Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 10 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Government Vs Private Universities: भारतात खाजगी विद्यापीठांचा महापूर; पण विद्यार्थ्यांचा कौल अजूनही सरकारी कॉलेजनाच!

Government Vs Private Universities: शिक्षण मंत्रालयाच्या AISHE अहवालानुसार गेल्या १० वर्षांत खाजगी विद्यापीठांमध्ये १४९ टक्के वाढ झाली आहे. गुजरात ६७ विद्यापीठांसह अव्वल आहे, तर सरकारी विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांचे सर्वाधिक प्रवेश आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 10, 2026 | 06:19 PM
विद्यापीठ

विद्यापीठ

Follow Us
Follow Us:

Government Vs Private Universities: भारताचे उच्च शिक्षण क्षेत्र सध्या एका ऐतिहासिक बदलाच्या टप्प्यातून जात आहे. गेल्या एका दशकात देशात शैक्षणिक संस्थांचा विस्तार अत्यंत वेगाने झाला असून, यामध्ये खाजगी क्षेत्राचा (Private Sector) वाटा सर्वात मोठा आहे. शिक्षण मंत्रालयाच्या ‘ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशनच्या’ (AISHE) ताज्या आकडेवारीनुसार, २०१३-१४ ते २०२३-२४ या काळात भारताच्या उच्च शिक्षणाला सरकारी धोरणांपेक्षा खाजगी गुंतवणुकीने अधिक गती दिली आहे. आज देशातील तरुणांसाठी पदवी घेण्याचे मार्ग जेवढे विस्तारले आहेत, तेवढ्याच वेगाने शिक्षणाचा संपूर्ण ढांचाही बदलत आहे. गेल्या १० वर्षांत सरकारी विद्यापीठांच्या तुलनेत खाजगी विद्यापीठांची संख्या ३ पटीने कशी वाढली, याचे सविस्तर विश्लेषण खालीलप्रमाणे आहे.

विद्यापीठांच्या संख्येत झालेली वाढ आणि १० वर्षांतील तुलना

AISHE च्या अहवालानुसार, गेल्या १० वर्षांत खाजगी विद्यापीठांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. २०१३-१४ मध्ये देशात २१९ खाजगी विद्यापीठे होती, जी २०२३-२४ पर्यंत वाढून ५४६ झाली आहेत. यामध्ये तब्बल १४९.३ टक्के वाढ नोंदवली गेली आहे. या तुलनेत सरकारी विद्यापीठांची संख्या ५०४ वरून वाढून ७३३ झाली आहे, जी ४५.४ टक्के वाढ दर्शवते. यावरून स्पष्ट होते की खाजगी संस्थांनी अतिशय वेगाने आपले जाळे पसरवले आहे.

खाजगी विद्यापीठांच्या बाबतीत गुजरात देशात अव्वल

राज्यनिहाय आकडेवारीवर नजर टाकल्यास, गेल्या १० वर्षांत विद्यापीठांच्या भूगोलात मोठा बदल झाला आहे. २०१३-१४ मध्ये राजस्थान ३९ खाजगी विद्यापीठांसह देशात पहिल्या क्रमांकावर होते आणि त्यानंतर अनुक्रमे वरील इतर राज्यांचा क्रमांक लागत होता. मात्र २०२३-२४ च्या आकडेवारीनुसार राजस्थानला मागे टाकत गुजरातने देशात पहिले स्थान पटकावले आहे.

NEET Pre Ayurveda 2026: संस्कृतच्या विद्यार्थ्यांना १० वी नंतर थेट आयुर्वेद डॉक्टर बनता येणार; जाणून घ्या सविस्तर

विद्यार्थ्यांच्या प्रवेशाच्या बाबतीत सरकारी विद्यापीठांचाच बोलबाला

जरी खाजगी विद्यापीठांची संख्या वेगाने वाढली असली, तरी विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष प्रवेशाचा (Student Enrollment) विचार केल्यास सरकारी विद्यापीठे अजूनही खूप पुढे आहेत. आकडेवारीवरून हे साफ होते की, बहुतांश विद्यार्थ्यांची पहिली पसंती आजही सरकारी विद्यापीठांनाच आहे.

साल २०१३-१४ मध्ये सरकारी विद्यापीठांमध्ये ५१.९ लाख विद्यार्थी शिकत होते, जे एकूण विद्यापीठीय प्रवेशाच्या ८१.३ टक्के होते. त्या वेळी खाजगी विद्यापीठांमध्ये केवळ ११.९ लाख विद्यार्थी होते आणि त्यांची भागीदारी १८.६ टक्के होती. साल २०२३-२४ पर्यंत सरकारी विद्यापीठांमधील प्रवेश संख्या ४२.५ टक्क्यांनी वाढून ७३.९ लाख झाली आहे. दुसरीकडे, खाजगी विद्यापीठांमधील विद्यार्थ्यांची संख्या सुमारे तीन पटीने वाढून ३४.६ लाख (१९१.८% वाढ) झाली आहे. यावरून स्पष्ट होते की खाजगी विद्यापीठे वेगाने पाय पसरत असली, तरी देशातील बहुतांश विद्यार्थी अजूनही दर्जेदार आणि परवडणाऱ्या सरकारी शिक्षणावरच जास्त विश्वास ठेवून आहेत.

Corporate Trend 2026: सध्या मोठ्या कंपन्या चांगला नफा कमावूनही ‘कॉस्ट कटिंग’ आणि नोकरकपात का करत आहेत? जाणून घ्या सविस्तर

Web Title: Government vs private universities growth aishe report gujarat tops marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 06:19 PM

Topics:  

  • central goverment
  • Private School
  • Pune University
  • trends

संबंधित बातम्या

Corporate Trend 2026: सध्या मोठ्या कंपन्या चांगला नफा कमावूनही ‘कॉस्ट कटिंग’ आणि नोकरकपात का करत आहेत? जाणून घ्या सविस्तर
1

Corporate Trend 2026: सध्या मोठ्या कंपन्या चांगला नफा कमावूनही ‘कॉस्ट कटिंग’ आणि नोकरकपात का करत आहेत? जाणून घ्या सविस्तर

Corporate Trend 2026: भारतीय कंपन्या चिंतेत! कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त काम करणे का केले बंद? वाचा धक्कादायक अहवाल
2

Corporate Trend 2026: भारतीय कंपन्या चिंतेत! कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त काम करणे का केले बंद? वाचा धक्कादायक अहवाल

कोंकणवासियांसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ मोठ्या स्थानकावर ३ महत्त्वाच्या ट्रेन्स थांबणार; मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश
3

कोंकणवासियांसाठी आनंदाची बातमी! आता ‘या’ मोठ्या स्थानकावर ३ महत्त्वाच्या ट्रेन्स थांबणार; मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश

Rahul Gandhi: ‘मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या कष्टाशी खेळतंय’, UGC-NET पेपर लीकवरून राहुल गांधींचा आक्रमक हल्ला
4

Rahul Gandhi: ‘मोदी सरकार विद्यार्थ्यांच्या कष्टाशी खेळतंय’, UGC-NET पेपर लीकवरून राहुल गांधींचा आक्रमक हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.