Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 20 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive Series: लिंग समभावाचे दोन चेहरे! स्वाती-निखिलचा जागृतीपासून ग्रामीण परिवर्तनापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास

लिंग समभावाच्या दिशेने स्वाती आणि निखिल यांनी केलेला प्रवास हा प्रेरणादायी ठरत आहे. वैयक्तिक जागृतीपासून सुरुवात करत त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रात लिंगसमभावासाठी प्रभावी काम उभारले.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 02, 2026 | 02:15 PM
कोरो संस्थेचे कार्यकर्ते निखिल सर्वगोड आणि स्वाती खुणे, धाराशिव जिल्ह्यातील सारोळा गावातील मुलांशी लिंग समभाव कार्यक्रमावर संवाद साधताना आणि त्यांची मने जिंकताना.

कोरो संस्थेचे कार्यकर्ते निखिल सर्वगोड आणि स्वाती खुणे, धाराशिव जिल्ह्यातील सारोळा गावातील मुलांशी लिंग समभाव कार्यक्रमावर संवाद साधताना आणि त्यांची मने जिंकताना.

Follow Us
Follow Us:
  • लिंग समभावाचे दोन चेहरे!
  • स्वाती-निखिलचा जागृतीपासून ग्रामीण परिवर्तनापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास
  • वस्तीवर कोण काय म्हणालं पासून ते अगदी वैयक्तिक स्वच्छतेपर्यंत
एका उन्हाळी दुपारी स्वाती खुणे आणि निखिल सर्वगोड स्वातीच्या बाईकवरून धाराशिवमधील सारोळा येथील जिल्हा परिषद शाळेच्या दारातून आत शिरले. मध्यान्ह भोजनाची घंटा नुकतीच वाजली होती आणि मुले इकडेतिकडे विखुरली होती. पण स्वाती आणि निखिलला पाहताच सहावी-सातवीच्या विद्यार्थींनींनी त्यांना घेरले. प्रत्येकीला त्यांना काही सांगायचे होते, शाळेतील गप्पा, अगदी वैयक्तिक अडचणीही. कोणतीही संकोच नाही. कोणताही भेदभाव भाव नाही. फक्त विश्वास. सर्वजण शाळेच्या पटांगणामध्ये जमले आणि खूप दिवसांनी जुन्या मित्रांना भेटावे तशा त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. शाळेत काय शिकवलं, घरी काय झालं, वस्तीवर कोण काय म्हणालं पासून ते अगदी वैयक्तिक स्वच्छतेपर्यंत त्यांच्या विषयांना बंधन नव्हतं.

हे नाते एका रात्रीत तयार झालेलं नक्कीच नव्हतं. स्वाती आणि निखिल मीना-राजू मंचाचे कार्यकर्ते म्हणून त्या आणि इतर अनेक शाळांमध्ये तीन-चार वर्ष सातत्याने जात होते, मुलांशी संवाद साधत होते. मुले त्यांना “बाहेरचे” म्हणून नव्हे तर आपल्यातील मित्र म्हणून मानत होते. याला कारण म्हणजे त्या दोघांनी केवळ लिंग समभाव शिकवला नाही तर स्वतःच्याही आयुष्यामध्ये लागू केला. लिंग समभाव या विषयाची सुरुवात स्वाती आणि निखिलसाठी धाराशिव जिल्हात २०२३ पासून सुरू करण्यात आलेल्या कार्यक्रमाने झाली.

Exclusive Series: “लहान हातांतला न्यायदंड”, बालसभेतून मुलांचा आवाज बुलंद; सारोळा गावात विद्यार्थ्यांनीच चालवला लोकशाहीचा कारभार

धाराशिव जिल्ह्यात २०२२ पासून अंगाई-युनिसेफतर्फे (UNGEI-UNICEF) लिंग समभाव (जेंडर ट्रान्सफॉर्मेटिव्ह प्रोग्रॅम) किशोरवयीन मुले, शिक्षक आणि समुदायांसाठी राबवण्यात आला. देशात प्रथमच प्रायोगिक तत्वावर राबविण्यात आलेल्या या उपक्रमात १२० शाळा, ८०० हून अधिक शिक्षक आणि सुमारे १८ हजार विद्यार्थी सहभागी झाले. इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या ‘मीना राजू मंच’च्या माध्यमातून लिंग समभावाशी संबंधित विविध पैलूंची माहिती त्यांना करून देण्यात आली. त्यामध्ये संवाद, खेळ, चर्चा अशा विविध उपक्रमांचा समावेश होता. राज्य शिक्षण विभागाच्या शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) यांच्या सहकार्याने हा प्रकल्प राबविण्यात आला. या कार्यक्रमातून खेळाधारित शिक्षणातून लिंगभेदाच्या रूढींना आव्हान देण्यासाठी सक्षम केले. मीना राजू मंच जो इयत्ता ६वी ते ८वीच्या विद्यार्थ्यांसाठी राबवला जातो. या कार्यक्रमाला स्थानिक संस्था स्वयं शिक्षण प्रयोग (एसएसपी), कोरो आणि मावा यांचा सहभाग होता. त्यामध्ये शाळांसोबतच ग्रामपंचायत, गावातील लोक आदींनाही सहभागी करून घेण्यात आलं.

स्वातीसाठी कोरो या स्वयंसेवी संस्थेमध्ये सामील होणे म्हणजे पाच वर्षांच्या मौनाला धुडकावून लावणे होते. मराठी विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर लग्न आणि मातृत्वाने तिचे आयुष्य व्यापले. तरी काम करण्याची ओढ कधी मावळली नाही. आई-वडिलांच्या पाठिंब्याने, पण सासरच्यांच्या मर्जीविरुद्ध, तिने डेटा एंट्रीचे काम मिळवले. पण कोरोकडून लिंग समभाव प्रकल्पाची संधी आल्यावर तिने लगेच स्वीकारली. यात प्रथमच ती फील्डवर्कसाठी एकटी घराबाहेर पडली. तिच्या कुटुंबाला हे मान्यं नव्हते. पण तिने गावोगावी शाळांमध्ये जाऊन लिंग समानता या विषयावर बोलण्याचा निर्णय घेतला आणि तिचं जग बदलून गेलं.

निखिलसाठी हा प्रकल्प कोविडच्या काळात आधार म्हणून आला. त्याचा केटरिंग व्यवसाय फारसा चालत नव्हता, कार्यक्रमासाठी दिल्या जाणाऱ्या हॉलचं काम फार नव्हतं. अशावेळी त्यानेही नवीन काहीतरी करायचं म्हणून लिंग समभाव प्रकल्पावर काम करण्याची जबाबदारी स्वीकारली. “मला ‘लिंग समभावभाव’ किंवा ‘भेदभाव’ असे शब्दही माहीत नव्हते. स्वाती माझी जुनी मैत्रिण आहे. तिने सांगितलं म्हणून मी इथे आलो,” निखिल सर्वगोड म्हणाला.

त्यांना देण्यात आलेल्या प्रशिक्षणाने त्यांचे आयुष्य बदलून गेले आणि लिंग समभावावर ते दोघेही आपल्यापरिने विचार करू लागले. स्वातीला पहिल्यांदाच महिलांच्या हक्कांची जाणीव झाली. निखिलला भेदभावाची जाणीव झाली. तो हॉस्टेलमध्ये असताना स्वतःचे कपडे धुवायचा. पण घरी कपडे धुतले तर आईला ते मान्य नव्हतं. का तर तो मुलगा आहे आणि कपडे धुणं हे काम बायकांचं असतं ही समजूत. पण प्रशिक्षणानंतर तो घरी परत आला आणि स्वतःचे कपडे धुवायला लागला. त्याच्या आईला अगदी रडूच कोसळलं की मुलगा असं का करतोय. “आईने मला कपडे धुण्यास मनाई केली. कारण हे काम माझं नाही. मग तिच्यापासूनच मी लिंग समभावाची सुरुवात केली. कामाला लिंग नसतं हे तिला समजावून सांगावं लागलं. हळूहळू तिने ते मान्य केलं,” निखिल हसत म्हणाला.

स्वातीची लढाई मात्र अधिक कठीण होती. लिंग समभाव विषयावर तिची आणि नवऱ्याची रात्री उशिरापर्यंत चर्चा चालायची, वादही व्हायचा. पण तिने संवाद सुरू ठेवला. “एकदा मी नवऱ्याला माझ्यासाठी पाण्याचा ग्लास आणायला सांगितला. त्यांना अपमान वाटला. पण माझ्या मुलाला मात्र अशी कामं करण्याची लाज वाटत नाही. तो बिनधास्त घरकामात मला मदत करतो. त्याचे मित्र त्याला चिडवतातही. पण तो मनावर घेत नाही. घरकामाला लिंग नसल्याचं मी माझ्या मुलाला पटवून देऊ शकले हाच माझा खरा विजय आहे,” स्वाती म्हणाली.

वैयक्तिक पातळीवर लिंग समभावाची सुरुवात झाली तरी दोघांनाही शाळांमध्ये प्रवेश करणे सोपं नव्हते. अपरिचित पुरुषांशी बोलताना स्वाती अडखळत होती. सगळ्या शाळा सहकार्य करत नव्हत्या, मुलांचा सहभाग नसायचा. ग्रामीण भागामध्ये बाईकवर एकत्र फिरणाऱ्या दोन अविवाहित कार्यकर्त्यांकडे संशयाच्या नजरा पडत होत्या. पण या सगळ्यावर मात करायला ते शिकले. संवाद साधायचा तर आधी समोरच्याचं ऐकून घ्यायला हवं. तेच त्यांनी केलं. मुलं, शिक्षक, गावातील प्रतिष्ठीत मंडळी यांना भेटून संवाद साधून त्यांचं ऐकून त्यांनी कार्यक्रमाला सुरुवात केली. हळूहळू त्यांनी मुलांच्या आयुष्यात एक स्थान निर्माण केलं. विशेषतः मुलींना खाजगी गोष्टी बोलण्यासाठी त्यांनी एक सुरक्षित वातावरण निर्माण केलं. मग मुलींकडूनच प्रश्न यायला लागले, “झाडू फक्त आम्हीच का मारायचा?” “झोपाळ्यावर मुलांची आधी संधी मिळते?”, “स्वयंपाकात मुलं का मदत करत नाहीत”. शिक्षकांनी हा बदल ओळखला जेव्हा विद्यार्थी स्वच्छ शौचालये, खेळ साहित्य आणि आदराची वागणूक मागू लागले. ही तक्रार नव्हती तर त्यांच्या हक्काची जाणीव होती. निखिल आणि स्वातीच्या लिंग समभावाच्या सत्रांमध्ये शिक्षकही बसून नोट्स घेऊ लागले. “मुलांना जाणवले की आपण त्यांच्या आयुष्याबद्दल बोलतोय, पाठ्यपुस्तकाच्या पलीकडेचे. विशेषतः मुलींना. आता आमचं नातं एवढं घट्ट आहे की, आम्हाला उशीर झाला की मुलं शिक्षकांना फोन करायला सांगतात. त्यांना आमच्याशी गप्पा मारायच्या असतात,” निखिल म्हणाला.

Exclusive Series: ना पदवी, ना पाठ्यपुस्तक, दिशा पिंकी शेख एक प्रभावी नजर, पारलिंगी व्यक्तीच्या नजरेतून लिंगसमभाव

काम करताना स्वाती आणि निखिलला लवकर समजले की शाळा स्वतंत्रपणे अस्तित्वात नाहीत. ही मुलं शाळेतून शिकून घरी गेली, गावात गेली की तिथे वातावरण पुन्हा तेच रूढीवादी असतं. घरकाम करणाऱ्या मुलाची गावात थट्टा होते, मुली आपले विचार सर्व ठिकाणी ठामपणे मांडू शकत नाहीत. मग त्यांनी ग्रामपंचायत, महिला सभा, शाळा व्यवस्थापन समिती, सरपंच, ग्राम सेवक अशा सर्वांना या कार्यक्रमामध्ये सहभागी करून घेतलं. “मुले एकट्याने परिवर्तन घडवू शकत नाहीत. आम्ही अशी परिसंस्था उभारण्याचा प्रयत्न करतो जिथे शाळेतील मूल्यव्यवस्था समाजही मान्य करून मुलांना त्यांचे हक्क देईल आणि त्यांच्या वाढीसाठी सुरक्षित वातावरणही. लिंग समभाव हा केवळ मुलांपुरता मर्यादीत न राहता समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने भेदभाव कमी होऊ शकेल,” स्वाती म्हणाली.

लिंग समभाव कार्यक्रमाच्या तीन वर्षांनंतर स्वाती आणि निखिल यांची मैत्री स्वतःच समभावाचा आदर्श मांडते. एक स्त्री आणि पुरुष समान भागीदार म्हणून, एकाच ध्येयाने वाटचाल करू शकतात हे त्यांच्या मैत्रीने आणि कामाने दाखवून दिले.

संकलन: श्रुति गणपत्ये, माध्यम सल्लागार, युनिसेफ महाराष्ट्र

Web Title: Gender equality journey swati nikhil rural maharashtra change

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 02:15 PM

Topics:  

  • maharashtra

संबंधित बातम्या

Baramati fire News : वडगाव निंबाळकरमध्ये भंगार दुकानाला भीषण आग; ग्रामस्थांनी वाचवली घरे
1

Baramati fire News : वडगाव निंबाळकरमध्ये भंगार दुकानाला भीषण आग; ग्रामस्थांनी वाचवली घरे

Pratap Sarnaik : आता काय खैर नाही…! मराठी भाषा प्रमाणपत्र नसल्यास अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांवर होणार कारवाई
2

Pratap Sarnaik : आता काय खैर नाही…! मराठी भाषा प्रमाणपत्र नसल्यास अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांवर होणार कारवाई

Koyna Dam Water Shortage : लोटे परशुराम एमआयडीसीत पाणीसंकट गडद; पुढील 48 तासांत आणखी उद्योग बंद पडण्याची शक्यता
3

Koyna Dam Water Shortage : लोटे परशुराम एमआयडीसीत पाणीसंकट गडद; पुढील 48 तासांत आणखी उद्योग बंद पडण्याची शक्यता

खरीप हंगामाआधी शेतकऱ्यांची फसवणूक! 400 ते 500 पोती संशयित खत जप्त, कृषी विभाग आणि विक्रेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
4

खरीप हंगामाआधी शेतकऱ्यांची फसवणूक! 400 ते 500 पोती संशयित खत जप्त, कृषी विभाग आणि विक्रेत्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.