
admission
IIT Admission News: आयआयटीमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी एक खुषखबर आहे. भारतीय तंत्रज्ञान संस्था (IIT) खरगपूर यांच्याकडून Joint Admission Test for Masters (JAM) 2027 साठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया १२ सप्टेंबर २०२६ पासून सुरू केली जाणार आहे. मास्टर्स, जॉइंट मास्टर्स आणि पीएचडी संबंधित विविध कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणारे उमेदवार jam.iitkgp.ac.in या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करू शकतात.
१. उमेदवारांनी jam.iitkgp.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी.
२. तेथे उपलब्ध असलेल्या “Application Portal” वर क्लिक करून नोंदणी (Registration) करावी.
३. अर्जामध्ये शैक्षणिक माहिती भरून, आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत आणि आपल्या प्रवर्गानुसार (Category) अर्ज शुल्क जमा करावे.
परीक्षेची तारीख: १४ फेब्रुवारी २०२७
Women in Police Force: देशात सर्वाधिक महिला पोलीस कोणत्या राज्यात? जाणून घ्या एका क्लिकवर…
पहिली सत्र (सकाळी ९:३० ते दुपारी १२:३०): Chemistry (CY), Geology (GG) आणि Mathematics (MA).
दुसरे सत्र (दुपारी २:३० ते संध्याकाळी ५:३०): Biotechnology (BT), Economics (EN), Mathematical Statistics (MS) आणि Physics (PH).
| प्रवर्ग (Category) | १ पेपरसाठी शुल्क | २ पेपर्ससाठी शुल्क |
| महिला / SC / ST / PwD | ₹१,०००/- | ₹१,३५०/- |
| इतर सर्व उमेदवार | ₹२,०००/- | ₹२,७००/- |
IIT JAM परीक्षेच्या गुणवत्तेनुसार विविध आयआयटी आणि नामांकित संस्थांमध्ये खालील कोर्सेससाठी प्रवेश दिला जाणार आहे.