Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Army Medical Officer Jobs: भारतीय सैन्यात डॉक्टर व्हायचयं! मग ‘हे’ पात्रता निकष लगेच जाणून घ्या

Indian Army Medical Officer Jobs: मेडिकल ऑफिसर बनण्यासाठी MBBS सोबतच NEET UG उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. भारतीय लष्कराच्या AFMS अंतर्गत AFMC पुणे आणि SSC द्वारे डॉक्टर कसे बनता येते, जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 10, 2026 | 11:59 AM
मेडिकल ऑफिसर

मेडिकल ऑफिसर

Follow Us
Follow Us:

How to Become a Medical Officer: हेल्थ सेक्टरमध्ये ‘मेडिकल ऑफिसर’ हे पद अत्यंत जबाबदारीचे मानले जाते. केंद्र सरकारची रुग्णालये असोत, राज्यातील आरोग्य केंद्रे असोत किंवा भारतीय सेनेचे क्षेत्र असो, प्रत्येक ठिकाणी मेडिकल ऑफिसरला मोठी मागणी असते. वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात अनेकदा संभ्रम असतो की, या पदापर्यंत पोहोचण्यासाठी ‘नीट’ परीक्षा पास करणे गरजेचे आहे का?  देशातील अनेक होतकरू डॉक्टर आणि मेडिकलचे विद्यार्थी भारतीय सैन्यात (Indian Army) सामील होण्याचे स्वप्न पाहतात. सैन्यात मेडिकल ऑफिसर म्हणून भरती होण्यासाठी ‘भारतीय सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा’ तर्फे विशेष संधी दिल्या जातात. जाणून घ्या, सैन्यात मेडिकल ऑफिसर (Indian Army Medical Officer Jobs) बनण्यासाठी नीट देणे आवश्यक आहे का आणि सेनेच्या मेडिकल कोअरमध्ये एंट्री करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे.

मेडिकल ऑफिसर बनण्यासाठी ‘NEET’ आवश्यक आहे का?

मेडिकल ऑफिसर बनण्यासाठी सर्वात मूलभूत पात्रता म्हणजे तुमच्याकडे MBBS ची डिग्री असणे आवश्यक आहे. भारतात कोणत्याही मान्यताप्राप्त मेडिकल कॉलेजमधून MBBS मध्ये प्रवेश मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे NEET UG परीक्षा उत्तीर्ण करणे हाच आहे.

थोडक्यात सांगायचे तर, मेडिकल ऑफिसरच्या नोकरीसाठी थेट कोणतीही ‘नीट’ परीक्षा द्यावी लागत नाही; पण त्या नोकरीसाठी आवश्यक असलेली पदवी (MBBS) मिळवण्यासाठी ‘नीट’ पास करणे १००% अनिवार्य आहे. नीट परीक्षेविना तुम्ही डॉक्टर बनू शकत नाही आणि डॉक्टर बनल्याशिवाय मेडिकल ऑफिसर होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही!

Education Transformation: कंपन्यांना डिग्रीपेक्षा ‘कौशल्याची’ गरज का वाटतेय? जाणून घ्या शिक्षणातील नव्या बदलाची नेमकी कारणे..

MBBS ची पदवी आणि १ वर्षाची अनिवार्य इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर, तुम्ही मेडिकल ऑफिसरच्या पदांसाठी पात्र ठरता. यानंतर सरकारी क्षेत्रात जाण्याचे प्रामुख्याने दोन मार्ग आहेत.

भारतीय सैन्यात डॉक्टर बनण्याचे २ मुख्य मार्ग

१. AFMC पुणे द्वारे डायरेक्ट एंट्री (MBBS साठी)

जर तुम्हाला शालेय शिक्षण संपल्यानंतर लगेचच सैन्यात डॉक्टर व्हायचे असेल, तर १२ वी नंतर NEET UG परीक्षेत टॉप रँक मिळवावी लागेल. या गुणांच्या आधारे तुम्हाला सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय येथे शॉर्टलिस्ट केले जाईल. तिथे मुलाखत आणि वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण झाल्यानंतर तुम्हाला MBBS चे शिक्षण दिले जाते. अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर, सैन्यात थेट ‘लेफ्टनंट’ किंवा समकक्ष पदावर कमिशन (नियुक्ती) दिले जाते.

Join Indian Army: भारतीय सैन्यात इंजिनिअर्ससाठी मोठी भरती; कोणतीही फी नाही, अर्ज करण्याच्या सोप्या स्टेप्स पहा एका क्लिकवर..

२. सिव्हिलियन MBBS डॉक्टरांसाठी एंट्री (AFMS SSC Entry)

देशातील इतर कोणत्याही मेडिकल कॉलेजमधून MBBS किंवा MD/MS पूर्ण केल्यानंतरही तुम्ही सैन्यात जाऊ शकता. भारतीय सेना दरवर्षी AFMS Short Service Commission (SSC) Officer साठी अर्ज मागवते. यामध्ये उमेदवारांना त्यांच्या MBBS आणि नीट पीजी (NEET PG) गुणांच्या किंवा NBE च्या मानदंडांच्या आधारे मुलाखत आणि मेडिकल फिटनेस टेस्टसाठी बोलावले जाते. यात यशस्वी होणाऱ्या डॉक्टरांना थेट ‘कॅप्टन’ पदावर सैन्यात नियुक्त केले जाते.

Web Title: How to become indian army medical officer afms neet mandatory criteria marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 11:53 AM

Topics:  

  • Government Job
  • indian army
  • Medical Sector

संबंधित बातम्या

Army Doctor : भारतीय सैन्यात डॉक्टर कसे बनतात? जाणून घ्या परीक्षा, पात्रता आणि सॅलरी पॅकेज..
1

Army Doctor : भारतीय सैन्यात डॉक्टर कसे बनतात? जाणून घ्या परीक्षा, पात्रता आणि सॅलरी पॅकेज..

Indian Coast Guard Recruitment 2026: संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी ६ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू
2

Indian Coast Guard Recruitment 2026: संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची मोठी संधी! ‘या’ पदांसाठी ६ ऑक्टोबरपासून अर्ज सुरू

SSC Exam 2026: मोठी बातमी! SSC च्या ३ प्रमुख परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित; पाहा महत्त्वाच्या तारखा
3

SSC Exam 2026: मोठी बातमी! SSC च्या ३ प्रमुख परीक्षांचे सुधारित वेळापत्रक घोषित; पाहा महत्त्वाच्या तारखा

SSC CGL Exam च्या पहिल्याच दिवशी असे काय घडले? १०,००० जागा असूनही ६०% हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा सोडली
4

SSC CGL Exam च्या पहिल्याच दिवशी असे काय घडले? १०,००० जागा असूनही ६०% हून अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा सोडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.