Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra HSC result 2026 : विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम, एकूण निकाल 89.79 टक्के; पुन्हा मुलींची बाजी

Maharashtra HSC Result 2026 LIVE: बारावीचा निकाल आज जाहीर झाला असून दुपारी 1:00 वाजता या mahresult.nic.in,mahahsscboard.in वेबसाईटवर जाहीर करण्यात येणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 02, 2026 | 12:21 PM
12th Result Maharashtra Board in mahresult.nic.in HSC result

12th Result Maharashtra Board in mahresult.nic.in HSC result

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्र HSC निकाल 2026 जाहीर
  • विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम
  • मुलींचा निकाल पुन्हा एकदा मुलांपेक्षा सरस ठरला
नीता परब, मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावी म्हणजेच HSC परीक्षा 2026 चा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांसह पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती आणि अखेर या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला आहे. यंदा राज्याचा निकाल ८९.७९. टक्के लागला आहे. यंदा निकालात 2.09 टक्के वाढ झाली आहे. दरवर्षी प्रमाणे निकालात यंदा मुलीच आघाडीवर आहेत. तसेच कोकण विभागात निकालात पहिल्या क्रमांकावर असून लातूर विभाग शेवटच्या स्थानावर आहे.

निकालाची ठळक वैशिष्ट्ये

या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,४४,७१३ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,३३,०५८ विदधार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १२,८६,८४३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व उत्तीर्णतेची टक्केवारी ८९.७९ आहे.

Maharashtra HSC Result 2026: निकाल पाहण्यासाठी ‘या’ स्टेप फॉलो करा? डिजीलॉकरवर मार्कशीट कशी डाउनलोड करायची? पाहा एका क्लिकवर

खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ३७,५५९ एवढी असून त्यापैकी ३६,९४१ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून २९,६३४ विदयार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या उत्तीर्णतिची टक्केवारी ८०.२१ आहे.

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ५०,८७६ पुनर्परिक्षार्थी वि‌द्याथ्यर्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ५०,३४६ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी १८,३४९ विद्यार्थी उत्तीण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ३६.४४ आहे.

या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ८,४४६ दिव्यांग विदयार्थ्यांनी नोंदण केली होती. त्यापैकी ८,३६७ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ७,५७९ दिव्यांग विद्या उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण उत्तीर्णतेची टक्केवारी ९०.५८ आहे. इ.१२ वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पद्धतीने सवलतीचे गुण देण्याबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.

सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९४.१४%) सर्वाधिक असा सर्वांत कमी निकाल लातूर विभागाचा (८४.१४%) आहे. सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी ९३.१५ असून मुलांची उत्तीर्णतेची टक्केव ८६.८०% आहे. म्हणजेच मुलींची उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा ६.३५% ने जास्त आहे. एकूण १५३ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल १००% आहे.

विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर ऑनलाइन पाहता येणार आहे. तसेच, गुणपत्रिका लवकरच संबंधित शाळांमार्फत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. तसेच Rechecking आणि Revaluation साठी अर्ज प्रक्रिया लवकरच सुरू होणार असून, विद्यार्थ्यांनी अधिकृत सूचनांनुसार अर्ज करावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे. जे विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले आहेत, त्यांच्यासाठी पुरवणी परीक्षेचे वेळापत्रकही लवकरच जाहीर केले जाणार आहे.

महाराष्ट्र १२वीचा निकाल कसा डाउनलोड करावा

सर्वप्रथम, mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

होमपेजवर, महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल २०२६ (Maharashtra Board HSC Result 2026) या लिंकवर क्लिक करा.

तुमचा रोल नंबर आणि इतर आवश्यक तपशील भरा आणि सबमिट करा.

निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल. तुम्ही त्याची पीडीएफ (PDF) किंवा प्रिंटआउट घेऊ शकता.

डिजीलॉकरवरून (DigiLocker) निकाल कसा तपासावा

डिजीलॉकरच्या अधिकृत वेबसाइट https://www.digilocker.gov.in/ वर जा.

येथे लॉगिन/नोंदणी (Login/Register) पर्यायावर क्लिक करा.

जर तुम्ही आधीच नोंदणी केली असेल, तर थेट लॉगिन करा.

आता, महाराष्ट्र बोर्ड एचएससी निकाल २०२६ (Maharashtra Board HSC Result 2026) या लिंकवर क्लिक करा.

तुमचा रोल नंबर आणि इतर तपशील सबमिट करा.

गुणपत्रिका स्क्रीनवर दिसेल.

Maharashtra HSC Result 2026 : विद्यार्थ्यांची धडधड वाढली…! बारावीचा आज निकाल, ‘असा’ तपासा तुमचा रिझल्ट

Web Title: Maharashtra msbshse hsc 12th result 2026 mahresult nic in mahahsscboard in hsc result 2026 girls outperform boys again

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • HSC
  • maharashtra
  • Maharashtra HSC Result 2026

संबंधित बातम्या

IMD Weather : मान्सून पुन्हा सक्रिय? पावसाचा हायअलर्ट, गरज असेल तरच बाहेर पडण्याच्या सूचना
1

IMD Weather : मान्सून पुन्हा सक्रिय? पावसाचा हायअलर्ट, गरज असेल तरच बाहेर पडण्याच्या सूचना

Bhandara News: २५ किलो गांजासह दोघे ताब्यात! पालांदूर येथे गांजातस्करीचा पर्दाफाश; ओडिशातून आणल्याचा संशय
2

Bhandara News: २५ किलो गांजासह दोघे ताब्यात! पालांदूर येथे गांजातस्करीचा पर्दाफाश; ओडिशातून आणल्याचा संशय

Bhimashankar Rain: भीमाशंकर परिसरात अतिवृष्टीचा तडाखा! दरड कोसळल्याने दोन प्रमुख मार्ग बंद
3

Bhimashankar Rain: भीमाशंकर परिसरात अतिवृष्टीचा तडाखा! दरड कोसळल्याने दोन प्रमुख मार्ग बंद

पिंपरीत ‘मेड इन पाकिस्तान’ गोरी ब्यूटी क्रीमची विक्री, दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई; तब्बल 23 क्रीम जप्त
4

पिंपरीत ‘मेड इन पाकिस्तान’ गोरी ब्यूटी क्रीमची विक्री, दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई; तब्बल 23 क्रीम जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.