रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) या इंटर्नशीप कार्यक्रममध्ये विद्यार्थ्यांना भारताच्या मध्यवर्ती बँकेच्या कामकाजाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची तसेच वास्तविक जगातील आर्थिक, नियामक आणि धोरण संशोधन वातावरणात काम करण्याची एक अनोखी संधी प्रदान करतो.
या इंटर्नशिप साठी पात्रता काय?
मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून मैनेजमेंट, स्टेटिस्टिक, लॉ, बैंकिग, इकोनॉमिक्स, कॉमर्स, इकोनॉमेट्रिक्स, फाइनेंस या विषयांमध्ये पोस्ट ग्रेजुए, इंटीग्रेटेड पाच किंवा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम घेत असलेले उमेदवारच RBI इंटर्नशिपसाठी अर्ज करण्यास पात्र आहेत. तीन वर्षांचा, पूर्ण-वेळ कायदा अभ्यासक्रम घेत असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकता. या इंटर्नशिपसाठी फक्त अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या किंवा शेवटच्या वर्षातील विद्यार्थीच पात्र आहेत. उमेदवारांना अर्ज करण्यापूर्वी अधिकृत अधिसूचनेतील पात्रता आणि शैक्षणिक पात्रता तपासून घ्यावे.
परदेशात शिक्षण घेणारे विद्यार्थी देखील या इंटर्नशिपसाठी अर्ज करू शकतात. इंटर्नशिपसाठी जास्तीत जास्त १२५ उमेदवारांची निवड केली जाईल. शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती फेऱ्या जानेवारी आणि फेब्रुवारी २०२६ मध्ये होण्याची अपेक्षा आहे.
स्टायपेंड किती?
उमेदवारांना इंटर्नशिप दरम्यान ₹२०,००० मासिक स्टायपेंड मिळेल. या इंटर्नशिपसाठी सिलेक्ट झालेल्या उमेदवारांना त्यांचे कॉलेज किंवा संस्था आणि इंटर्नशिप इन्स्टिटयूट दरम्यान एसी II-टियर ट्रेन किंवा समतुल्य (प्रवास भत्ता) देखील मिळेल.
इंटर्नशिप कालावधी किती?
RBI उन्हाळी इंटर्नशिप साधारणपणे एप्रिल ते जुलै दरम्यान जास्तीत जास्त तीन महिन्यांसाठी असणार आहे. बँक प्रकल्पाच्या गरजांनुसार अचूक कालावधी समायोजित करू शकते.
निवड प्रक्रिया काय?
शॉर्टलिस्टिंग आणि मुलाखती जानेवारी-फेब्रुवारी २०२६ मध्ये होतील. अंतिम निवड प्रक्रिया फेब्रुवारी आणि मार्च दरम्यान जाहीर केली जाणार. बँकिंग आणि वित्तीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही इंटर्नशिप एक उत्कृष्ट पाया प्रदान करू शकते.
अर्ज कुठे करावे?
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२५ अशी आहे. उमेदवारांनी लवकरात लवकर यासाठी अर्ज करणे आवश्यक आहे. यासाठी अधिक माहिती करिता अधिकृत वेबसाइट opportunities.rbi.org.in ला भेट देऊ शकता. तुम्ही या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन अर्ज करु शकता.
Ans: 15 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख आहे.
Ans: दरमहा ₹20,000 स्टायपेंड दिले जाते.
Ans: जास्तीत जास्त 3 महिने (एप्रिल ते जुलै).






