Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vivah Muhurat: मुहूर्त बाजूला, ट्रेंडला प्राधान्य! हरवत चाललेला पारंपरिक लग्नसोहळा अन् चुकत असलेला मुहूर्त

Marriage Traditions Maharashtra: लग्नसोहळ्यांना पारंपरिक उत्साहाची उधाण येते. मात्र आधुनिक ट्रेंड्स जसे प्री-वेडिंग शूट, मेहंदी आणि ब्रायडल मेकअप यामुळे लग्नाच्या मुहूर्ताच्या वेळेत उशीर होत असल्याचे चित्र दिसत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 02, 2026 | 10:29 AM
मुहूर्त बाजूला, ट्रेंडला प्राधान्य! हरवत चाललेला पारंपरिक लग्नसोहळा अन् चुकत असलेला मुहूर्त

मुहूर्त बाजूला, ट्रेंडला प्राधान्य! हरवत चाललेला पारंपरिक लग्नसोहळा अन् चुकत असलेला मुहूर्त

Follow Us
Close
Follow Us:
  • मुहूर्त बाजूला, ट्रेंडला प्राधान्य
  • हरवत चाललेला पारंपरिक लग्नसोहळा अन् चुकत असलेला मुहूर्त
  • संपूर्ण लग्नसोहळ्याचं वेळापत्रक विस्कळीत
नवी मुंबई : चैत्र–वैशाख महिना सुरू झाला की कोळी-आगरी समाजात लग्नसराईला उत्साहाची खरी सुरुवात होते. आनंद, आपुलकी आणि पारंपरिक रुढींचा सुंदर संगम असलेले हे लग्नसोहळे समाजाच्या सांस्कृतिक वैभवाची साक्ष देतात. साखरपुड्यापासून हळदी, वरमाई आणि वरातीपर्यंत प्रत्येक विधीमध्ये खास पारंपरिक रंग पाहायला मिळतो. काळानुरूप या सोहळ्यांमध्ये नवे ट्रेंडही सामील झाले आहेत, मात्र या बदलांसोबत वेळेचं भान मात्र काही प्रमाणात हरवत चालल्याचं चित्र दिसत आहे.

भारतीय संस्कृतीत कोणत्याही शुभ कार्यासाठी ‘मुहूर्त’ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. लग्नाचा दिवस आणि वेळ ठरवताना विशेष काळजी घेतली जाते. पण अलीकडच्या काळात मेहंदी, प्री-वेडिंग फोटोशूट, ब्रायडल मेकअप, विविध पोशाख आणि सोशल मीडियासाठी खास क्षण टिपण्यावर अधिक वेळ दिला जातो. परिणामी, ५.३० वाजता असलेला मुहूर्त अनेकदा ७-८ वाजेपर्यंत पुढे ढकलला जातो.

नीट परीक्षेमुळे रविवारी दिवसा मेगाब्लॉक रद्द! शनिवारी-रविवारी मध्यरात्री मध्य व पश्चिम रेल्वेवर विशेष ब्लॉक; लोकल सेवांवर परिणाम

यामुळे संपूर्ण लग्नसोहळ्याचं वेळापत्रक विस्कळीत होतं. लग्नानंतर पुन्हा रिसेप्शनसाठी वेगळी तयारी, फोटोसेशन यासाठी तासन्‌तास खर्च होतो. पाहुण्यांना वाट पाहून कंटाळा येतो आणि अनेकदा ते निघून जातात. शेवटी वरात मध्यरात्रीनंतर किंवा पहाटेच्या सुमारास निघते. काही ठिकाणी तर वरात पहाटे ४ ते ६ वाजेपर्यंत पोहोचल्याची उदाहरणंही समोर आली आहेत.

पूर्वीच्या परंपरेनुसार, “सुन ही घरची लक्ष्मी” मानली जात असल्यामुळे वरात मध्यरात्रीपूर्वीच घरी यावी, असा समज होता. संध्याकाळच्या सुमुहूर्तात लक्ष्मीचं आगमन होतं, या श्रद्धेवर आधारित ही प्रथा होती. मात्र आजच्या बदलत्या जीवनशैलीत ही भावना मागे पडताना दिसते.

यासोबतच एक महत्त्वाचा सामाजिक मुद्दाही समोर येतो. मध्यरात्री किंवा पहाटे वाजत-गाजत निघणाऱ्या वरातींमुळे परिसरातील नागरिक, जेष्ठ व्यक्ती, रुग्ण, तसेच अभ्यास करणारे विद्यार्थी यांना त्रास सहन करावा लागतो. आनंद साजरा करताना इतरांच्या सोयीचाही विचार होणं तितकंच आवश्यक आहे.

उशिरा निघणाऱ्या वरातींची काही प्रमुख कारणे

  • ठरलेल्या मुहूर्तावर लग्न न लागणे
  • कार्यक्रम वेळेपेक्षा २–३ तास उशिरा सुरू होणे
  • धार्मिक विधींपेक्षा दिखावा आणि सोशल मीडियाला अधिक प्राधान्य
  • मेकअप, एंट्री, फोटोशूट यावर अधिक वेळ खर्च
  • लग्नानंतर रिसेप्शनसाठी वेगळी तयारी
  • फॅमिली आणि स्टेज फोटोसेशनमुळे वाढलेला विलंब
हे चित्र बदलण्यासाठी फार मोठे प्रयत्न आवश्यक नाहीत. थोडंसं नियोजन, वेळेचं भान आणि परंपरांना योग्य मान दिल्यास लग्नसोहळे अधिक सुंदर, शिस्तबद्ध आणि सर्वांसाठी आनंददायी होऊ शकतात.

आनंद साजरा करताना समाजाचं भान ठेवणं हीच खरी परंपरा आहे. बदलत्या काळासोबत नवीन गोष्टी स्वीकारताना आपल्या संस्कृतीतील मूल्यं जपणंही तितकंच गरजेचं आहे. समाजहिताचा विचार करून प्रत्येकाने याकडे सकारात्मक दृष्टीने पाहिल्यास, आनंदाचा हा सोहळा खऱ्या अर्थाने सर्वांच्या मनात आनंद निर्माण करणारा ठरेल…!

Maharashtra Weather: विजांचा कडकडाट अन् ढगांचा गडगडाट; राज्यावर दुहेरी संकट, पुढील काही तास धोक्याचे, काय आहे IMD चा अंदाज?

Web Title: Koli agri weddings trend delay muhurta modern customs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 10:29 AM

Topics:  

  • maharashtra
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

Maharashtra HSC Result 2026 : विद्यार्थ्यांची धडधड वाढली…! बारावीचा आज निकाल, ‘असा’ तपासा तुमचा रिझल्ट
1

Maharashtra HSC Result 2026 : विद्यार्थ्यांची धडधड वाढली…! बारावीचा आज निकाल, ‘असा’ तपासा तुमचा रिझल्ट

Maharashtra Politics: सहाही प्रभाग सभापतीपद महायुतीकडे; ठाकरे गट, काँग्रेसची माघार: भाजपचे पाच, शिंदे सेनेचा एक सभापती
2

Maharashtra Politics: सहाही प्रभाग सभापतीपद महायुतीकडे; ठाकरे गट, काँग्रेसची माघार: भाजपचे पाच, शिंदे सेनेचा एक सभापती

विकसित महाराष्ट्र 2047: 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; महाराष्ट्र दिनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा निर्धार
3

विकसित महाराष्ट्र 2047: 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; महाराष्ट्र दिनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचा निर्धार

पुण्यातील गंगाधाम रस्त्यावर मध्यरात्री गॅस गळती, 24 जणांना त्रास; नागरिकांची मोठी धावपळ
4

पुण्यातील गंगाधाम रस्त्यावर मध्यरात्री गॅस गळती, 24 जणांना त्रास; नागरिकांची मोठी धावपळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.