Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Japanese Study Trick: परीक्षा क्रॅक करण्यासाठी जपानचे विद्यार्थी नेमकी कोणती ट्रिक वापरतात ? जाणून घ्या एका क्लिकवर..

Japanese Study Trick 2026: जपानमधील विद्यार्थी आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी आणि परीक्षेची उजळणी करण्यासाठी 'अंकी शीट' किंवा 'रेड शीट मेथड'चा वापर कसा करतात, या वैज्ञानिक पद्धतीचा सविस्तर रिव्ह्यू वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 15, 2026 | 02:35 PM
japan study

japan study

Follow Us
Follow Us:

Japanese Study Trick 2026: जेव्हा शिक्षण, शिस्त आणि नवनवीन संशोधनांचा विचार केला जातो, तेव्हा जपानचे नाव सर्वात वर येते. येथील विद्यार्थी आपल्या अफाट स्मरणशक्तीसाठी आणि कठीण परीक्षा सहज उत्तीर्ण (क्रॅक) करण्यासाठी जगभरात ओळखले जातात. परंतु, जेव्हा तुम्ही एखाद्या जपानी विद्यार्थ्याला अभ्यास करताना पाहाल, तेव्हा त्यांच्या पुस्तकांवर तुम्हाला एक अनोखी गोष्ट दिसेल. अभ्यास करताना ते आपल्या पुस्तकांवर किंवा नोट्सवर लाल रंगाची पारदर्शक प्लास्टिक शीट किंवा कागद ठेवतात.

सुरुवातीला हे पाहताना एखादा खेळ किंवा छंद वाटू शकतो. परंतु, प्रत्यक्षात यामागे अभ्यासाचे एक अत्यंत प्रभावी वैज्ञानिक तंत्र दडलेले आहे. जपानमध्ये हे तंत्र ‘अंकी शीट’ (Anki Sheet) किंवा ‘रेड शीट मेथड’ (Red Sheet Method) म्हणून प्रसिद्ध आहे. जपानमधील जवळपास प्रत्येक स्टेशनरी दुकानात ही लाल शीट मोठ्या प्रमाणावर विकली जाते. बहुतांश जपानी विद्यार्थी या लाल कागदाचा वापर का करतात आणि हे अभ्यासासाठी कसे फायदेशीर ठरते, याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

जपानमधील ‘रेड शीट’चे गणित काय आहे?

हा कोणताही जादूचा प्रयोग नसून रंगांचे एक स्मार्ट कॉम्बिनेशन आहे. जपानी विद्यार्थी जेव्हा आपल्या पुस्तकात किंवा नोट्समधील एखादा महत्त्वाचा शब्द, तारीख किंवा सूत्र लक्षात ठेवू इच्छितात, तेव्हा ते त्याला हिरव्या रंगाच्या मार्करने (Green Highlighter) हायलाईट करतात. यानंतर, जेव्हा ते त्या पानाच्या वर लाल रंगाची पारदर्शक प्लास्टिक शीट ठेवतात, तेव्हा हिरव्या रंगाने लिहिलेला तो शब्द अदृश्य होतो, म्हणजेच पूर्णपणे काळा (Black out) पडतो.

जेव्हा लाल शीट ठेवल्यामुळे पानावरील महत्त्वाचे शब्द दिसेनासे होतात, तेव्हा विद्यार्थ्यांना ती रिकामी जागा पाहून स्वतःलाच प्रश्न विचारावा लागतो की, “येथे नक्की काय लिहिले होते?” वैज्ञानिक भाषेत याला ‘ॲक्टिव्ह रिकॉल’ (Active Recall) असे म्हणतात. जेव्हा आपले मेंदू एखाद्या लपलेल्या उत्तराचा स्वतःहून शोध घेण्याचा किंवा ते आठवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा ती माहिती आपल्या शॉर्ट-टर्म मेमरीमधून थेट लॉंग-टर्म मेमरीमध्ये जाते. यामुळे गोष्टी खूप जास्त काळासाठी लक्षात राहतात.

AI Career Coach: करिअर निवडीबाबत प्रश्न पडलायं? मग AI ला विचारा ‘हे’ ५ महत्त्वाचे प्रश्न..

स्वतःची परीक्षा घेणे होते सोपे

या तंत्राचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला स्वतःची परीक्षा घेण्यासाठी किंवा टेस्ट घेण्यासाठी दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीची गरज भासत नाही. तुम्ही फक्त ती लाल शीट बाजूला करा, तुमचे उत्तर तपासा आणि पुन्हा शीट ठेवून पुढे जा. हे अगदी तुमच्या फोनमधील एखाद्या ‘फ्लॅशकार्ड ॲप’ वापरण्यासारखेच आहे, परंतु हे पूर्णपणे ऑफलाईन आणि पुस्तकांसोबत काम करते.

वेळेची होते बंपर बचत

सर्वसाधारणपणे विद्यार्थी एकच धडा किंवा चॅप्टर वारंवार वाचतात, ज्याला ‘पॅसिव्ह री-रीडिंग’ (Passive Re-reading) म्हटले जाते. यामुळे वेळ तर खूप वाया जातोच, पण परीक्षेच्या वेळी गोष्टी विसरण्याची शक्यताही जास्त असते. जपानी विद्यार्थी या लाल शीटच्या मदतीने केवळ त्याच मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करतात जे ते विसरत आहेत. यामुळे संपूर्ण चॅप्टरची उजळणी (रिव्हिजन) अवघ्या काही मिनिटांत पूर्ण होते.

Tech Jobs Update: तंत्रज्ञान क्षेत्रात रोजगाराची मोठी लाट! २०३० पर्यंत भारतात १ लाख इंजिनिअर्सची भासणार गरज

भारतीय विद्यार्थीही याचा वापर करू शकतात का?

हा मार्ग कोणत्याही भाषेसाठी आणि कोणत्याही विषयासाठी सारखाच प्रभावी ठरू शकतो. इतिहासामधील महत्त्वाच्या तारखा लक्षात ठेवायच्या असोत, विज्ञानातील कठीण नावे असोत की गणिताची सूत्रे; यासाठी फक्त एक ग्रीन हायलाईटर आणि बाजारात सहज मिळणारी लाल रंगाची पारदर्शक प्लास्टिक शीट आवश्यक आहे. जर तुम्हालाही परीक्षेत कमी मेहनतीत जास्त गुण मिळवायचे असतील, तर तुम्ही ही जपानी ट्रिक वापरून पाहू शकता.

Web Title: Japanese study trick anki red sheet method active recall memory tips students

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 15, 2026 | 02:35 PM

Topics:  

  • Japan
  • Student
  • study
  • tricks

संबंधित बातम्या

Sports: ४० लाख डॉलरचे घसघशीत बक्षीस! भारतात रंगणार आंतरराष्ट्रीय गोल्फपटूंचा थरार
1

Sports: ४० लाख डॉलरचे घसघशीत बक्षीस! भारतात रंगणार आंतरराष्ट्रीय गोल्फपटूंचा थरार

जपानी लोकांच्या दीर्घ आयुष्याचे गुपित! काय आहे ‘Hara Hachi Bu’ नियम? ८०% पोट भरल्यावर जेवण थांबवण्याची परंपरा
2

जपानी लोकांच्या दीर्घ आयुष्याचे गुपित! काय आहे ‘Hara Hachi Bu’ नियम? ८०% पोट भरल्यावर जेवण थांबवण्याची परंपरा

JRF Preparation Tips: पहिल्याच प्रयत्नात नेट-जेआरएफ परीक्षा क्रॅक करायचीय? वापरा ‘या’ ५ सोप्या ट्रिक्स!
3

JRF Preparation Tips: पहिल्याच प्रयत्नात नेट-जेआरएफ परीक्षा क्रॅक करायचीय? वापरा ‘या’ ५ सोप्या ट्रिक्स!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.