Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Navi Mumbai : स्थायी समितीत 9.41 कोटींच्या नागरी कामांना मंजुरी; वाशी-शिरवणेतील रस्ते सुधारणा लागणार मार्गी

Navi Mumbai News : महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत 9 कोटी 41 लाख रुपयांच्या विविध नागरी कामांना मंजुरी देण्यात आली. या कामांमुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 02, 2026 | 12:54 PM
स्थायी समितीत 9.41 कोटींच्या नागरी कामांना मंजुरी; वाशी-शिरवणेतील रस्ते सुधारणा लागणार मार्गी

स्थायी समितीत 9.41 कोटींच्या नागरी कामांना मंजुरी; वाशी-शिरवणेतील रस्ते सुधारणा लागणार मार्गी

Follow Us
Follow Us:
  • स्थायी समितीत 9.41 कोटींच्या नागरी कामांना मंजुरी
  • वाशी-शिरवणेतील रस्ते सुधारणा लागणार मार्गी
  • 2 कोटी 90 लक्ष इतक्या रक्कमेच्या कामास मंजूरी
सिद्धेश प्रधान, नवी मुंबई : महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत प्रशासनाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या 9 कोटी 41 लाख 6 हजार रुपयांच्या विविध नागरी प्रस्तावांना स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्वानुमते मंजूरी प्राप्त झाली. यामध्ये शिरवणे यथील दत्तकृपा वाडी या ठिकाणी असलेल्या कच्च्या रस्त्यामुळे नागरिकांना होणार त्रास दूर करण्यासाठी 28 लाख 85 हजार रक्कमेच्या रस्ते सुधारणा कामास मंजूरी देण्यात आली. त्याचप्रमाणे वाशी विभागात से.11 जुहूगाव येथील पाण्याच्या टाकी जवळील परिसरात गटारांची अवस्था खराब झाल्याने पाण्याचा व्यवस्थित निचरा होत नाही तसेच पदपथांचीही दूरवस्था झाल्याने नागरिकांना चालतांना त्रास होतो हे लक्षात घेऊन त्याठिकाणी 71 लक्ष 87 हजार रक्कमेच्या गटारे व पदपथ सुधारणा कामास आणि वाशी मुख्य रस्त्यालगत हायवे जवळील से.1 डी टाईप बिल्डींग पासून ते से.2 आरती सोसायटी पर्यंत गटर व पदपथ सुधारणा करण्याच्या 2 कोटी 90 लक्ष इतक्या रक्कमेच्या कामास मंजूरी देण्यात आली.

अशाचप्रकारे से.11 जुहूगाव येथील गटारे खराब झाल्याने त्याठिकाणीही 27 लक्ष 98 हजार रक्कमेच्या गटारे सुधारणा कामास तसेच बेलापूर विभागातील नेरुळ से.21 शंकराचार्य उद्यानासमोरील गटर व पदपथ सुधारणा कामाची साधारणत: 61 लक्ष 32 हजार रक्कम मंजूर करण्यात आली. याशिवाय नेरुळ से.20 येथे शिवम अपार्टमेंट ते श्री विला पर्यंतच्या गटारांची दूरवस्था दूर करण्यासाठी 35 लक्ष 50 हजार रक्कमेच्या गटर सुधारणा कामाला मंजूरी मिळाली.

मुंबईच्या स्वच्छतेसाठी ‘वॉर्ड’ स्तरावर ॲक्शन प्लान! राडारोडा पसरवणाऱ्यांवर महानगरपालिकेची नजर, आराखडा तयार करण्याचे आदेश

नेरुळ से.18 येथील गणेश तलावाच्या भोवती असणा-या कुंपण भिंतींची अवस्था खराब झाली असून या कुंपण भिंतीचे सुधारणा काम साधारणत: 36 लक्ष 72 हजार खर्च करुन करण्यास तसेच आमदारांचा स्थानिक विकास कार्यक्रम 2024-25 या निधीतून पिंपरी गाव येथे केदारेश्वर महाकाली परिसरात स्थानिक नागरिकांच्या समारंभासाठी राजेश मोरे यांच्या आमदार निधीतून सभामंडप बांधणे कामासाठी 40 लक्ष 40 हजार खर्चास मान्यता मिळाली.

वाशी येथील पामबीच रोड कोपरी सिग्नल ते पामबीच गॅलेरिआ मॉल तसेच के स्टार हॉटेल ते अरेंजा कॉर्नरपर्यंतच्या रस्ता दुभाजकांमध्ये एफआरपी ग्रील बसविण्याच्या 1 कोटी 17 लक्ष रक्कमेच्या कामास मंजूरी प्राप्त झाली. पामबीच रोडवर मोठया प्रमाणात वाहनांची रहदारी असते. हा परिसर प्रामुख्याने वाणिज्य व रहिवासी परिसरातील असल्यामुळे या रस्त्यावर तुर्भेकडून वाशीकडे येतांना व वाशीकडून तुर्भेकडे जातांना दुभाजक मार्ग आलांडतांना अपघात होत असल्याचे निर्देशनास आले आहे. हे टाळण्यासाठी रस्ता दुभाजकांमध्ये ग्रील लावण्यात येत आहे.

करावे गाव येथे भंगारवाल्याजवळ 15 वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या शौचालयाची अत्यंत दूरवस्था झाली असून हे धोकादायक अवस्थेतील शौचालय वापरासाठी बंद ठेवण्यात आलेले आहे. मात्र त्यामुळे परिसरातील नागरिकांची होणारी गैरसोय दूर करण्यासाठी तेथील जुने शौचालय तोडून एक मजली नवीन सामुदायिक शौचालय बांधण्याच्या रु. 58 लक्ष 65 हजार रक्कमेच्या कामास स्थायी समितीची मंजूरी प्राप्त झाली. त्याचप्रमाणे वाशी विभाग क्षेत्रातील महानगरपालिकेच्या इमारती, शाळा व रुग्णालये येथील विद्युत साहित्य यांची सर्वसमावेशक देखभाल व दुरुस्ती करणे कामाच्या सहा महिन्याच्या मुदतवाढीस मंजूरी देण्यात आली.

शाळा व्हिजन अंतर्गत उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेने नेहमीच लक्ष दिले आहे. त्यादृष्टीने नेरुळ से.16 ए येथील नमुंमपा शाळा क्रमांक 9 च्या इमारतीची संपूर्ण दुरुस्ती व सुधारणा करण्याच्या रु.61 लाख 77 हजार रक्कमेच्या कामास मंजूरी देण्यात आली. बेलापूर विभागात 9 पीबीआर ते से.58 ए नेरुळ येथील अमर सोसायटी समोरील ग्रीन बेल्ट मधील नाल्याच्या सुधारणा कामाच्या साधारणत: 1 कोटी 11 लक्ष रक्कमेस मंजूरी प्राप्त झाली आहे.

याशिवाय नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नेरुळ येथील माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालयात सुरु असलेल्या पदव्युत्तर वैद्यकिय शिक्षण संस्थेत सन 2024-25 करिता प्रवेश प्रक्रिया सुरु झालेली असून सन 2026-27 करिता भूलतज्ज्ञ, विकृती शास्त्र, सुक्ष्मजीव शास्त्र, विकिरण शास्त्र, सामुदायिक वैद्यकशास्त्र, नेत्र रोग, कान नाक व घसा संबधित एकूण 7 अभ्यासक्रमांकरिता प्रत्येक विषयाकरिता 30 विद्यार्थी अशी मान्यता मिळालेली आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग यांनी विहित केलेल्या नियमावलीनुसार नमुंमपामध्ये किमान 2 वर्ष कार्यरत असलेल्या दोन विशेष तज्ज्ञ वैद्यकिय अधिकारी यांना वरिष्ठ निवासी डॉक्टर म्हणून नियुक्ती देण्यास परवानगी देण्यात आली. अशाप्रकारे नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्थायी समितीमध्ये विविध सुविधा कामांना तसेच सेवांना मंजूरी मिळाली असून याव्दारे नागरिकांना आवश्यक अशा नागरी सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

Web Title: Navi mumbai civic works approval 9 crore roads drainage vashi shiravane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 12:54 PM

Topics:  

  • maharashtra
  • Navi Mumbai
  • Vashi

संबंधित बातम्या

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त
1

शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरलेल्या ‘डीपी चोरां’ना ठोकल्या बेड्या; इर्टिगा कारसह लाखोंचा मुद्देमाल जप्त

Navi Mumbai News: मोरबे धरणातील पाणीसाठा ७३.९० टक्क्यांवर; नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन
2

Navi Mumbai News: मोरबे धरणातील पाणीसाठा ७३.९० टक्क्यांवर; नवी मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
3

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
4

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.