फोटो सौजन्य - Social Media
SBI बँकने SO रिक्रुटमेंट जाहीर केली आहे. या संबंधित अधिसूचना जाहीर करण्यात आली होती. मॅनेजर तसेच Dy. मॅनेजरच्या पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली होती. उमेदवारांना या भरती संदर्भात एक महत्वाची बातमी आहे. मुळात, अर्ज करण्याची मुदत आता वाढवण्यात आली आहे. एकूण ४२ रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. १ फेब्रुवारीपासून या भरतीसाठी अर्ज करण्यात येणार होते. आता ही मुदत ३ मार्च २०२५ पर्यंत ढकलण्यात आली आहे. एकूण ४२ रिक्त जागांसाठी ही भरतीची प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. चला तर मग या भरतीच्या प्रक्रियेविषयी जाणून घेऊयात:
या भरती संदर्भात अधिकृत माहिती अधिसूचनेमध्ये नमूद आहे. अधिसूचनेनुसार, उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात येईल. उमेदवारांना अर्ज करताना काही रक्कम अर्ज शुल्क म्हणून भरावी लागणार आहे. जनरल प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून ७५० रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. तर OBC आणि EWS प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील सारखीच रक्कम भरायची आहे. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना अगदी निशुल्क अर्ज करता येणार आहे. PWD प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांनादेखील अगदी निशुल्क अर्ज करायचे आहे. अर्ज ऑनलाईन स्वरूपात करायचे आहे.
उमेदवारांना अर्ज करताना काही पात्रता निकषांना पात्र करावे लागणार आहे. हे निकष शैक्षणिक आहेत तसेच उमेदवारांच्या वयोमर्यादेसंदर्भात आहेत. किमान २६ वर्षे आयु असणारे उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात. तर जास्तीत जास्त वय ३६ वर्षे निश्चित करण्यात आले आहे. Dy. Manager च्या पदासाठी किमान आयु २४ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. तर जास्तीत जास्त आयु ३२ वर्षे निश्चित करण्यात आली आहे. मॅनेजरच्या पदासाठी एकूण १३ पदे रिक्त आहेत. तर Dy. मॅनेजरच्या पदासाठी एकूण २९ जागा रिक्त आहेत.
एकूण ४ टप्प्यांमध्ये उमेदवारांची निवड केली जाणार आहे. यामध्ये सुरुवातीला उमेदवारांना शोर्टलिस्ट केले जाईल. उमेदवारांना मुलाखतीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. दस्तऐवजांची पडताळणीसाठी उमेदवारांना उपस्थित राहावे लागणार आहे. तसेच उमेदवारांना वैद्यकीय चाचणीला पात्र करावे लागणार आहे. अशा प्रकारे सर्व ४ टप्प्यांना पात्र करत उमेदवारांना नियुक्तीसाठी पात्र होता येणार आहे.