फोटो सौजन्य- सोशल मीडिया
NEET Pre Ayurveda 2026: वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि अनोखी बातमी समोर आली आहे. सामान्यतः डॉक्टर बनण्यासाठी १२ वी उत्तीर्ण होऊन ‘NEET’ सारखी कठीण परीक्षा क्रैक करावी लागते. परंतु, आता या पारंपरिक मार्गापेक्षा एक वेगळा आणि रंजक पर्याय उपलब्ध झाला आहे. विद्यार्थ्यांना १० वी पास झाल्यानंतरच आयुर्वेद डॉक्टर बनण्याच्या दिशेने पाऊल टाकण्याची संधी मिळणार आहे.
मात्र, हा पर्याय सर्वच १० वी पास विद्यार्थ्यांसाठी नसेल. संस्कृत विषयाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयुर्वेद शिक्षणाची ही नवी कपाटे खुली करण्यात आली आहेत. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी ‘नीट प्री-आयुर्वेद’ बाबतची अधिकृत अधिसूचना जारी केली आहे.
या प्रवेश परीक्षेद्वारे पात्र उमेदवार ‘आयुर्वेद चिकित्सा आणि शल्यचिकित्सा पदवी’ हा कोर्स करू शकतील. या संपूर्ण कोर्सचा कालावधी साडेसात वर्षांचा असेल, ज्याची रचना खालीलप्रमाणे आहे:
२ वर्षे: प्री-आयुर्वेद गुरुकुल कार्यक्रम
साडेचार वर्षे: मुख्य बीएएमएस (BAMS) अभ्यासक्रम
१ वर्ष: अनिवार्य इंटर्नशिप
नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन (NCISM) ने या कोर्सला मंजुरी दिली आहे. केंद्रीय संस्कृत विद्यापीठाशी संलग्न असलेली ‘आयुर्वेद गुरुकुले’ हा कार्यक्रम चालवणार आहेत. यासाठी ‘आयुर्वेद गुरुकुल संलग्नता पोर्टल’ देखील सुरू करण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त बोर्ड, राज्य संस्कृत बोर्ड किंवा समकक्ष बोर्डातून १० वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच सर्वसामान्य प्रवर्गातील उमेदवरांना किमान ५०% गुण आवश्यक तर SC, ST, OBC आणि दिव्यांग (PwD) उमेदवारांना किमान ४०% गुण असणे आवश्यक आहेत.
वयोमर्यादा: ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत उमेदवाराचे वय किमान १५ वर्षे आणि कमाल २५ वर्षे असावे. .
अर्ज प्रक्रियेची सुरुवात: परीक्षा नियंत्रक प्रो. पवन कुमार यांच्या माहितीनुसार, या कोर्सची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया जुलै २०२६ च्या तिसऱ्या आठवड्यापासून सुरू होईल. याच्या प्रवेशासाठी ऑनलाईन एट्रांन्स परीक्षा असेल, जी ऑगस्ट २०२६ च्या अंतिम आठवड्यात किंवा सप्टेंबर २०२६ च्या पहिल्या आठवड्यात देशभरातील विविध केंद्रांवर घेतली जाईल.
परीक्षा ऑफलाइन म्हणजेच पेन-पेपर (OMR) आधारित असेल. परीक्षेसाठी एकूण १५० मिनिटे वेळ दिला जाईल. यामध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले जाणार असून यामध्ये संस्कृत वाङ्मय, व्याकरण, पुराण-इतिहास, दर्शन आणि भारतीय ज्ञान परंपरा या विषयांचा समावेश असेल. तसेच ही परीक्षा हिंदी, इंग्रजी आणि संस्कृत अशा तीन भाषांमध्ये आयोजित केली जाईल.






