फोटो सौजन्य- सोशल मीडिया
सोनाजी गाढवे / नवराष्ट्र पुणे.
11th Admission Maharashtra 2026: राज्यातील शैक्षणिक वर्षाचा पहिला टप्पा संपत आला असतानाही राज्यातील अकरावीची प्रवेशप्रक्रिया अद्याप सुरूच आहे. तीन नियमित फेऱ्यांनंतर विशेष फेऱ्यांचा सिलसिला कायम असून, आता बारावी विशेष फेरी जाहीर करण्यात आली आहे. या फेरीचे प्रवेश वाटप झाले असून, विद्यार्थ्यांना आज दिंनाक २९ सप्टेंबरपर्यंत संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित करता येणार आहे. त्यानंतर १ ऑक्टोबरला रिक्त जागा जाहीर केल्या जाणार आहेत.
राज्यातील ९ हजार ७१८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावीच्या एकूण २२ लाख ४९ हजार ७९ जागा आहेत. आतापर्यंत १३ लाख ६३ हजार ४३८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला असून, तब्बल ८ लाख ८५ हजार ६४१ जागा रिक्त आहेत. दहावी उत्तीर्ण १५ लाख ६२ हजार ८५९ विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. केंद्रीय ऑनलाइन प्रवेशाच्या १९ लाख २२ हजार ८२९ जागांपैकी ११ लाख ९५ हजार ४०५ प्रवेश झाले आहेत. तर कोट्यातील ३ लाख २६ हजार २५० जागांपैकी १ लाख ६८ हजार ०३३ प्रवेश झाले आहेत.
अकरावी प्रवेशातून कोणी वंचीत राहून नये म्हणून दि. २५,२६,२७ या तीनही दिवशी विध्यर्थायंना संदेश पाठवाला आहे. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश आद्याप घेतले नाहीत त्यांनी प्रवेश घ्यावेत. जर यावेळी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले नाहीत तर विद्यार्थी जबाबदार राहतील, असे वक्तव्य डॉ. महेश पालकर यांनी केले.
| तपशील | संख्या / आकडेवारी |
|---|---|
| कनिष्ठ महाविद्यालये | ९,७१८ |
| विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी नोंदणी | १५,६२,८५९ |
| केंद्रीय ऑनलाइन प्रवेशाच्या जागा | १९,२२,८२९ |
| केंद्रीय ऑनलाइन झालेले प्रवेश | ११,९५,४०५ |
| रिक्त जागा (केंद्रीय ऑनलाइन) | ७,२७,४२४ |
| कोटा अंतर्गत असलेल्या जागा | ३,२६,२५० |
| कोट्यातील झालेले प्रवेश | १,६८,०३३ |
| कोट्यातील रिक्त जागा | १,५८,२१७ |
| एकूण जागा | २२,४९,०७९ |
| एकूण आतापर्यंतचे प्रवेश | १३,६३,४३८ |
| एकूण रिक्त जागा | ८,८५,६४१ |
| टप्पा / कार्य | दिनांक व वेळ |
| प्रवेश निश्चिती | २८ ते २९ सप्टेंबर (दुपारी ३ ते आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत) |
| कनिष्ठ महाविद्यालय संबंधित कामकाज राखीव | ३० सप्टेंबर |
| डाटा प्रोसेसिंग | १ ऑक्टोबर |
| रिक्त जागा प्रदर्शित करणे | १ ऑक्टोबर (दुपारी ४ वाजता) |






