Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात ‘या’ Skills ची मोठी मागणी; Tech कंपन्यांमध्ये नोकरी मिळवणं होईल सोपं

आजच्या काळात तंत्रज्ञान क्षेत्रात  करिअर करण्याची क्रेझ तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, केवळ पदवी असून चालत नाही, तर कंपन्यांना नेमके काय हवे आहे हे समजून घेणं आवश्यक आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 23, 2026 | 03:08 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कंपन्यांना नेमके काय हवे आहे हे समजून घेणे आवश्यक
  • अनुभवी व्यावसायिकांची वाढती मागणी
  • AI सुद्धा नाकारू शकणार नाही असा रेझ्युमे 
‘These’ Skills Are in High Demand : आजच्या काळात तंत्रज्ञान क्षेत्रात  करिअर करण्याची क्रेझ तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, केवळ पदवी असून चालत नाही, तर कंपन्यांना नेमके काय हवे आहे हे समजून घेणे आवश्यक आहे. एका नामांकित कंपनीच्या CEO नी तंत्रज्ञान क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी काही अत्यंत महत्त्वाच्या कौशल्यांची (Skills) यादी सांगितली आहे.

Railway Recruitment : रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! कोच अटेंडंट भरतीसाठी पात्रतेचे नियम बदलले; सविस्तर वाचा

 ‘असाना’च्या CEO यांचा सल्ला

डॅन रॉजर्स हे ‘असाना’चे (Asana) नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) आहेत. CEO बनण्यापूर्वी, डॅन रॉजर्स यांनी मायक्रोसॉफ्ट, डेल, ॲमेझॉन वेब सर्व्हिसेस, सेल्सफोर्स आणि सर्व्हिसनाऊ यांसारख्या अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये काम केलं आहे. रॉजर्स यांच्या मते, मागील पिढीच्या तुलनेत ‘Gen Z’ साठी सिलिकॉन व्हॅलीमध्ये नोकरी मिळवणे अधिक सोपं आहे.

तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी आवश्यक टिप्स

जर तुम्हाला मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांमध्ये म्हणजेच Tech Companie मध्ये काम करण्याची इच्छा असेल, तर तुमच्या शैक्षणिक पदवीसोबतच तुम्ही व्यावहारिक कौशल्येही विकसित करणे अत्यंत गरजेचे आहे. तुमच्या क्षमतांना अधिक शार्प करणं आवश्यक आहे. विविध प्रकल्पांमध्ये सहभागी होणे, तांत्रिक नैपुण्यता प्राप्त करणे आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेणं हे फार महत्त्वाचे आहे. शिवाय, तुमच्या करिअरची सुरुवात लहान जबाबदाऱ्यांपासून करा; थेट एखाद्या मोठ्या corporation पद मिळवण्याचे टार्गेट ठेवण्यापेक्षा, विविध संस्थांमध्ये वेगवेगळ्या पदांवर काम करून हळूहळू ‘मोठ्या लीग’मध्ये पोहोचण्याचा मार्ग तयार करता येतो.

अनुभवी व्यावसायिकांची वाढती मागणी

मोठ्या कंपन्यांमध्ये नोकरी मिळवण्यासाठी तांत्रिक नैपुण्य प्राप्त करणे ही एक मोठी अट आहे. शिवाय, आजच्या काळात, मोठ्या तंत्रज्ञान कंपन्या अशा उमेदवारांना प्राधान्य देतात, ज्यांनी यापूर्वीच लहान किंवा मध्यम आकाराच्या उद्योगांमध्ये कामाचा अनुभव मिळवलेला असतो.

AI सुद्धा नाकारू शकणार नाही असा रेझ्युमे

जरी तुम्हाला सुरुवातीला लहान कंपन्यांमध्ये काम करावं लागलं, तरी तुमच्या रेझ्युमेवर नमूद केलेली कौशल्ये आणि अनुभव इतके प्रभावी असावेत की, एखादी ‘AI स्क्रीनिंग सिस्टीम’ सुद्धा त्यांना नाकारू शकणार नाही. लहान कंपनीतून मोठ्या कंपनीत जाण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो, परंतु यश निश्चित मिळते. एक दिवस तुम्ही नक्कीच एखाद्या मोठ्या तंत्रज्ञान कंपनीत काम करणार आहात. तरीही, तुमच्या करिअरची सुरुवात लहान कंपन्यांपासून करा आणि विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या घेत काम करून अनुभव मिळवा, हे नेहमी महत्त्वाचं असणार आहे.

कौशल्ये हळूहळू विकसित करा

कोणतेही नवीन कौशल्य आत्मसात करण्यासाठी वेळ लागतो. पण जर तुम्ही तुमच्या करिअरच्या सुरुवातीच्या टप्प्यापासूनच हळूहळू कौशल्ये विकसित करण्यास सुरुवात केली, तर आकर्षक पगार आणि प्रतिष्ठित पद तुम्हाला आपोआपच प्राप्त होईल. तुम्ही जितक्या जास्त नवीन गोष्टी शिकाल, तितक्याच तुम्हाला मनासारखी नोकरी मिळवण्याच्या अधिक संधी उपलब्ध होतील. म्हणूनच, दररोज काहीतरी नवीन शिकण्याची सवय स्वतःला लावून घ्या.

सैनिक शाळांमध्ये आता तंत्रज्ञानाचे धडे; अभ्यासक्रमात समाविष्ट होणार AI आणि डेटा सायन्स!

Web Title: In the era of changing technology these skills are in high demand landing a job in tech companies

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • ai
  • Career News
  • Tech News

संबंधित बातम्या

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा
1

AI ची शर्यत धोक्याच्या वळणावर? निर्मात्यांनीच सरकारांना दिला नियंत्रण गमावण्याचा इशारा

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग
2

रोमिंगचा खर्च वाचणार! Vi ग्राहकांना वर्षातून 3 परदेश दौऱ्यांसाठी मिळणार फ्री इंटरनॅशनल रोमिंग

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
3

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी
4

Jio Recharge Plan: तब्बल 200 दिवसांची व्हॅलिडिटी अन् भरपूर डेटा… ‘या’ जिओ प्लॅनची यूजर्सना पडणार भूरळ, किंमत केवळ इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.