल आणि अंतिम उत्तरतालिकेविषयी कोणतीही अधिकृत तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नाही आहे. GATE 2025 परीक्षा देशामध्ये फेब्रुवारी महिन्यात आयोजित करण्यात आली होती. १ फेब्रुवारी रोजी GATE परीक्षा २०२५ आयोजित करण्यात आली होती. तसेच या परीक्षेचे आयोजन २ फेब्रुवारी, १५ फेब्रुवारी आणि १६ फेब्रुवारी २०२५ला करण्यात आले होते.