Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागात २५,००० हून अधिक जागांवर मेगा भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

India Post GDS Bharti 2026: भारतीय डाक विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) भरती २०२६ चे नोटिफिकेशन जाहीर केले आहे. २५ हजाराहून अधिक पदांसाठी असणाऱ्या या भरतीची पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 29, 2026 | 11:11 AM
India Post GDS Bharti

India Post GDS Bharti

Follow Us
Follow Us:

India Post GDS Bharti 2026: भारतीय टपाल विभागाने ग्रामीण टपाल सेवक (GDS) भरती २०२६ साठी नोटिफिकेशन जाहीर केले आहे. या भरतीद्वारे देशभरातील वेगवेगळ्या डाक सर्कल आणि डिव्हिजनमध्ये २५ हजारहून अधिक पदांवर नियुक्ती केली जाणार आहे. यामध्ये ब्रांच पोस्टमास्टर, असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर आणि डाक सेवक या पदांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही, तर दहावीच्या गुणांच्या आधारावर मेरिट लिस्ट तयार करून उमेदवारांची निवड केली जाईल.

दोन टप्प्यांत होईल अर्ज प्रक्रिया

डाक विभागातर्फे जारी केलेल्या GDS Online Engagement Schedule-II, July 2026 अंतर्गत अर्ज प्रक्रिया दोन टप्प्यांत पार पडेल. पहिल्यांदा उमेदवाराला वन टाईम रजिस्ट्रेशन करावे लागेल. ओटीआरची प्रक्रिया ३१ ऑगस्टपासून सुरू होईल, तर ऑनलाइन अर्ज आणि फी जमा करण्याची प्रक्रिया २ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजता सुरू होईल. तसेच इच्छुक उमेदवार २१ सप्टेंबर २०२६ रोजी संध्याकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करू शकतील.

१० वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

जीडीएस भरतीसाठी उमेदवाराचे १० वी पास असणे आवश्यक आहे. दहावीमध्ये गणित आणि इंग्रजी विषयात पासिंग मार्क्स असणे गरजेचे आहे. याशिवाय उमेदवाराने संबंधित सर्कलची निर्धारित स्थानिक भाषा किमान दहावीपर्यंत शिकलेली असावी. उमेदवाराकडे संगणकाचे ज्ञान आणि सायकल चालवण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी वयोमर्यादा १८ ते ४० वर्षे निश्चित करण्यात आली असून, वयाची गणना अर्जाच्या अंतिम तारखेच्या आधारावर केली जाईल. तसेच आरक्षित वर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत सूट मिळेल.

या पदांवर होईल नियुक्ती

या भरती अंतर्गत तीन प्रकारच्या पदांवर नियुक्ती केली जाईल:

ब्रांच पोस्टमास्टर (BPM): संबंधित ब्रांच पोस्ट ऑफिसची जबाबदारी सांभाळावी लागेल.

असिस्टंट ब्रांच पोस्टमास्टर (ABPM): डाक वितरण, स्टॅम्प आणि स्टेशनरीची विक्री तसेच इतर कामांमध्ये बीपीएम यांना मदत करावी लागेल.

डाक सेवक: डाक आणि पार्सलशी संबंधित कामे, स्टॅम्प विक्री आणि पोस्ट ऑफिसच्या इतर कार्यांची जबाबदारी पार पाडावी लागेल.

या भरतीमधील पदांची सर्कल आणि डिव्हिजननुसार संख्या जीडीएस ऑनलाइन एंगेजमेंट पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाईल. उमेदवार अर्ज करताना पदानुसार आपल्या पसंतीचे डिव्हिजन आणि पोस्ट निवडू शकतील.

१० वीच्या गुणांवर बनेल मेरिट

जीडीएस भरतीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड इयत्ता दहावीत मिळालेल्या गुणांच्या आधारावर तयार केलेल्या सिस्टम जनरेटेड मेरिट लिस्टद्वारे होईल. मेरिट लिस्टमध्ये शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांच्या मूळ कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. त्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि इतर औपचारिकता पूर्ण कराव्या लागतील. या पदांसाठी सर्व वर्गांसाठी अर्ज फी १०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. महिला, एससी, एसटी, पीडब्ल्यूबीडी आणि ट्रान्स वुमन उमेदवारांना फी मधून सूट देण्यात आली आहे.

Youth Employment Crisis: देशात तरुणांची संख्या वाढली पण नोकरी का मिळेना? जाणून घेण्यासाठी वाचा सविस्तर!

असा करू शकता अर्ज

1. उमेदवारांना सर्वात आधी जीडीएस ऑनलाइन एंगेजमेंट पोर्टलवर जाऊन वन टाईम रजिस्ट्रेशन करावे लागेल.

2. त्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्डच्या माध्यमातून लॉगिन करून ॲक्टिव्ह नोटिफिकेशनमध्ये अर्ज करावा लागेल.

3. अर्जादरम्यान वैयक्तिक माहिती, दहावीची शैक्षणिक माहिती, डिव्हिजन आणि पोस्टची पसंती नोंदवावी लागेल.

4. आता उमेदवाराला निर्धारित स्वरूपात आपला फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करावी लागेल.

5. ज्या उमेदवारांना अर्ज फी लागू आहे, त्यांनी ऑनलाइन फी जमा करावी.

अर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी २३ आणि २४ सप्टेंबर रोजी करेक्शन विंडो उघडली जाईल.

GATE 2027: गेट परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता, अटी आणि परीक्षा पॅटर्न..

Web Title: India post gds bharti 2026 apply online 25000 posts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2026 | 11:11 AM

Topics:  

  • Government Job
  • Indian Post
  • job news

संबंधित बातम्या

SNDT University Recruitment 2026: SNDT महिला विद्यापीठात ‘या’ पदांसाठी भरती; असा करा थेट अर्ज
1

SNDT University Recruitment 2026: SNDT महिला विद्यापीठात ‘या’ पदांसाठी भरती; असा करा थेट अर्ज

IIM Nagpur Recruitment 2026: आयआयएम नागपूरमध्ये ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी भरती जाहीर; ७ व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार!
2

IIM Nagpur Recruitment 2026: आयआयएम नागपूरमध्ये ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी भरती जाहीर; ७ व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार!

India Post GDS: जीडीएसची पहिली मेरिट लिस्ट जाहीर; अनेक राज्यांत कटऑफ १००% वर गेल्याने खळबळ
3

India Post GDS: जीडीएसची पहिली मेरिट लिस्ट जाहीर; अनेक राज्यांत कटऑफ १००% वर गेल्याने खळबळ

GDS Result 2026: ग्रामीण डाक सेवक भरतीची पहिली यादी आऊट! एका छोट्या चुकीमुळे रद्द होऊ शकते उमेदवारी; ‘या’ कागदपत्रांची ठेवा तयारी
4

GDS Result 2026: ग्रामीण डाक सेवक भरतीची पहिली यादी आऊट! एका छोट्या चुकीमुळे रद्द होऊ शकते उमेदवारी; ‘या’ कागदपत्रांची ठेवा तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.