Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 21 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Infosys Prize 2026: ‘स्लो बॉन्ड प्रॉब्लेम’चा गुंता उलगडला! भारतीय गणितज्ञ रिद्धिप्रतिम बासूंच्या ‘या’ कामगिरीचा सन्मान

Riddhipratim Basu Infosys Prize 2026: संभाव्यता सिद्धांत आणि सांख्यिकीय भौतिकशास्त्रातील महत्त्वपूर्ण संशोधनासाठी, विशेषतः 'स्लो बॉन्ड प्रॉब्लेम'वरील निष्कर्षांसाठी बंगळुरू येथील गणितज्ञ रिद्धिप्रतिम बासू यांना 'इन्फोसिस प्राइज २०२६' ने सन्मानित करण्यात आले आहे.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Nov 21, 2026 | 04:53 PM
Image

Image

Follow Us
Follow Us:
  •  ‘स्लो बॉन्ड प्रॉब्लेम’चा गुंता उलगडला!
  •  कण विशिष्ट नियमानुसार पुढे जातात
  • ICTS असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत
Riddhipratim Basu Infosys Prize 2026:  पुढे सरकणाऱ्या कणांच्या एका रांगेतील बिंदूत छोटासा अडथळा निर्माण झाल्यास त्या रांगेच्या संपूर्ण गतीवर काय परिणाम होईल का? असा प्रश्न गणितज्ञ आणि भौतिकशास्त्रज्ञांमध्ये अनेक दशकांपासून चर्चेचा विषय बनून राहिला होता. बंगळूरस्थित एका भारतीय गणितज्ञ रिद्धिप्रतिम बासू यांनी हा प्रश्न सोडवण्यात मोलाचा वाटा उचललेला आहे. त्यांनी एका बिंदूत लहानसा अडथळाही संपूर्ण प्रणालीतील प्रवाहाचा वेग मंदावू शकतो, हे सिद्ध करून दाखवले आहे.

संभाव्यता सिद्धांत (Probability Theory) आणि सांख्यिकीय भौतिकशास्त्रातील (Statistical Physics) त्यांच्या कार्याबद्दल इन्फोसिस प्राइज 2026 (Infosys Prize 2026) च्या गणितीय विज्ञान (Mathematical Sciences) श्रेणीत ज्या योगदानाला गौरवण्यात आले, त्यामध्ये ‘स्लो बॉन्ड प्रॉब्लेम’ (Slow-Bond Problem) या महत्त्वाच्या निष्कर्षांचे यश आहे.

 कण विशिष्ट नियमानुसार पुढे जातात

स्लो बॉन्ड प्रॉब्लेम हा परस्परसंवादी कण प्रणालीच्या अभ्यासातून आला असून यामध्ये कण विशिष्ट नियमानुसार पुढे जातात आणि एकमेकांवर परिणाम करतात. हे आपण सोप्या भाषेत समजून घ्यायचे झाल्यास एकेरी लेनच्या रस्त्यावरून पुढे जाणाऱ्या वाहनांची कल्पना करा, ज्यामध्ये पुढची जागा रिकामी असल्यासच प्रत्येक वाहन पुढे जाऊ शकते. जर रस्त्याच्या एका भागावर वेगमर्यादा थोडी कमी असेल तर त्यामुळे एकूणच वाहतूक प्रवाहाचा वेग कमी होतो का ?

Nav Bharat Saaksharta Karyakram: शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक यश! देशाचा साक्षरता दर ८१.१ टक्क्यांवर; शर्यतीत ‘ही’ राज्ये आघाडीवर

यावर इतर गणितज्ञासमवेत काम करताना बासू यांनी सिद्ध केले की अडथळा अगदी लहान असला तरी त्याचे उत्तर ‘होय’ असेच आहे. त्यांचे संशोधन रँडम ग्रोथ मॉडेल्स (Random Growth Models), पर्कोलेशन थिअरी (Percolation Theory) आणि दुर्मिळ घटनांच्या अभ्यासापर्यंत विस्तारलेले आहे; ज्यामध्ये प्रणाली आपल्या नेहमीच्या नमुन्यांपेक्षा पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने वागतात.

ICTS असोसिएट प्रोफेसर म्हणून कार्यरत

बासू यांचा शैक्षणिक प्रवास हा कोलकता येथील इंडियन स्टॅटिस्टकल इन्स्टिट्यूट मधून सुरू झाला. तिथे त्यांनी 2009 मध्ये बॅचलर ऑफ स्टॅटिस्टिक्स आणि 2011 मध्ये मास्टर ऑफ स्टॅटिस्टिक्स पदवी पूर्ण केली.

NTA Duplicate Scorecard: स्कोरकार्ड हरवण्याची चिंता संपली! अर्ज करण्यापूर्वी ‘हे’ तपासा; NTA चा नवा नियम जाहीर

त्यानंतर त्यांनी कॅलिफोर्निया विद्यापीठात प्रवेश घेतला आणि 2015 मध्ये ॲलन स्लाय यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॅटिस्टिक्समध्ये पीएचडी पूर्ण केली. भारतात परतण्यापूर्वी त्यांनी पुढील दोन वर्ष स्टॅनफोर्ड विद्यापीठात स्झेगो असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम केले. नंतर ते टाटाच्या इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरेटिकल सायन्सेसमध्ये रुजू झाले. सध्या ते ICTS असोसिएट प्रोफेसर असून त्यांचे संशोधन संभाव्यता सिद्धांत आणि सांख्यिकीय भौतिकशास्त्रावर केंद्रित आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: रिद्धिप्रतिम बासू यांना कोणत्या कार्यासाठी 'इन्फोसिस प्राइज २०२६' मिळाले आहे?

    Ans: संभाव्यता सिद्धांत आणि सांख्यिकीय भौतिकशास्त्रातील त्यांच्या संशोधनाबद्दल, विशेषतः 'स्लो बॉन्ड प्रॉब्लेम' या निष्कर्षासाठी त्यांना गणितीय विज्ञान श्रेणीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

  • Que: 'स्लो बॉन्ड प्रॉब्लेम' मध्ये कोणता महत्त्वाचा निष्कर्ष मांडण्यात आला आहे?

    Ans: पुढे सरकणाऱ्या कणांच्या रांगेत किंवा एकेरी लेनवरील वाहतुकीत केवळ एकाच बिंदूवर लहानसा अडथळा निर्माण झाल्यास त्याचा परिणाम संपूर्ण प्रणालीतील प्रवाहाचा वेग मंदावण्यात होऊ शकतो, हे यातून सिद्ध झाले आहे.

  • Que: रिद्धिप्रतिम बासू सध्या कोठे कार्यरत आहेत आणि त्यांचे शिक्षण कोठे झाले आहे?

    Ans: ते सध्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च अंतर्गत येणाऱ्या बंगळुरू येथील इंटरनॅशनल सेंटर फॉर थिअरेटिकल सायन्सेस (ICTS) मध्ये असोसिएट प्रोफेसर असून, त्यांनी ISI कोलकाता येथून पदवी-पदव्युत्तर शिक्षण आणि कॅलिफोर्निया विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली आहे.

Web Title: Riddhipratim basu infosys prize 2026 slow bond problem icts marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 21, 2026 | 04:53 PM

Topics:  

  • education
  • Infosys Company
  • Marathi News

संबंधित बातम्या

NTA Duplicate Scorecard: स्कोरकार्ड हरवण्याची चिंता संपली! अर्ज करण्यापूर्वी ‘हे’ तपासा; NTA चा नवा नियम जाहीर
1

NTA Duplicate Scorecard: स्कोरकार्ड हरवण्याची चिंता संपली! अर्ज करण्यापूर्वी ‘हे’ तपासा; NTA चा नवा नियम जाहीर

Nagpur News : लग्नसराईत सोने-चांदीचे भाव ‘धडाम; परिणाम लग्नसराईतील खरेदीवर
2

Nagpur News : लग्नसराईत सोने-चांदीचे भाव ‘धडाम; परिणाम लग्नसराईतील खरेदीवर

Nagpur News : अधिवेशनापूर्वी अवैध होर्डिंग्जवर मनपाचा बडगा; विशेष मोहीम राबवणार
3

Nagpur News : अधिवेशनापूर्वी अवैध होर्डिंग्जवर मनपाचा बडगा; विशेष मोहीम राबवणार

Nav Bharat Saaksharta Karyakram: शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक यश! देशाचा साक्षरता दर ८१.१ टक्क्यांवर; शर्यतीत ‘ही’ राज्ये आघाडीवर
4

Nav Bharat Saaksharta Karyakram: शिक्षण क्षेत्रात ऐतिहासिक यश! देशाचा साक्षरता दर ८१.१ टक्क्यांवर; शर्यतीत ‘ही’ राज्ये आघाडीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.