Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई विद्यापीठात ग्लोबल शिक्षणाची द्वारे; परदेशी शिक्षण आणि शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यशाळेत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावरील संधींचा आत्मविश्वासाने स्वीकार करून स्वतःची क्षमता विकसित करावी.

  • By श्वेता झगडे
Updated On: Mar 24, 2026 | 12:15 PM
मुंबई विद्यापीठात ग्लोबल शिक्षणाची द्वारे; विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षण आणि शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद (फोटो सौजन्य-Gemini)

मुंबई विद्यापीठात ग्लोबल शिक्षणाची द्वारे; विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षण आणि शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद (फोटो सौजन्य-Gemini)

Follow Us
Follow Us:
  • मुंबई विद्यापीठात ग्लोबल शिक्षणाची द्वारे
  • विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिक्षण आणि शिष्यवृत्ती मार्गदर्शन कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
  • संधींचा आत्मविश्वासाने स्वीकार करून स्वतःची क्षमता विकसित करावी
मुंबई : अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधींबाबत स्पष्ट दिशा मिळावी आणि योग्य नियोजन करता यावे, या उद्देशाने मुंबई विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या एकदिवसीय कार्यशाळेत तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय संशोधन केंद्र, डॉ. आंबेडकर चेअर, आंबेडकर सेंटर ऑफ एक्सलन्स आणि सोशल स्टडीज फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यानगरी येथील ‘ग्रीन टेक्नॉलॉजी ऑडिटोरियम’ मध्ये ही कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांनी जागतिक स्तरावरील संधींचा आत्मविश्वासाने स्वीकार करून स्वतःची क्षमता विकसित करावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. तसेच अशा मार्गदर्शनपर उपक्रमांचा विस्तार विद्यापीठाच्या परिक्षेत्रातील सर्व जिल्ह्यांपर्यंत करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यशाळेचे प्रमुख आकर्षण म्हणजे विविध क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञांचे मार्गदर्शन सत्र हे ठरले.

विद्यार्थ्यांनो All The Best! उद्यापासून सुरू होणार ‘ही’ महत्वाची परीक्षा; तब्बल 17 लाख…

विविध तज्ज्ञांच्या सत्रांमध्ये सविस्तर मार्गदर्शन

‘माईंडक्राफ्ट’ संस्थेमार्फत घेण्यात आलेल्या सायकॉमैट्रिक चाचणीद्वारे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व, कौशल्ये आणि आवडी-निवडींचे विश्लेषण करून त्यांना योग्य करिअर पर्यायांची दिशा दाखविण्यात आली.

या चाचणीमुळे विद्यार्थ्यांना स्वतःची क्षमता ओळखून योग्य निर्णय घेण्यास मदत झाली. तज्ज्ञांच्या सत्रांमध्ये परदेशी शिक्षणासाठी आवश्यक असलेली कौशल्ये, अर्ज प्रक्रिया, स्टेटमेंट ऑफ पर्पज, तसेच मुलाखत तंत्र यावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. डॉ. चंद्रशेखर मालवी यांनी ‘लाईफ स्किल्स’चे महत्त्व अधोरेखित करत संवाद कौशल्य, आत्मविश्वास आणि वेळ व्यवस्थापन यांसारख्या गुणांची जागतिक स्तरावर असलेली गरज स्पष्ट केली.

डॉ. शशी चाला यांनी ‘नॅशनल ओव्हरसीज स्कॉलरशिप’ योजनेची सखोल माहिती देत पात्रता निकष, अर्ज प्रक्रिया आणि लाभ यांचे सुस्पष्ट मार्गदर्शन केले.

परदेशातील शिक्षण योजनांबाबत माहिती

डॉ. अनुप कुमार तिवारी यांनी विविध खासगी शिष्यवृत्तींचे पर्याय आणि त्यासाठीची व्यूहरचना उलगडून सांगितली. त्यांनी सर्व प्रगत देशांतील विविध क्षेत्रामधील शिष्यवृत्तीची माहिती देताना प्रत्येक देशातील शिष्यवृत्तीसाठीची पात्रता, शिष्यवृत्तीचे स्वरूप, एकूण रक्कम, कालावधी आणि अटी यांची विस्तृत माहिती दिली.

तर एडवर्ड मेंढे यांनी महाराष्ट्र शासनाच्या परदेशी शिक्षण योजनांची माहिती देत विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्याच्या विविध पर्यायांची जाणीव करून दिली. तज्ज्ञांच्या अनुभवाधारित मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना केवळ माहितीच नव्हे, तर प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करण्याची दिशा मिळाली.

संवाद सत्रात शंकांचे निरसन; मिळाली स्पष्टता

अनेक विद्याथ्यांनी संवाद सत्रात शंका विचारून आपल्या करिअर नियोजनाबाबत स्पष्टता मिळवली.
गुणवत्ता असूनही माहितीअभावी अनेक विद्यार्थी जागतिक संधींपासून वंचित राहतात, ही बाब लक्षात घेऊन अशा प्रकारच्या कार्यशाळा अत्यंत उपयुक्त ठरत असल्याचे आयोजकांनी सांगितले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. मनीषा कर्णे यांनी कार्यशाळेच्या उद्दिष्टांची रूपरेषा स्पष्ट केली. यावेळी डॉ. संतोष राठोड, डॉ. राकेश मालुसरे, हरी सोवनी, विजेंद्र सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.

IAS ची 1300 पदं रिक्त, देशाची प्रशासकीय व्यवस्था चालणार कशी? ‘या’ राज्यावर सर्वाधिक तीव्र संकट

 

Web Title: Gateway to global education at mumbai university enthusiastic response to foreign education and scholarship guidance workshop for students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 24, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • education
  • Mumbai University

संबंधित बातम्या

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
1

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या
2

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड
3

NEET PG 2026 चा निकाल जाहीर! वैद्यकीय प्रवेशाची प्रतीक्षा संपली, असा तपासा तुमचा स्कोअर कार्ड

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय
4

Chhagan Bhujbal : भुजबळांना मोठा दिलासा! ‘त्या’ प्रकरणाचा निकाल लागला; विशेष कोर्टाचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.