फोटो सौजन्य - Social Media
बॅँकिंग क्षेत्रात मेडिकल विभागासंबंधित नोकरी शोधणाऱ्या व्यक्तींसाठी खास बातमी आहे. उमेदवारांना या संबंधित अर्ज करता येणार आहे. या भरतीला सुरुवात करण्यात आली आहे. उमेदवारांनी या संबंधित जाणून घेण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या अधिसूचनेचा आढावा घ्या. मुळात, या भरतीच्या माध्यमातून अथॉराइज्ड डॉक्टरच्या पदासाठी भरती सुरु करण्यात आली आहे. या पदासाठी इच्छुक उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज केला आहे. चला तर मग या भरतीविषयी अधिक सखोल माहिती जाणून घेऊयात:
इंडियन बँकेच्या या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करायचे आहे. अर्ज करण्यासाठी तसेच या भरती संबंधित अधिक माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी इंडियन बँकेच्या indianbank.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या. या भरतीसाठी अर्ज करण्याची विंडो खुली करण्यात आली आहे. ही विंडो २६ तारखेपर्यंत खुली ठेवण्यात आली आहे. उमेदवारांना दिलेल्या मुदतीच्या आत या भर्तीसाठी अर्ज करायचे आहे.
उमेदवारांना काही पात्रता निकष पात्र करावे लागणार आहेत. मुळात, या अटी शर्ती शैक्षणिक आहेत. एकंदरीत, मान्यताप्राप्त विद्यापीठातून उमेदवार MBBS असला पाहिजे. तसेच उमेदवाराकडे १० वर्षांचे अनुभव असणे अनिवार्य आहे. या निकषांना पात्र उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे. या भरतीसाठी निवड प्रक्रिया मुलाखतीच्या आधारावर होणार आहे. उमेदवारांची कोणतीही लिखित परीक्षा होणार नाही. अर्ज केलेल्या उमेदवारांपैकी पात्र आणि योग्य उमेदवारांची शॉर्टलिस्टिंग करण्यात येईल. शॉर्टलिस्ट झालेल्या उमेदवारांना पुढील टप्प्यातील मुलाखतीसाठी बोलावले जाईल. त्यामुळे अर्ज करताना सर्व आवश्यक माहिती व्यवस्थित भरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. इच्छुक उमेदवारांनी अर्जाचा फॉर्म भरून तो आवश्यक कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता असा आहे — मुख्य व्यवस्थापक, इंडियन बँक, प्रादेशिक कार्यालय, क्रमांक १, शालिवाहना रोड, नजरबाद, म्हैसूर – ५७००१०.
अर्ज पाठवताना उमेदवारांनी त्यांचे शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रांची छायाप्रत जोडणे अनिवार्य आहे. या भरतीबाबत कोणतेही प्रश्न असल्यास उमेदवार zomysore@indianbank.co.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. तसेच अधिक माहितीसाठी किंवा तांत्रिक शंका सोडवण्यासाठी 9482429592 या क्रमांकावर व्हॉट्सअॅपद्वारेही संपर्क साधता येईल. तुमच्याकडे योग्य पात्रता आणि अनुभव असल्यास ही नोकरी तुमच्यासाठी एक उत्तम संधी ठरू शकते. त्यामुळे दिलेल्या वेळेत अर्ज करून तुमच्या करिअरला नवी दिशा द्या.