Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Navy Recruitment: दहावी पास आहात? संगीताचे उत्तम ज्ञान आहे? वाट कसली पाहताय करा अर्ज

भारतीय नौसेनेकडून संगीतप्रेमी तरुणांसाठी अग्निवीर म्युझिशियन भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 10वी उत्तीर्ण अविवाहित उमेदवारांसाठी ही देशसेवेची संधी आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 02, 2025 | 06:54 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

भारतीय नौसेना अग्निवीर एमआर म्युझिशियन भरती 2025 ही संगीतामध्ये प्रावीण्य असलेल्या आणि देशसेवेच्या इच्छेने प्रेरित असलेल्या तरुण-तरुणींना दिली जाणारी एक अत्यंत खास संधी आहे. भारतीय नौसेनेने संगीत विभागासाठी अग्निवीर पदांसाठी भरतीची अधिसूचना प्रसिद्ध केली असून, या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 5 जुलै 2025 पासून सुरू झाली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जुलै 2025 असून इच्छुक उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळ www.joinindiannavy.gov.in यावर अर्ज सादर करावा.

शाहू महाराज जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप; महापुरुष जयंती उत्सव समितीचा उपक्रम

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराने किमान 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक असून 50% गुणांची अट आहे. केवळ अविवाहित पुरुष व महिला उमेदवारच अर्ज करू शकतात. भरतीनंतर चार वर्षांच्या अग्निवीर सेवाकालात विवाह करण्यास परवानगी नाही, याची स्पष्ट अट आहे.

या भरतीचा विशेष भाग म्हणजे उमेदवाराकडे संगीत कौशल्य असणे अत्यावश्यक आहे. भारतीय किंवा पाश्चात्य वाद्यसंगीताचे ज्ञान आणि प्रावीण्य असणे आवश्यक आहे. कीबोर्ड, हार्मोनियम, ड्रम्स, विंड वाद्ये, स्ट्रिंग्स इत्यादी वाद्यांपैकी किमान एका वाद्यावर प्रभुत्व असावे. गाण्यात सूर, लय आणि ताल यांचे ज्ञान असणेही गरजेचे आहे. वयोमर्यादा बाबत, उमेदवाराचा जन्म 1 सप्टेंबर 2004 ते 29 फेब्रुवारी 2008 या दरम्यान झालेला असावा. शारीरिक चाचणीत पुरुष उमेदवारांनी 1.6 किमी धाव 6.30 मिनिटांत पूर्ण करावी लागेल, तसेच 20 उठाबशा व 15 पुशअप पूर्ण करावे लागतील. महिला उमेदवारांसाठी हीच धाव 8 मिनिटांत, 15 उठाबशा व 10 पुशअप अशी असणार आहे.

नोकरीच्या शोधात आहात? यंदाचा जुलै तुमच्यासाठी खास! ‘या’ भरतींसाठी करा अर्ज

या भरतीत कोणतेही अर्ज शुल्क नाही. निवड प्रक्रिया मॅट्रिकच्या गुणांवर आधारित शॉर्टलिस्टिंग, संगीत कौशल्य चाचणी, शारीरिक तंदुरुस्ती चाचणी (PFT) आणि वैद्यकीय तपासणी यावर आधारित असेल. पहिल्या वर्षी पगार ₹30,000/- असून, तो दरवर्षी वाढत जाऊन चौथ्या वर्षी ₹40,000/- होईल. संगीत आणि देशभक्ती यांची सांगड घालणाऱ्या या संधीचा लाभ घेण्यासाठी इच्छुकांनी वेळेत अर्ज करावा.

Web Title: Indian navy recruitment for musicians

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2025 | 06:54 PM

Topics:  

  • Career News
  • Recruitment News

संबंधित बातम्या

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!
1

Software Engineer Layoffs: एका वर्षात दोनदा नोकरी गेली; सॉफ्टवेअर इंजिनिअरसमोर करिअरचं मोठं आव्हान!

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू
2

BPSC TRE 4.0 Recruitment 2026: शिक्षक भरतीचा बिगुल वाजला! 32,388 पदांसाठी आजपासून अर्ज सुरू

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स
3

Career Skills: नोकरी हवीय? फक्त डिग्री असून चालणार नाही! पहिली नोकरी मिळवण्यापूर्वी शिका या 10 महत्त्वाच्या स्किल्स

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन
4

KVIC Recruitment 2026: खादी आयोगात 50 पदांची मोठी भरती; परीक्षा नाही, मुलाखतीद्वारे थेट निवड आणि ₹40,000 वेतन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.