Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 9 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Navy Recruitment 2026: भारतीय नौदलात बंपर भरती! १० वी आणि डिप्लोमा उत्तीर्ण असणाऱ्यांना सुवर्णसंधी!

Indian Navy Recruitment 2026: भारतीय नौदलात अग्निवीर अप्रेंटिस २०२६ ची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. १० वी उत्तीर्ण आणि डिप्लोमा धारकांसाठी अर्ज करण्याची पात्रता, वयोमर्यादा आणि इतर सविस्तर तपशील वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 22, 2026 | 11:58 AM
NEVY

NEVY

Follow Us
Follow Us:

Indian Navy Recruitment 2026 Explainer: जर तुम्हीही भारतीय नौदलात करिअर करण्याचे स्वप्न पाहत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. इंडियन नेव्हीने अग्निवीर अप्रेंटिस भरती २०२६ (Agniveer Apprentice Recruitment 2026) ची अर्ज प्रक्रिया ५ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून सुरू केली आहे.  ही अप्रेंटिस दोन बॅचमध्ये असून या भरतीद्वारे निवडल्या जाणाऱ्या उमेदवारांना टेक्निकल ट्रेनिंगसोबतच नौदलात काम करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख २९ जून २०२६ निश्चित करण्यात आली आहे, म्हणजेच यानंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

या भरतीसाठी कोण अर्ज करू शकते?

या भरतीसाठी १० वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात. तसेच  ज्यांनी इंजिनिअरिंग किंवा इलेक्ट्रिकल ट्रेडमध्ये ३ वर्षांचा डिप्लोमा कोर्स पूर्ण केला आहे. यासोबतच उमेदवाराला १० वी मध्ये किमान ५०% गुण आणि डिप्लोमा कोर्समध्येही किमान ५०% गुण असणे आवश्यक आहे. याशिवाय, उमेदवाराने आपला डिप्लोमा एआयसीटीई (AICTE) मान्यताप्राप्त पॉलिटेक्निक संस्थेतून पूर्ण केलेला असावा.

NEET UG 2026: नीट यूजी परीक्षेचा निकाल कधी लागणार? आन्सर-की डाउनलोड करण्याची सोपी पद्धत पाहा एका क्लिकवर….

वयोमर्यादा, वेतन आणि विमा यासंबंधी माहिती

वयोमर्यादा: वयोमर्यादेबाबत दोन्ही बॅचसाठी वेगवेगळे नियम आहेत. बॅच ०१/२०२७ साठी उमेदवाराचा जन्म १ डिसेंबर २००४ ते ३१ मे २००९ दरम्यान झालेला असावा. तर बॅच ०२/२०२७ साठी जन्म तारीख १ मे २००५ ते ३१ ऑक्टोबर २००९ दरम्यान निश्चित करण्यात आली आहे.

वेतन आणि विमा कवच: अग्निवीरांना पहिल्या वर्षापासून दरमहा ३०,००० रुपये मासिक वेतन मिळेल, ज्यामध्ये दरवर्षी ठराविक वाढ देखील होईल. ज्यामध्ये संपूर्ण कार्यकाळासाठी ४८ लाख रुपयांचे जीवन विमा कवच समाविष्ट आहे. तसेच सेवा कालावधीत दुर्दैवी मृत्यू झाल्यास ४४ लाख रुपयांची एकरकमी मदत निधी देखील जाईल.

CBSE 12th Result 2026: सीबीएसई १२ वीचा निकाल जाहीर? बोर्डाने ‘एक्स’वर दिले संकेत; ‘या’ डायरेक्ट लिंकवर पाहता येणार स्कोअरकार्ड

ऑनलाइन अर्ज आणि निवड प्रक्रिया

या भरतीची अर्ज प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन आहे. उमेदवारांना अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जाऊन आधी नोंदणी करावी लागेल. त्यानंतर लॉगिन करून ‘AVR (Apprentice) INET 2/26’ अंतर्गत अर्ज भरावा लागेल.

निवड प्रक्रियेचे टप्पे:

१. आयएनईटी (INET) परीक्षा

२. शारीरिक पात्रता चाचणी (फिजिकल फिटनेस टेस्ट)

३. लेखी परीक्षा

४. वैद्यकीय तपासणी (मेडिकल टेस्ट)

जे उमेदवार या सर्व टप्प्यांमध्ये उत्तीर्ण होतील, त्यांना ओडिशा येथील प्रशिक्षण केंद्रात (ट्रेनिंग सेंटर) प्रशिक्षणासाठी बोलावले जाईल.

Web Title: Indian navy recruitment 2026 agniveer apprentice apply online

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 22, 2026 | 11:58 AM

Topics:  

  • Agniveer Scheme
  • central goverment
  • Government Job
  • High salary Job

संबंधित बातम्या

Air India Salary Hike : अनुभवी वैमानिकांना टिकवण्यासाठी एअर इंडियाचा मोठा निर्णय! पगारात ८ ते १५ टक्क्यांची वाढ
1

Air India Salary Hike : अनुभवी वैमानिकांना टिकवण्यासाठी एअर इंडियाचा मोठा निर्णय! पगारात ८ ते १५ टक्क्यांची वाढ

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांसाठी होणार बंपर भरती; अर्ज प्रक्रिया लगेच जाणून घ्या..
2

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ‘या’ पदांसाठी होणार बंपर भरती; अर्ज प्रक्रिया लगेच जाणून घ्या..

Indian Army: भारतीय सेना अग्निवीर भरतीत सहभागी होताना कोणती कागदपत्रे सोबत असणे अनिवार्य आहे? जाणून घ्या सविस्तर!
3

Indian Army: भारतीय सेना अग्निवीर भरतीत सहभागी होताना कोणती कागदपत्रे सोबत असणे अनिवार्य आहे? जाणून घ्या सविस्तर!

Ishan Kishan: टीम इंडियाचा स्टार खेळाडू आरबीआयमध्ये अधिकारी कसा बनला? जाणून घ्या त्यांचे पद आणि पगाराबद्दल सविस्तर..
4

Ishan Kishan: टीम इंडियाचा स्टार खेळाडू आरबीआयमध्ये अधिकारी कसा बनला? जाणून घ्या त्यांचे पद आणि पगाराबद्दल सविस्तर..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.