फोटो सौजन्य - Social Media
आज अॅनिमेशन टीव्ही, चित्रपट, व्हिडिओ गेम्स, जाहिराती, मोशन ग्राफिक्स, VFX अशा अनेक क्षेत्रांत मोठ्या प्रमाणात वापरले जाते. विद्यार्थ्यांसाठी अॅनिमेशनमध्ये भरपूर करिअर संधी उपलब्ध आहेत. Animation म्हणजे काय? तर एका सेकंदात जलद गतीने बदलणारे २५ ते ३० स्थिर चित्रांचा साठा! त्यांच्या जलद गतीच्या बदलामुळे त्यांना महत्व प्राप्त होते. ही तंत्रज्ञान-आधारित कला सामान्य फिल्मपेक्षा जास्त वेगाने प्रोजेक्ट होते.
जर तुम्हाला या क्षेत्रात करिअर घडवायचे असेल तर आता टेन्शन नॉट! दहावी शिक्षण झालाय तर सर्टिफिकेट कोर्स करा. बारावी झालाय तर पदवी किंवा डिप्लोमा कोर्स करा आणि पदवीधर आहात तर पदव्युत्तर कोर्स करा. बरेच संस्थान प्रवेश परीक्षा घेतात तर त्याची पायाभूत तयारी असू द्या. तर काही संस्थाने अशीही आहेत, ज्या प्रवेश परीक्षापेक्षा बारावीमध्ये मिळालेल्या गुणांना प्राधान्य देतात, तर तुमच्या इच्छा नुसार तुम्ही त्या संस्थानामध्ये प्रवेश मिळवावा.
ऍनिमेशन क्षेत्रात महत्वाच्या संधी म्हणजे फॉरेन्सिक अॅनिमेटर, फ्लॅश अॅनिमेटर, कॅरेक्टर अॅनिमेटर, 2D/3D अॅनिमेटर, 3D मॉडेलर, टेक्सचर आर्टिस्ट आणि कंपोझिटिंग आर्टिस्ट म्हणून तुम्हाला काम करता येते. या क्षेत्रात पगारही फार आहे आणि भविष्यात या क्षेत्राची वाढ पाहता, पगारातही वाढ होण्याची शक्यता आहे.






