Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GMC Sindhudurg Bharti 2026: सिंधुदुर्ग वैद्यकीय महाविद्यालयात प्राध्यापक पदांसाठी आज थेट मुलाखत; २ लाखांपर्यंत मिळणार पगार!

GMC Sindhudurg Bharti 2026: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग येथे ३३ प्राध्यापक व सहयोगी प्राध्यापक पदांसाठी आज (२७ ऑगस्ट २०२६) दुपारी ३ वाजता थेट मुलाखत आहे. सविस्तर माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 27, 2026 | 02:37 PM
sindhudurg

sindhudurg

Follow Us
Follow Us:

GMC Sindhudurg Bharti 2026:  सरकारी नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग अंतर्गत विविध विभागांतील प्राध्यापक आणि सहयोगी प्राध्यापक (Associate Professor) या पदांच्या एकूण ३३ रिक्त जागा भरण्यासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना थेट मुलाखतीत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विविध वैद्यकीय शाखांमध्ये ही पदे भरली जाणार असून, यामध्ये शरीरक्रियाशास्त्र, सूक्ष्मजीवशास्त्र, न्यायवैद्यकशास्त्र, औषधवैद्यकशास्त्र, जनऔषध वैद्यकशास्त्र, बालरोगविकित्सशास्त्र, अस्थिव्यंगोपचारशास्त्र, कान-नाक-घसाशास्त्र, नेत्रशल्यविकित्सशास्त्र, स्त्रीरोग व प्रसुतीशास्त्र, वधिरिकरणशास्त्र, क्ष-किरणशास्त्र, मानसशास्त्र, त्वचाशास्त्र, क्षयरोगशास्त्र, शस्त्रक्रियाशास्त्र, हाडवैद्य, रक्तविकारशास्त्र आणि पोषणशास्त्र यांसारख्या महत्त्वाच्या विभागांचा समावेश आहे.

निवड प्रक्रिया

या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २७ ऑगस्ट २०२६ रोजी ६९ वर्षांपेक्षा जास्त नसावे अशी मर्यादा घालण्यात आली आहे. निवड प्रक्रियेबाबत सांगायचे तर, उमेदवारांची कोणतीही लिखित परीक्षा घेतली जाणार नाही तर थेट मुलाखतीद्वारे त्यांची निवड केली जाईल.

FMGE Exam: मेडिकलच्या विद्यार्थ्यांचे जंतर मंतरवर आंदोलन; जाणून घ्या नेमक्या काय आहेत उमेदवारांच्या मागण्या?

मुलाखतीसाठी येणाऱ्या उमेदवारांना प्रतिमहिना आकर्षक मानधन मिळणार असून, प्राध्यापक पदासाठी तब्बल २,००,००० रुपये तर सहयोगी प्राध्यापक पदासाठी ९८,५०० रुपये वेतन निश्चित करण्यात आले आहे. संबंधित पदांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता ही विभागानुसार वेगवेगळ्या वैद्यकीय पदव्या (उदा. M.D., M.S., DNB किंवा Ph.D.) असणाऱ्या उमेदवारांसाठी खुली आहे.

अधिक माहितीसाठी उमेदवाराने ‘या’ अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी

या भरतीसाठीची थेट वॉक-इन-इंटरव्यू (मुलाखत) आज म्हणजेच २७ ऑगस्ट २०२६ रोजी दुपारी ३.०० वाजता आयोजित करण्यात आली आहे. मुलाखतीचे ठिकाण ‘अधिष्ठाता कार्यालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिव्हिल हॉस्पिटलजवळ, ए/पी ओरस, ता. कुडाळ, जिल्हा- सिंधुदुर्ग’ हे असून इच्छुक उमेदवारांनी आपले बायोडाटा आणि सर्व मूळ शैक्षणिक प्रमाणपत्रांसह निर्धारित वेळी उपस्थित राहावे. याविषयीची सविस्तर माहिती आणि अधिकृत जाहिरातीसाठी उमेदवार http://gmcsindhudurg.edu.in/ या अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात.

SSC CGL परीक्षा उत्तीर्ण करण्याचे स्वप्न पाहतायं? मग चुकूनही करू नका ‘या’ पाच चुका!

Web Title: Gmc sindhudurg recruitment 2026 walk in interview

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 02:37 PM

Topics:  

  • Government Job
  • High salary Job
  • Sindhudurg District

संबंधित बातम्या

SNDT University Recruitment 2026: SNDT महिला विद्यापीठात ‘या’ पदांसाठी भरती; असा करा थेट अर्ज
1

SNDT University Recruitment 2026: SNDT महिला विद्यापीठात ‘या’ पदांसाठी भरती; असा करा थेट अर्ज

IIM Nagpur Recruitment 2026: आयआयएम नागपूरमध्ये ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी भरती जाहीर; ७ व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार!
2

IIM Nagpur Recruitment 2026: आयआयएम नागपूरमध्ये ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी भरती जाहीर; ७ व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार!

Career in Travel and Tourism: फिरण्याची आवड आहे का? ट्रॅव्हल आणि टूरिझम क्षेत्रात ‘या’ मार्गाने घडवा शानदार करिअर
3

Career in Travel and Tourism: फिरण्याची आवड आहे का? ट्रॅव्हल आणि टूरिझम क्षेत्रात ‘या’ मार्गाने घडवा शानदार करिअर

India Post GDS: जीडीएसची पहिली मेरिट लिस्ट जाहीर; अनेक राज्यांत कटऑफ १००% वर गेल्याने खळबळ
4

India Post GDS: जीडीएसची पहिली मेरिट लिस्ट जाहीर; अनेक राज्यांत कटऑफ १००% वर गेल्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.