Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Harvard Study: ‘मोबाईल फोनपासून दूर राहिल्याने विद्यार्थ्यांचे गुण…..’ हार्वर्डच्या अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष समोर!

Harvard Study CEPR : हार्वर्ड विद्यापीठाच्या CEPR ने अमेरिकेतील ४,६०० शाळा आणि ३३ लाख विद्यार्थ्यांचा अभ्यास केला आहे. शाळेत मोबाईल फोन लॉक पाऊचमध्ये (Yondr Pouches) ठेवल्याने विद्यार्थ्यांची गणित व वाचन क्षमता कशी सुधारली, याचे सविस्तर विश्लेषण वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 22, 2026 | 10:59 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  • हार्वर्ड विद्यापीठाचा हा अभ्यास नेमका काय आहे?
  • मोबाईल बंदीमुळे अभ्यासात किती सुधारणा झाली?
  • हार्वर्डच्या अभ्यासातून धक्कादायक निष्कर्ष समोर!
Harvard Study CEPR : अमेरिकेतील शाळांमध्ये मोबाईल फोनच्या वापरावर आणि विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होणाऱ्या परिणामाबाबत एक महत्त्वाचा अभ्यास समोर आला आहे. हार्वर्ड विद्यापीठाच्या सेंटर फॉर एज्युकेशन पॉलिसी रिसर्चने (CEPR) Phone-Free Schools and Achievement Growth: A Student-Level Analysis नावाने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. हार्वर्डचे प्राध्यापक आणि CEPR चे फॅकल्टी डायरेक्टर डॉ. टॉम केन यांनी हा अभ्यास केला असून, शाळांमध्ये मोबाईल फोनवर कठोर बंदी घातल्यास विद्यार्थ्यांच्या अभ्यासात आणि शैक्षणिक कामगिरीत किती बदल होतो, हे शोधण्याचा प्रयत्न यात करण्यात आला आहे.

या अभ्यासासाठी अमेरिकेतील ४९ राज्ये आणि डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया येथील सुमारे ४,६०० शाळांमध्ये शिकणाऱ्या ३३ लाख विद्यार्थ्यांचा डेटा समाविष्ट करण्यात आला. २०२१-२२ ते २०२५-२६ या पाच शैक्षणिक वर्षांच्या नोंदींचे विश्लेषण या संशोधनात करण्यात आले. तिसरी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची गणित आणि वाचन क्षमता NWEA MAP Growth चाचणीद्वारे मोजण्यात आली.

ज्या शाळांमध्ये शाळेच्या संपूर्ण वेळेत विद्यार्थ्यांचे मोबाईल फोन Yondr सारख्या लॉक होणाऱ्या पाऊचमध्ये ठेवणे बंधनकारक होते आणि ज्या ठिकाणी अशी कठोर बंदी लागू नव्हती, अशा शाळांच्या निकालांची तुलना संशोधकांनी केली.

मोबाईल ठेवण्यासाठी वापरलेले खास तंत्रज्ञान

या अभ्यासाचे वैशिष्ट्य म्हणजे यात केवळ मोबाईल वापरावर सर्वसाधारण बंदी असलेल्या शाळांचा विचार करण्यात आला नाही. ज्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे फोन ठेवण्यासाठी लॉक होणाऱ्या खास पाऊचचा वापर केला गेला, अशा शाळांवर संशोधकांनी विशेष लक्ष दिले. या पाऊचला Yondr Pouches म्हटले जाते. या व्यवस्थेत विद्यार्थी शाळेत आल्यानंतर आपला मोबाईल फोन पाऊचमध्ये ठेवतात आणि तो लॉक केला जातो. शाळेची वेळ संपल्यावरच तो उघडता येतो. यामुळे विद्यार्थी पूर्ण शाळेच्या वेळेत सोशल मीडिया, गेमिंग आणि मेसेजिंगपासून दूर राहतात. अहवालानुसार, अशी कठोर व्यवस्था लागू झाल्यानंतर शाळांमध्ये मोबाईल फोनच्या वापरात सुमारे २० टक्क्यांनी घट झाल्याचा अंदाज आहे.

NTA Duplicate Scorecard: स्कोरकार्ड हरवण्याची चिंता संपली! अर्ज करण्यापूर्वी ‘हे’ तपासा; NTA चा नवा नियम जाहीर

विद्यार्थ्यांचे निकाल किती सुधारले?

संशोधनातील सर्वांत महत्त्वाच्या निष्कर्षानुसार, लॉक होणाऱ्या पाऊचद्वारे मोबाईलवर कठोर बंदी घालणाऱ्या शाळांमधील विद्यार्थ्यांच्या वार्षिक शैक्षणिक प्रगतीत सुमारे ०.०१ स्टँडर्ड डेव्हिएशनची सुधारणा आढळली. सोप्या शब्दांत सांगायचे तर, हे वर्षभरात सुमारे एक ते दोन आठवड्यांच्या अतिरिक्त अभ्यासाएवढे आहे. म्हणजेच प्रत्येक तासाच्या अभ्यासात सुमारे दोन मिनिटांचा अतिरिक्त सकारात्मक परिणाम दिसून आला. ही सुधारणा गणित आणि वाचन या दोन्ही विषयांमध्ये पाहायला मिळाली. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक अशा तिन्ही स्तरांतील विद्यार्थ्यांवर याचा परिणाम जवळपास सारखाच होता.

शाळांतील विद्यार्थ्यांची आर्थिक स्थिती आणि त्यांची आधीची शैक्षणिक कामगिरी या आधारावरही या परिणामात फार मोठा फरक आढळला नाही. वर्षभरात ज्या विद्यार्थ्यांची वाचन क्षमता मोठ्या प्रमाणात खालावते, अशा विद्यार्थ्यांची संख्या कमी करण्यास मोबाईल बंदीमुळे मदत होऊ शकते, असेही अहवालात नमूद केले आहे. म्हणजेच ज्या मुलांचे लक्ष वारंवार विचलित होते, त्यांना फोनपासून दूर ठेवल्यास अभ्यासात फायदा होऊ शकतो.

Infosys Prize 2026: ‘स्लो बॉन्ड प्रॉब्लेम’चा गुंता उलगडला! भारतीय गणितज्ञ रिद्धिप्रतिम बासूंच्या ‘या’ कामगिरीचा सन्मान

२०१३ पासून विद्यार्थ्यांचे गुण सातत्याने घसरत होते

हार्वर्डच्या अहवालात आणखी एक महत्त्वाची आकडेवारी समोर आली आहे. अमेरिकेत २०१३ ते २०२४ दरम्यान आठवीच्या विद्यार्थ्यांच्या गणित आणि वाचनाच्या कामगिरीत जवळपास एका ग्रेडइतकी घसरण नोंदवली गेली. दरवर्षी सुमारे २ ते ३ आठवड्यांच्या अभ्यासाएवढे शैक्षणिक नुकसान होत होते. स्मार्टफोन आणि ब्रॉडबँड इंटरनेटच्या वेगाने वाढणाऱ्या वापरासोबत ही घसरण दिसून आल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. शाळांमध्ये मोबाईलवर बंदी घातल्यास या वार्षिक घसरणीच्या जवळपास निम्म्या भागाची भरपाई होऊ शकेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: हार्वर्ड विद्यापीठाचा हा अभ्यास नेमका काय आहे?

    Ans: अमेरिकेतील ४,६०० शाळांमधील ३३ लाख विद्यार्थ्यांचा ५ वर्षांचा डेटा तपासून, शाळेत मोबाईल बंदी घातल्यास अभ्यासात किती सुधारणा होते, याचा अभ्यास हार्वर्डच्या CEPR संस्थेने केला आहे.

  • Que: 'Yondr Pouches' म्हणजे काय?

    Ans: हे एक खास लॉक होणारे पाऊच आहे. शाळेत आल्यावर विद्यार्थी फोन यात ठेवतात आणि तो लॉक केला जातो, जो शाळा सुटल्यावरच उघडतो.

  • Que: मोबाईल बंदीमुळे अभ्यासात किती सुधारणा झाली?

    Ans: लॉक पाऊचद्वारे कठोर बंदी असलेल्या शाळांमधील विद्यार्थ्यांची गणित आणि वाचन क्षमता वर्षभरात १ ते २ आठवड्यांच्या अतिरिक्त अभ्यासाएवढी सुधारली.

Web Title: Harvard study mobile phone ban in schools student performance marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 10:57 AM

Topics:  

  • education
  • mobile
  • study

संबंधित बातम्या

Infosys Prize 2026: ‘स्लो बॉन्ड प्रॉब्लेम’चा गुंता उलगडला! भारतीय गणितज्ञ रिद्धिप्रतिम बासूंच्या ‘या’ कामगिरीचा सन्मान
1

Infosys Prize 2026: ‘स्लो बॉन्ड प्रॉब्लेम’चा गुंता उलगडला! भारतीय गणितज्ञ रिद्धिप्रतिम बासूंच्या ‘या’ कामगिरीचा सन्मान

NTA Duplicate Scorecard: स्कोरकार्ड हरवण्याची चिंता संपली! अर्ज करण्यापूर्वी ‘हे’ तपासा; NTA चा नवा नियम जाहीर
2

NTA Duplicate Scorecard: स्कोरकार्ड हरवण्याची चिंता संपली! अर्ज करण्यापूर्वी ‘हे’ तपासा; NTA चा नवा नियम जाहीर

Nav Bharat Saaksharta Karyakram: शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक यश! देशाचा साक्षरता दर ८१.१ टक्क्यांवर; शर्यतीत ‘ही’ राज्ये आघाडीवर
3

Nav Bharat Saaksharta Karyakram: शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक यश! देशाचा साक्षरता दर ८१.१ टक्क्यांवर; शर्यतीत ‘ही’ राज्ये आघाडीवर

India First Deeptech U-Hub: देशातील पहिला डीपटेक यू-हब उभारला जाणार ‘या’ शहरात; सरकारने मंजूर केला २८१ कोटींचा निधी
4

India First Deeptech U-Hub: देशातील पहिला डीपटेक यू-हब उभारला जाणार ‘या’ शहरात; सरकारने मंजूर केला २८१ कोटींचा निधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.