Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शैक्षणिक धोरणात महत्त्वपूर्ण तरतुदी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी केले प्रतिपादन

विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून तयार करण्यात आलेले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० उच्च शिक्षणात सकारात्मक बदल घडवणारे ठरेल, असा विश्वास मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केला. ‘मस्ट’ आयोजित कार्यशा

  • By नुपूर भगत
Updated On: Dec 14, 2025 | 12:18 PM
शैक्षणिक धोरणात महत्त्वपूर्ण तरतुदी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी केले प्रतिपादन

शैक्षणिक धोरणात महत्त्वपूर्ण तरतुदी, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी केले प्रतिपादन

Follow Us
Close
Follow Us:
  • राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० मध्ये विद्यार्थी हा केंद्रस्थानी असून त्याच्या सर्वांगीण विकासावर भर देण्यात आला आहे.
  • लवचिक अभ्यासक्रम, बहुभाषिक शिक्षण, कौशल्याधारित व डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांसाठी नव्या शैक्षणिक आणि करिअरच्या संधी उपलब्ध होत आहेत.
  • शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी सुसंवाद साधून धोरणाची सकारात्मक अंमलबजावणी केल्यास भविष्यात चांगले परिणाम दिसून येतील.
उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात विद्यार्थी हा केंद्रस्थानी असून प्रतिभावान युवा पिढीच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात महत्त्वपूर्ण तरतुदी आहेत. विद्याथ्यांची गरज व आवड लक्षात घेऊन तयार झालेल्या शैक्षणिक धोरणात अनेक सकारात्मक बाबी आहेत. शिक्षण क्षेत्रातील सर्व घटकांनी सुसंवाद साधत त्याचा सकारात्मक विचार केला तर भविष्यात खूप चांगले परिणाम दिसतील, असे प्रतिपादन मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी केले.

12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी! CBSE कडून सरकारी नोकरीची भरती मोहीम जाहीर , कधी आणि कसा अर्ज करू शकता? जाणून घ्या..

महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटना (मस्ट) आयोजित ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरणः २०२०- विद्यार्थी, शिक्षक व समाजावरील परिणाम व आव्हाने’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

प्राध्यापक, विद्याथ्यांच्या प्रश्नाचे शंकानिरसन

कार्यशाळेचे उद्घाटन कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. लवचिक व प्रभावी नव्या शैक्षणिक धोरणाची रचना, बहुभाषिक शिक्षण, कौशल्याधारित अभ्यासक्रम व डिजिटल शिक्षण पद्धती यांविषयी अभ्यासपूर्ण मार्गदर्शन करीत प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे देऊन उपस्थितांशी त्यांनी संवाद साधला. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीत काळानुरूप अनेक महत्त्वपूर्ण बदल सूचविलेले असून भविष्यात विद्याथ्यांच्या शिक्षण व करिअरच्या दृष्टीने अनेक नव्या संधी उपलब्ध होत आहेत. ‘मस्ट’ चे अध्यक्ष डॉ. विजय पवार यांनी या कार्यशाळेमागची भूमिका प्रास्ताविकातून मांडली.

RBI Summer Internship 2025: बँकिंग करिअरसाठी सुवर्णसंधी, दरमहा ₹20 हजार स्टायपेंड; RBI समर इंटर्नशिपसाठी आजच करा अर्ज

विद्यार्थी, प्राध्यापक आणि शैक्षणिक क्षेत्रातील घटकांना जाणवत असणाऱ्या प्रश्नांबद्दल चर्चा घडवून आणावी आणि योग्य असे मार्गदर्शन मिळावे या हेतूने कार्यशाळेचे आयोजन केल्याचे डॉ. पवार यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्नांबाबत ‘मस्ट’ संघटना सातत्याने प्रयत्नशील असून सर्व घटकांना बरोबर घेऊन कार्य करत असल्याचे त्यांनी नमूद केले, शैक्षणिक धोरणात अत्यंत महत्त्वाचे योगदान दिलेले मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी या कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून लाभले याबद्दल त्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले.

Web Title: Important provisions in the educational policy stated by mumbai university vice chancellor dr ravindra kulkarni

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 12:18 PM

Topics:  

  • Career
  • Mumbai

संबंधित बातम्या

12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी! CBSE कडून सरकारी नोकरीची भरती मोहीम जाहीर , कधी आणि कसा अर्ज करू शकता? जाणून घ्या..
1

12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी नोकरीची संधी! CBSE कडून सरकारी नोकरीची भरती मोहीम जाहीर , कधी आणि कसा अर्ज करू शकता? जाणून घ्या..

BCCI मध्ये सुद्धा सरकारी नोकरी आहेत का? Vacancy बाबत कसे समजणार? जाणून घ्या सर्वकाही
2

BCCI मध्ये सुद्धा सरकारी नोकरी आहेत का? Vacancy बाबत कसे समजणार? जाणून घ्या सर्वकाही

संजय दत्तला मारलं, मुंबईचा चेहरा बदलावला, 1993 बॉम्बस्फोट आणि 26/11 उकलणारा ‘सुपरकॉप’; IPS राकेश मारिया पुन्हा चर्चेत
3

संजय दत्तला मारलं, मुंबईचा चेहरा बदलावला, 1993 बॉम्बस्फोट आणि 26/11 उकलणारा ‘सुपरकॉप’; IPS राकेश मारिया पुन्हा चर्चेत

Pune University च्या ४ ही विद्याशाखांचे अधिष्ठाता पद तीन वर्षांपासून रिक्त; अर्ज सादर करण्यासाठी…
4

Pune University च्या ४ ही विद्याशाखांचे अधिष्ठाता पद तीन वर्षांपासून रिक्त; अर्ज सादर करण्यासाठी…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.